एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग, जेपी. नड्डांच्या बंगल्यावर तातडीची बैठक

| Updated on: Jun 21, 2022 | 1:01 PM

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजधानी दिल्लीत जे पी नड्डा यांच्या बंगल्यावर भाजपाची तातडीची बैठक सुरु आहे.

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग, जेपी. नड्डांच्या बंगल्यावर तातडीची बैठक
Follow us on

नवी दिल्ली : महाराष्ट्रात राजकीय भूकंप येणार की काय? अशी शक्यता आता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नाराजीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजधानी दिल्लीत जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांच्या बंगल्यावर तातडीची बैठक सुरु आहे. दरम्यान, पहाटे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दिल्लीसाठी रवाना झाले होते. तर शरद पवारही दिल्लीत गेल्याची माहिती संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून दिली होती. त्यानंतर आता जे. पी. नड्डा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भाजप नेत्यांची खलबतं सुरु आहेत. एकनाथ शिंदे हे सूरतमध्ये असून, त्यांच्यासह असलेल्या आमदारांना अहमदाबादला अमित शाह यांच्या भेटीला आणलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

हॉटेलबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवला

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारले आहे. एकनाथ शिंदे हे काल सायंकाळपासून नॉट रिचेबल होते. त्यानंतर ते सुरतमधील हॉटेल  ली-मेरिडिअनमध्ये वास्तव्याला असल्याची माहिती मिळाली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 35 आमदार असल्याचा दावा भाजपाच्या वतीने  करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. तर एकनाथ शिंदे हे एखाद्या दुसऱ्या पक्षाची घोषणा करू शकतात असा देखील अंदाज वर्तवला जात आहे. शिंदे हे ज्या हॉटले ली-मेरिडिअनमध्ये मुक्कामाला आहेत, त्या हॉटेलबाहेरील पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

संजय राऊत यांची प्रतिक्रिया

दरम्यान दुसरीकडे मात्र संजय राऊत यांनी या सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत. काही आमदार आमच्या संपर्कात नाहीत हे खरं आहे. मात्र आमचा एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क झाला असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. एकनाथ शिंदे हे खरे शिवसैनिक आहेत. त्यांचा शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात सहभाग आहे. मुख्यमंत्री काही विभागांचा आढावा घेत असतात. त्यामुळे काही गैरसमज झाले असतील तर ते दूर करू, आम्हाला खात्री आहे की आमचा आमदारांशी संपर्क झाला की ते लेगच पत येतील असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.