Maharashtra Political Crisis: 34 आमदार एकनाथ शिंदेंच्या गळाला, पहिल्यांदाच नावं आली समोर, तुमचा आमदार ‘या’ यादीत आहे का?

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे यांनी आपल्याच पक्षाविरोधात बंड केलं आहे. त्यामुळे शिवसेनेत राजकीय संकट निर्माण झालं आहे. ठाकरे सरकार अल्पमतात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेत्यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांना समजावण्याचा प्रयत्न केला.

Maharashtra Political Crisis: 34 आमदार एकनाथ शिंदेंच्या गळाला, पहिल्यांदाच नावं आली समोर, तुमचा आमदार 'या' यादीत आहे का?
34 आमदार एकनाथ शिंदेंच्या गळाला, पहिल्यांदाच नावं आली समोरImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 5:04 PM

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत किती आमदार आहेत यावर उलटसुलट चर्चा सुरू आहेत. काहींच्या मते शिंदेंसोबत 13 आमदार आहेत. तर काहींच्या मते शिंदेंकडे 22 आमदार आहेत. मात्र, शिंदे यांनी आपल्यासोबत 46 आमदार असल्याचं मीडियासमोर सांगितलं आहे. प्रत्यक्षात मात्र शिंदे यांच्या गळाला 34 आमदार लागल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेचेच नव्हे तर अपक्ष आमदारांनीही शिंदे यांना साथ दिली आहे. खुद्द एकनाथ शिंदे यांनीच आमदारांची ही नावे जाहीर केली आहे. आमदारांच्या नावाचं एक पत्रच त्यांनी विधानसभा अध्यक्षांना पाठवलं आहे. त्यामुळे शिंदेंकडे असलेल्या आमदारांचा आकडा उघड झाला आहे. त्यामुळे शिवसेनेत (shivsena) उभी फूट पडल्याचं दिसून येत आहे. तसेच आघाडी सरकार (maha vikas aghadi) अल्पमतात गेल्याचंही स्पष्ट झालं आहे.

आमदाराचे नावमतदारसंघ
शंभूराज देसाई पाटण
संजय शिरसाठऔरंगाबाद
नितीन देशमुख बाळापूरअकोला
किशोर पाटीलपाचोरा
प्रकाश सुर्वे मागाठाणे
राजकुमार पटेलमेळघाट
लता सोनावणेचोपडा
यामिनी जाधवभायखळा
सुहास कांदेनांदगाव
विश्वानाथ भोईरकल्याण पश्चिम
अनिल बाबरखानापूर
चिमणराव पाटीलएरंडोल
शहाजी पाटीलसांगोला
शांताराम मोरेभिवंडी
श्रीनिवास वनगापालघर
डॉ. बालाजी किणीकरअंबरनाथ
रमेश बोरनारे औरंगाबाद
प्रदीप जैस्वालऔरंगाबाद मध्य
संजय रायमुलकर महेकर
महेंद्र दळवी अलिबाग
महेंद्र थोरवेकर्जत
भरत गोगावलेमहाड
संदीपान भुमरे पैठण
तानाजी सावंत परांडा, उस्मानाबाद
बालाजी कल्याणकरनांदेड
अब्दुल सत्तारसिल्लोड
प्रताप सरनाईकओवळा माजिवडा
ज्ञानराज चौगुलेउमरगा
संजय गायकवाड बुलडाणा
महेश शिंदेकोरेगाव
नरेंद्र बनकरभंडारा
एकनाथ शिंदे कोपरी
बच्चू कडूअचलपूर
राजेंद्र पाटीलशिर्डी

एकनाथ शिंदे यांनी आपल्याच पक्षाविरोधात बंड केलं आहे. त्यामुळे शिवसेनेत राजकीय संकट निर्माण झालं आहे. ठाकरे सरकार अल्पमतात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेत्यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण शिंदे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांची गटनेतेपदावरून हकालपट्टी केली. तसेच व्हीप काढून सर्व आमदारांना मिटिंगलाही बोलावलं. पण त्यावर एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे यांनी संख्याबळाच्या आधारे आपणच गटनेते असल्याचा दावा केला. त्यानंतर त्यांनी सुनील प्रभू यांची मुख्यप्रतोद पदावरून हकालपट्टी केली. तसेच भरत गोगावले यांची प्रतोदपदी नियुक्ती केली.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.