Shiv Sena Symbol : शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव; उद्धव ठाकरे यांना कोणतं नाव मिळाल?

शिवसेना पक्षाच्या नावाबाबत निवडणूक आयोगाने खूप मोठा निर्णय दिला आहे.

Shiv Sena Symbol : शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव; उद्धव ठाकरे यांना कोणतं नाव मिळाल?
| Updated on: Oct 10, 2022 | 8:47 PM

नवी दिल्ली : शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव मिळालं आहे. ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळालं आहे. तर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळाले आहे. तर शिंदे गटाला चिन्हासाठी पर्याय सुचवण्याचे आदेश निवडणुक आयोगाने दिले आहेत. निवडणुक आयोगाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह गोठवले आहे. दोन्ही गटांना धनुष्यबाण चिन्हाचा देखील वापर करता येणार नाही. शिवसेना हे पक्षाचे नाव देखील लावता येणार नाही असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते.

यामुळे दोन्ही गटांकडून शिवसेनेला पर्यायी नावाचा विचार सुरु होता. तसेच चिन्हा बाबातही दोन्ही गटांकडून पर्याय देण्यात आला होता.

ठाकरे गटाने नवीन नावासाठी तीन पिढ्यांची नावे वापरून निवडणूक आयोगाला तीन पर्याय दिले होते. शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना प्रबोधनकार ठाकरे असे 3 पर्याय ठाकरे गटाने दिले होते.

ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळालं आहे. तर, शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना नाव मिळालं आहे.

चिन्हाबाबतही निवडणुक आयोगाने निर्णय दिला आहे. ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह  देण्यात आले आहे. तर, चिन्हासाठी पर्याय सुचवण्याचे आदेश निवडणुक आयोगाने शिंदे गटाला दिले आहेत.