देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा झटका! माजी खासदार, आमदाराची काँग्रेसमध्ये घरवापसी!

नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर आणि माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी आज काँग्रेसमध्ये घरवापसी केलीय. देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वीच खतगावकर काँग्रेसमध्ये गेल्यानं भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा झटका! माजी खासदार, आमदाराची काँग्रेसमध्ये घरवापसी!
भास्करराव पाटील खतगावकर, ओमप्रकाश पोकर्णा


नांदेड : देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अशावेळी नांदेडमध्ये भाजपला मोठा झटका बसलाय. नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर आणि माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी आज काँग्रेसमध्ये घरवापसी केलीय. देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वीच खतगावकर काँग्रेसमध्ये गेल्यानं भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. (Bhaskarrao Patil Khatgaonkar, Omprakash Pokarna will join the Congress)

काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे भाऊजी असलेले भास्करराव पाटील खतगावकर यांनी 7 वर्षापूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णाही भाजपवासी झाले होते. पण या दोन्ही नेत्यांना भाजपमध्ये योग्य स्थान आणि सन्मान मिळत नसल्यानं ते नाराज होते. अशोक चव्हाण यांना आपल्या भाऊजींचे मन वळवण्यात अखेर यश आलं आहे. त्यानंतर भास्करराव पाटील खतगावकर आणि ओमप्रकाश पोकर्णा यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपला रामराम ठोकत असल्याचं जाहीर केलंय.

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत खतगावकर यांना विश्वासात न घेता भाजपनं उमेदवार दिला. त्यामुळे खतगावकर आणि पोकर्णा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं जाणकार सांगत आहेत. खतगावकर यांची देगलूर मतदारसंघात पकड असल्यानं ऐन पोटनिवडणुकीच्या तोंडावर भाजपला हा मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे.

देगलूर पोटनिवडणुकीत तिरंगी लढत

देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी नऊ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता काँग्रेसचे जितेश अंतापूरकर, भाजपचे सुभाष साबणे, तर वंचित आघाडीचे डॉ. उत्तम इंगोले यांच्यासह 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यापैकी सहा उमेदवार अपक्ष आहेत.

देगलूर – बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवस अखेर एकूण 23 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होते. त्यातील छाननीअंती 2 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले होते. त्यामुळे एकूण 21 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. 13 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 9 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने आता 12 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

कोणकोणते उमेदवार रिंगणात

जितेश रावसाहेब अंतापूरकर (काँग्रेस),
सुभाष पिराजीराव साबणे (भाजप)
उत्तम रामराव इंगोले (वंचित बहुजन आघाडी)
विवेक पुंडलिकराव केररकर (जनता दल (सेक्युलर))
प्रा. परमेश्वर शिवदास वाघमारे (बहुजन भारत पार्टी)
डी डी वाघमारे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोब्रागडे))
अरुण कोंडीबाराव दापकेकर (अपक्ष)
साहेबराव भिवा गजभारे (अपक्ष),
भगवान गोविंदराव कंधारे (अपक्ष),
मारुती लक्ष्मण सोनकांबळे (अपक्ष),
विमल बाबुराव वाघमारे (अपक्ष),
कॉ.प्रा. सदाशिव राजाराम भुयारे (अपक्ष)

इतर बातम्या :

‘भाजपनं बेईमानी केली नसती तर उद्धवसाहेबही बेईमान झाले नसते’, गुलाबराव पाटलांची भाजपवर सडकून टीका

प्रकाश आंबेडकर राजकारणात सक्रीय, नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीसांना मोलाचा सल्ला

Bhaskarrao Patil Khatgaonkar, Omprakash Pokarna will join the Congress

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI