आम्हाला गर्दी जमवण्याची गरज नाही, गरूड हवी तशी झेप घेतो; दसरा मेळाव्यावरून निलम गोऱ्हेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

शिंदे गटाचा देखील मेळावा होणार असल्यानं कोणाच्या दसरा मेळाव्याला किती गर्दी होणार यावरून आता राजकारण सुरू झाले आहे. यावरून शिवसेना उपनेत्या निलम गोऱ्हे यांनी  शिंदे गटाला जोरदार टोल लगावला आहे.

आम्हाला गर्दी जमवण्याची गरज नाही, गरूड हवी  तशी झेप घेतो; दसरा मेळाव्यावरून निलम गोऱ्हेंचा शिंदे गटावर हल्लाबोल
| Updated on: Sep 29, 2022 | 10:19 AM

मुंबई : काही दिवसांपूर्वी शिवसेनेचा (Shiv Sena) दसरा मेळावा यंदा शिवाजी पार्कवर होणार की नाही होणार यावरून राजकारण चांगलंच तापलं होतं. अखेर हाय कोर्टाकडून शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे यंदा शिंदे (Eknath Shinde) गटाचा देखील मेळावा होणार असल्यानं कोणाच्या दसरा मेळाव्याला किती गर्दी होणार यावरून आता राजकारण सुरू झाले आहे. यावरून शिवसेना उपनेत्या निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी  शिंदे गटाला जोरदार टोल लगावला आहे. आम्हाला गर्दी जमवण्याची आवश्यकता नाही. झेप घेताना गरूड स्वत:ला जशी पाहिजे तशी झेप घेतो असं निलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. 

नेमकं काय म्हणाल्या गोऱ्हे?

कोणाच्या दसरा मेळाव्याला किती गर्दी होणार यावरून सध्या ठाकरे आणि शिंदे गटात स्पर्धा सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. यावरूनच दोन्ही गटामध्ये आता आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू झालं आहे. या वादावर आता शिवसेनेच्या उपनेत्या निलम गोऱ्हे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. दसरा मेळाव्याला आम्हाला गर्दी जमवण्याची गरज नाही. झेप घेताना गरूड स्वत:ला जशी पाहिजे तशी झेप घेतो असं गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.

मोठ्या साहेबांची बाळासाहेब ठाकरे यांची जेव्हा सभा व्हायची तेव्हा कष्टकरी वर्ग आणि शेतकरी या सभेत सहभागी होण्यासाठी आपल्या मुलाला खांद्यावर घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यातून यायचा. आदित्य ठाकरे यांच्या ज्या सभा झाल्या त्या सभेत देखील मोठ्या संख्येनं कष्टकरी समाज सहभागी झाला होता. त्यामुळे आम्हाला गर्दी जमवण्याची गरज नसल्याचं गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.

शिंदे गटाला टोला

ज्यांना सभेला गर्दी जमवायची आहे त्यांनी ती जमवावी, त्यासाठी प्रयत्न करणं हे त्यांचं काम असल्याचा टोलाही गोऱ्हे यांनी शिंदे गटाला लगावला आहे.