राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

| Updated on: Jul 10, 2019 | 11:27 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. रत्नागिरीतील तिवरे धरण फुटीमुळे झालेल्या दुर्घटनेप्रकरणी पीडितांना मदत करण्याबाबत पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं. पीडित कुटुंबांना जास्तीत जास्त मदत द्यावी. तसंच ज्या कुटुंबाला आधार राहिला नाही, त्यांना नोकरी द्यावी. ज्यांनी जमीन लागवडीयोग्य राहिली नाही, त्यांना निधीची तरतूद करावी, अशा मागण्या शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या.

रत्नागिरीतील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण 2 जुलैच्या रात्री फुटलं. त्यामुळे 23 जण वाहून गेले, त्यापैकी 20 मृतदेह आतापर्यंत हाती लागले आहेत.

या दुर्घटनेनंतर शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच 8 जुलैला चिपळूण तालुक्यातील दुर्घटनाग्रस्त तिवरे धरण परिसराची पाहणी केली. पवारांनी दुर्घटनाग्रस्त कुटुंबांची भेट घेऊन विचारपूस केली. या दौऱ्यानंतर पवारांनी दुसऱ्याच दिवशी म्हणजे 9 जुलैला मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पीडितांना धीर देण्याची विनंती केली.

पवार म्हणाले, “मी 8 जुलैला तिवरे धरणफुटीमुळे बाधीत कुटुंबीयांची भेट घेऊन, नुकसानीची पाहणी केली. या भेटीत मोठं नुकसान झाल्याचं दिसून आलं. पुणे जिल्ह्यातील माळीण दुर्घटनेवेळी सरकारने तातडीने मदतकार्य केलं. त्याच तत्परतेने तिवरे धरणग्रस्तांच्या समस्या सोडवाव्या”

तुफान पावसाने धरण फुटलं

कोकणसह राज्यभरात गेल्या काही दिवसापासून पावसाचा जोर वाढला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरीत पावसाने कहर माजवला आहे. त्याचाच परिणाम म्हणून तिवरे-खडपोली धरण मंगळवारी 2 जुलैच्या रात्री साडेआठच्या सुमारास भरलं. आधीच धरण ओव्हरफ्लो झाल्याने त्याचा धोका स्थानिकांच्या लक्षात आला. काही क्षणात धरणाला भगदाड पडलं आणि एकच खळबळ उडाली. नागरिकांनी याची माहिती प्रशासनालाही दिली. धरण फुटल्यामुळे गावातील 23 जण वाहून गेले. त्यापैकी 20 मृतदेह हाती लागले आहेत.

संबंधित बातम्या 

जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या पुण्यातील घरात राष्ट्रवादीने खेकडे सोडले!