राज ठाकरे गप्प का? स्वत: शरद पवार जाणून घेणार – सूत्र

| Updated on: Sep 16, 2019 | 1:32 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) हे स्वत: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याशी चर्चा करणार आहेत.

राज ठाकरे गप्प का? स्वत: शरद पवार जाणून घेणार - सूत्र
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) हे स्वत: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याशी चर्चा करणार आहेत. मनसेच्या भूमिकेबाबत स्वतः शरद पवार राज ठाकरेंशी बोलणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विधानसभा निवडणुकीबाबत मनसेची भूमिका अस्पष्ट आहे. त्यातच ईडीच्या नोटीसनंतर राज ठाकरेंचा आघाडीच्या नेत्यांशी संपर्क नाही. त्यामुळे राज ठाकरे यांची नेमकी भूमिका काय, याबाबत स्वतः शरद पवार हे राज ठाकरेंशी बोलून जाणून घेणार आहेत.

ईडीच्या नोटीसआधी राज ठाकरे हे विरोधकांसह ईव्हीएमविरोधात मोर्चा काढणार होते. मात्र महापुरामुळे तो पुढे ढकलण्यात आला होता. पण अद्याप हा मोर्चा झालाच नाही.

त्याआधी लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजप आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या विरोधात रान उठवलं होतं. माझ्या प्रचाराचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला झाला तर होऊ द्या अशी रोख ठोक भूमिका राज ठाकरे यांनी घेतली होती.

त्यावेळी राज ठाकरेंना आघाडीत घेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता. मात्र त्यावेळी काँग्रेसने त्याला विरोध केला.

आता विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंना सोबत घेऊन, त्यांच्या प्रभावी भाषणाने सत्ताधाऱ्यांची चिरफाड करण्याचा मानस आघाडीचा असू शकतो. या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्याशी स्वत: शरद पवार चर्चा करण्याची शक्यता आहे.

मनसे निवडणूक लढवणार नाही?

दरम्यान मनसेचा विधानसभा निवडणूक न लढण्याचा सूर (Raj Thackeray meeting) पाहायला मिळतोय. कारण, मनसेच्या बैठकीत राज ठाकरेंनी निवडणूक न लढण्याबाबत सूर व्यक्त केला. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंच्या (Raj Thackeray meeting) सुरात सूर मिसळला. विशेष म्हणजे स्वतःकडचे पैसे जपून वापरा. देशाची आर्थिक स्थिती यापुढे अत्यंत बिकट होईल, असा सल्लाही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आहे.

संबंधित बातम्या 

मनसेच्या बैठकीत विधानसभा निवडणूक न लढण्याचा सूर