टेन्शन वाढलं! शिवसेना नेते भास्कर जाधव यांना अटक होणार?

भास्कर जाधव यांच्याविरोधात थेट विदर्भातील 'या' जिल्ह्यात पोलिसात तक्रार! अटकेची कारवाई अटळ?

टेन्शन वाढलं! शिवसेना नेते भास्कर जाधव यांना अटक होणार?
भास्कर जाधवांविरोधात तक्रारImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 12, 2022 | 8:10 AM

शाहिद पठाण, TV9 मराठी, गोंदिया : भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भास्कर जाधव यांच्याविरोधात आता पूर्व विदर्भातील जिल्ह्यातही पोलीस तक्रार (Police Complaint) दाखल करण्यात आलीय. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पूर्व विदर्भातील शिंदे गटाच्या वतीने भास्कर जाधव यांना अटक (Arrest) झालीच पाहिजे, अशी मागणी करण्यात आलीय. या मागणीसह गोंदिया मध्ये पोलीस तक्रारही दाखल करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या वतीने ही तक्रार देण्यात आली.

माननीय राष्ट्रपती आदिवासी समाजातून येतात. त्यामुळे आदिवासीबहूल गोंदियाच्या भावना तीव्र असल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. राष्ट्रपतींबद्दल अपशब्द वापरणाऱ्या भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी, अशी मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.

कलम 294, 153, 500 आणि कलम 504 अन्वये गुन्हा दाखल करुन भास्कर जाधव यांच्या अटक करावी, अशी तक्रार गोंदिया पोलिसांत दाखल करण्यात आली. शिंदे गटाचे गोंदिया जिल्हाप्रमुख विंध शिवहरे यांच्या वतीने ही पोलीस तक्रार देण्यात आलीय.

आता या पोलीस तक्रारीबाबत पोलीस काय दखल घेतात आणि भास्कर जाधव यांच्यावर काय कारवाई करतात, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 10 ऑक्टोबर रोजी ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा झाली. यावेळी भास्कर जाधव यांनी केलेल्या भाषणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर वक्तव्य करत त्यांनी टिंगल केली, असा आरोप करण्यात आलाय.

शिंदे गटाचे गोंदिया जिल्हाप्रमुख विंध शिवहरे यांनी भास्कर जाधव यांच्या वक्तव्याचा निषेध केला. सोबत जाधव यांच्या वक्तव्यामुळे आदिवासी बांधवांचाही अपमान झाल्याचं ते म्हणाले. भास्कर जाधव यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केलीय.

Non Stop LIVE Update
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.