AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार आणि राहुल गांधी यांची पावसातली सभा आणि निवडणुकांमधील विजयाचा इतिहास

Karnataka Assmbly Election Results 2023 : पावसातल्या दोन सभा अन् विजयाचा इतिहास; वाचा सविस्तर...

शरद पवार आणि राहुल गांधी यांची पावसातली सभा आणि निवडणुकांमधील विजयाचा इतिहास
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: May 14, 2023 | 12:57 PM
Share

मुंबई : कर्नाटकात 22 वर्षांनंतर काँग्रेसला मोठं मताधिक्य मिळालं.  काँग्रेसच्या 137 जागा निवडून आल्या आहेत. बहुमत मिळवत काँग्रेसची सत्ता आली. या सगळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा अन् भाजपच्या रणनितीवर काँग्रेसचा जाहीरनामा अन् रॅली भारी पडल्याची चर्चा होतेय. काँग्रेसला हे यश कसं मिळालं याचीवर राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. यात राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आणि पावसातील सभेचा मोठा वाटा असल्याचं बोललं जात आहे.

राहुल गांधी यांची पावसातील सभा

राहुल गांधी यांनी भारत जोडा यात्रा केली. यात ते पायी चालत त्यांनी लोकांशी संवाद साधला. जागोजागी सभा घेतल्या. यातील कर्नाटकमध्ये झालेली राहुल गांधींची सभा प्रचंड गाजली. कर्नाटकातील मैसूरमध्ये राहुल गांधी यांची सभा चालू होती. तेव्हा अचानक पाऊस सुरू झाला. “कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत ही भारत जोडो यात्रा चालत राहणार आहे. पाऊस येतोय. पण हा पाऊस भारत जोडो यात्रेला रोखू शकणार नाही”, असं राहुल गांधी यांनी या प्रचारसभेवेळी म्हटलं.

राहुल गांधी यांच्या या सभेची भारत जोडो यात्रेदरम्यान चर्चा झाली. शिवाय कर्नाटकचा निकाल लागल्यानंतर जेव्हा काँग्रेस जिंकली तेव्हाही या सभेची लोक आठवण काढत आहेत. काँग्रेसच्या यशात राहुल गांधी यांच्या या पावसातल्या सभेचा मोठा वाटा असल्याचं बोललं जात आहे. राहुल गांधी यांच्या या पावसातील सभेमुळे शरद पवार यांच्याही अशाच एका पावसातील सभेची आठवणं केली जात आहे.

शरद पवार यांची पावसातील सभा

उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर साताऱ्यात लोकसभेची पोटनिवडणूक लागली. तिथे श्रीनिवास पाटील यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. अन् श्रीनिवास पाटलांच्या प्रचारासाठी शरद पवार साताऱ्यात गेले. या प्रचार सभेवेळी अचानक पाऊस आला. भर पावसातही शरद पवार यांनी आपलं भाषणं थांबवलं नाही. ते बोलत राहिले. शरद पवार यांनी भर पावसात भाषण केलं. अन् या पावसाची महाराष्ट्रासह देशात चर्चा झाली. या निवडणुकीत श्रीनिवास पाटलांचा विजय झाला. यात शरद पवार यांच्या पावसातील सभेचा मोठा वाटा असल्याचं बोललं जातं.

आता काँग्रेसच्या कर्नाटकातील विजयानंतर राहुल गांधी यांच्या पावसातील सभेची आणि शरद पवार यांच्या पावसातील सभेची आठवण लोक काढत आहेत. त्यामुळे पावसातील सभा अन् निवडणुकीतील विजय यांचं जवळचं समिकरण असल्याची चर्चा सोशल मीडियावर होतेय.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?