Parbhani : उपक्रम शिवसेनेचा रुजवतयं शिंदे गट, परभणीत शिवसेनेला शिंदे गट होईल काय भारी..?

| Updated on: Sep 10, 2022 | 5:42 PM

गाव तिथे शाखा हे घोषवाक्य शिवसेनेचे आहे. त्यानुसारच ग्रामीण भागातही शिवसेना रुजली गेली होती. हा उपक्रम शिवसेनेचा असला तरी परभणीत शिंदे गटाच्या माध्यमातून राबवला जात आहे. त्यानुसार जिल्ह्यातील तदलिंबला, पथरा, साटला, दुर्डी,समसपुर,बोरवंड , तट्टू जावळा, पिंगली आणि धार येथे शाखा स्थापना झाल्या आहेत.

Parbhani : उपक्रम शिवसेनेचा रुजवतयं शिंदे गट, परभणीत शिवसेनेला शिंदे गट होईल काय भारी..?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

परभणी : जगात जर्मनी आणि भारतात परभणी ही जशी म्हण रुजली गेली आहे त्यापुढे परभणीत फक्त शिवसेना अशीच म्हटलं तरी वावगे ठरणार नाही. कारण 1989 सालापासून येथील आमदार आणि खासदारही (Shiv Sena ) शिवसेनेचाच राहिलेला आहे. राज्याच्या राजकारणात काहीही असो मात्र, (Parbhani) परभणीत शिवसेनाच हे ठरलेले आहे. मध्यंतरीच्या राजकीय भूकंपानंतरही येथील लोकप्रतिनीधी आणि शिवसैनिकही एकनिष्ठ राहिले होते. पण आता या शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला देखील सुरुंग लावण्याचे काम शिंदे गटाकडून केले जात आहे. खासदार संजय जाधव हे शिवसेनेबरोबर एकनिष्ठ राहिले असले तरी त्यांचे निकटवर्तीय असलेले व्यंकट शिंदे यांना आपलसं करुन घेण्यात (Eknath Shinde) शिंदे गटाला यश आले आहे. एवढेच नाहीतर आता जिल्ह्यात 200 शाखा उद्घाटन करण्याचा ध्यास शिंदे गटाने घेतला आहे.

व्यंकट शिंदे कोण आहेत?

गेल्या काही दिवसांपूर्वी व्यंकट शिंदे हे देखील शिवसेनेतच होते. शिवाय ते खा. संजय जाधव यांचे निकटवर्तीय मानले जात होते. असे असताना त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. एवढेच नाहीतर जिल्ह्यातील 200 गावांमध्ये शिंदे गटाच्या शाखा स्थापन करण्याचा त्यांचा ध्यास आहे. याला सुरवात झाली असून 12 गावांमध्ये शाखा उद्घाटनही झाले आहे.

उपक्रम शिवसेनेचा, राबवतयं शिंदे गट

गाव तिथे शाखा हे घोषवाक्य शिवसेनेचे आहे. त्यानुसारच ग्रामीण भागातही शिवसेना रुजली गेली होती. हा उपक्रम शिवसेनेचा असला तरी परभणीत शिंदे गटाच्या माध्यमातून राबवला जात आहे. त्यानुसार जिल्ह्यातील तदलिंबला, पथरा, साटला, दुर्डी,समसपुर,बोरवंड , तट्टू जावळा, पिंगली आणि धार येथे शाखा स्थापना झाल्या आहेत.

हिंगोलीत बांगरांना अव्हान उभे

आ. संतोष बांगर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांना अव्हान देण्यासाठी शिवसेनेने मोठी खेळी केली आहे. माजी आमदार टारफे यांच्या सोबत शेतकरी नेते अजित मगर यांनीदेखील शिवसेनेत प्रवेश केला. माजी आमदार संतोष टारफे आणि शेतकरी नेते अजित मगर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आमदार संतोष बांगर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आमदार-खासदार एकनिष्ठ

राज्यात अनेक शिवसेना नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला असला तरी परभणी जिल्हा त्याला अपवाद राहिला होता. व्यंकट शिंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला असला तरी त्यांच्याकडे शिवसेनेचे असे कोणत पद नव्हते. परभणीचे आ. राहुल पाटील आणि खासदार संजय जाधव हे शिवसेनेशी आणि पक्षप्रमुखांशी एकनिष्ठ राहिले आहेत.