Uddhav Thackeray : “2019 ला उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला, त्याचं फळ त्यांना मिळालं, आमदारांनी बंडखोरी केली”

महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं. त्याचंच फळ त्यांना आता मिळतंय, असं भाजपच्या वरिष्ठ नेत्याने म्हटलंय.

Uddhav Thackeray : 2019 ला उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला, त्याचं फळ त्यांना मिळालं, आमदारांनी बंडखोरी केली
| Edited By: | Updated on: Aug 12, 2022 | 10:33 AM

सिंधुदुर्ग : “महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी 2019 ला केलं. त्याचंच फळ त्यांना आता मिळतंय. त्यांनी जे लोकांसोबत केलं. ज्या प्रकारचा विश्वास घात केला. तसंच त्यांच्यासोबतही घडतंय. त्यांचे नेते, आमदार, खासदार त्यांना सोडून गेलेत. माझी त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे, पण हे त्यांच्याच कर्माचंच फळ आहे”, असं भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा (Ajay Kumar Mishra) यांनी म्हटलंय. “महाराष्ट्रात आणि बिहारमध्ये भाजपबरोबर युती करून निवडणुका लढवल्या गेल्या. ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या त्यांच्याच बरोबर सरकार बनवण्यात आलं. यात भाजपची भूमिका कुठे चुकीची होती? बिहारमध्ये भाजपने नितीशकुमारांना (Nitish Kumar) हटवलं नाही”, असंही त्यांनी सांगितलं.

“भारतीय जनता पार्टी कधी निवडणुकीची तयारी करत नाही. आमच्यासाठी निवडणुका महत्वाच्या नाहीत तर लोकांसाठी सुविधा निर्माण करून येणाऱ्या पिढीला एक चांगला देश सोपवणे हा आमचा उद्देश आहे”, असं म्हणत त्यांनी भाजपचा येत्या काळातील उद्देश स्पष्ट केला. “जे पी नड्डा साहेबांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला.त्यांनी प्रादेशिक पक्ष संपवण्याचे वक्तव्य केले नव्हते तर त्यांनी अस सांगितलं होतं की,जर असंच काम राहील ,सरकारच्या योजना गरजवंतांपर्यंत नाही पोचल्या तर निश्चितपणे याच नुकसान प्रादेशिक पक्षांना होईल”, असंही ते म्हणालेत.

“ज्यांना या देशाची प्रगती पाहवत नाही. भाजपची लोकप्रियता त्यांना आवडत नाही तेच लोक ईडी,सीबीआय वगैरे संस्थांचा चुकीचा वापर केला जात आहे, असा आरोप करत आहेत. 8 वर्षात एक लाख करोड पेक्षा जास्त संपत्ती जप्त केली गेली. ही संपत्ती ज्यांच्याकडे अवैध होती. वावमार्गाने मिळवली होती तीच जप्त केली गेली. हे सर्व लोक भाजपवर निशाणा साधत आहेत. संजय राऊत ही किती बोलत होते, आता तर जेल मध्ये आहेत. ईडीने त्यांच्याकडे ही जप्ती केली. असेच लोक भाजपविरोधात बोलता आहेत.पण याचा आमच्यावर काहीच परिणाम नाही. आमचं सरकार, आमची पार्टी कुठल्याही सरकारी यंत्रणेच्या कामात हस्तक्षेप करत नाही. सर्व संस्था स्वतंत्र आहेत”, असं अजित कुमार मिश्रा म्हणालेत.

निसर्गाने नटल्यामुळेच सिंधुदुर्ग हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा झाला असावा. इथे नारायण राणे,नितेश राणे काम करता आहेत. त्यामुळे निश्चितच चांगलं यश आम्हाला मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.