भोसरीतून प्रचंड मतांची आघाडी देईन, महेश लांडगे आणि आढळरावांची अखेर दिलजमाई

| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

पुणे : निवडणुकीच्या तोंडावर नाराज नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी चढाओढ सुरु आहे. पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेचे मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट घेऊन नाराजी दूर केली. तर शिरुरचे शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही आज भाजपशी संलग्न अपक्ष आमदार महेश लांडगे यांची भेट घेऊन गैरसमज दूर केले. महेश लांडगे आणि शिवाजीराव […]

भोसरीतून प्रचंड मतांची आघाडी देईन, महेश लांडगे आणि आढळरावांची अखेर दिलजमाई
Follow us on

पुणे : निवडणुकीच्या तोंडावर नाराज नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी चढाओढ सुरु आहे. पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेचे मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट घेऊन नाराजी दूर केली. तर शिरुरचे शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही आज भाजपशी संलग्न अपक्ष आमदार महेश लांडगे यांची भेट घेऊन गैरसमज दूर केले.

महेश लांडगे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात मतभेद होते. पण निवडणुकीच्या तोंडावर आढळराव पाटलांना मोठा दिलासा मिळालाय. भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांची ‘मनधरणी’ करण्यात आढळरावांना यश आलंय. आढळरावांच्या प्रचारात आता आमदार लांडगे सक्रिय सहभाग घेणार आहेत.

खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि आमदार महेश लांडगे यांच्यात कमालीचा संघर्ष गेल्या पाच वर्षात पाहायला मिळाला. महेश लांडगे यांनी हाती घेतलेल्या प्रत्येक कामात आढळराव आणि त्यांच्या समर्थकांकडून आरोपांच्या फैरी झाडल्या गेल्या होत्या. मोशी कचरा डेपोचा प्रश्न असो की वेस्ट टू एनर्जीचा प्रकल्प, खासदारांनी प्रत्येकवेळी महेश लांडगेंवर निशाना साधला होता. म्हणूनच आमदार लांडगे यांनी थेट दंड थोपटत शिरूरच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली होती. त्यामुळे आढळरावांचे धाबे चांगलेच दणाणले होते. पण आता शिवसेना-भाजप युती झाल्यामुळे कट्टर विरोधकांना एकत्र यावं लागलंय.

भेटीनंतर शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, झालं गेलं विसरून जावा.. आता एकत्र काम करू.. शिवाय प्रचारात भाजपच्या सर्वांनी सक्रिय सहभाग घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं. आमदार महेश लांडगे म्हणाले, देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी यांनाच विराजमान करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. युतीचा धर्म आम्ही पाळू. निवडणुकीत युतीचाच प्रचार करु आणि भोसरीतून आढळरावांनी प्रचंड मतांची आघाडी घेऊन देऊ. पण आढळरावांनी पुढेही युतीचा धर्म पाळावा, असं आवाहन त्यांनी केलं.