‘एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास आमची हरकत नव्हती’, शरद पवार यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

शरद पवार यांनी एकनाथ शिंदे आणि शिवसेनेबाबतचा एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गटाकडून काही प्रतिक्रिया देण्यात येते का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

'एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास आमची हरकत नव्हती', शरद पवार यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
शरद पवार आणि एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: May 19, 2024 | 5:55 PM

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी याबाबत अनेक गौप्यस्फोट केले. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भरपूर उलथापालथ झाली. शिवसेना पक्षाने भाजपसोबतची युती तोडत विरोधात असलेले राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या दोन पक्षांसोबत महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात नवं सरकार स्थापन केलं. त्यावेळी मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्यात आलं. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या इतर दिग्गज नेत्यांच्या आग्रहानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नाहीतर सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच त्यावेळी मुख्यमंत्री पदाची जाबबदारी देण्यात येणार होती, असा दावा ठाकरे गटाच्या नेत्यांकडून नंतर करण्यात आला. याचबाबत शरद पवार यांनी सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. “एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास आमची हरकत नव्हती”, असा मोठा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला.

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

“विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री करण्यास आमची हरकत नव्हती. पण त्यांचं नाव आमच्यापुढे आलं नाही. शिवसेनेच्या नावाबद्दल शिवसेनेअंतर्गत चर्चा झाल्याचं नंतर समजले”, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

एकनाथ शिंदे यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांचा विरोध का?

एकनाथ शिंदे यांना महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेच्या वेळी मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्यास मविआच्या इतर नेत्यांचा विरोध होता, अशी चर्चा तेव्हा सुरु होती. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक दिग्गज नेत्यांच्या अनुभव हा एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा जास्त असल्यामुळे हे दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्यास सकारात्मक नव्हते, अशी चर्चा त्यावेळी राजकीय वर्तुळात सुरु होती. याबाबत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांनी त्यावेळी अशाचप्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. तसेच 2022 मध्ये सत्तापरिवर्तन झाल्यानंतरही ठाकरे गटाकडून हाच दावा करण्यात येत होता. पण आता शरद पवार यांनी आपला शरद पवार यांना मुख्यमंत्री करण्ययास विरोध नव्हता, असं स्पष्ट म्हटल्याने नेमकं खरं कोण बोलतंय? असा प्रश्न उपस्थित होतोय.

शरद पवार मुलाखतीत आणखी काय-काय म्हणाले?

  • “आम्ही कुटुंबप्रमुख म्हणून मुलगी सुप्रिया सुळे, पुतणे अजित पवार यांच्यात कधीही भेद केला नाही. अजित दादांना उपमुख्यमंत्रीपद, मंत्रीपद, विरोधी पक्षनेतेपद, विधिमंडळ पक्षनेतेपद अशी सर्व पदं दिली. एवढं सारं होऊनही पक्षात काम करण्यास संधी मिळाली नाही. ही अजित पवारांची ओरड निरर्थक आहे”, असं शरद पवार म्हणाले.
  • “2004 मध्ये पक्षाकडे मुख्यमंत्रीपदासाठी योग्य नेता नव्हता. अजित पवार त्यावेळी नेता नव्हता. अजित दादा नवखे होते. त्यावेळी छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवलं असतं तर भविष्यात पक्षात फूट पडली असती”, असा मोठा दावा शरद पवार यांनी केला.
  • “2004 पासूनच प्रफुल्ल पटेल भाजपबरोबर जाण्यासाठी आग्रही होते. काँग्रेसबाहेर पडलेल्या नेत्यांनी स्थापन केलेले छोटे पक्ष विलीन होऊ शकतात. आपला पक्ष विलीन करण्याचा विचार नाही. पुढे हा पर्याय त्याज्य नाही”, असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिली.
Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.