AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंशिवाय ‘ही’ दोन नावं चर्चेत

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांची नावं मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचं बोललं जातं

मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंशिवाय 'ही' दोन नावं चर्चेत
| Updated on: Oct 28, 2019 | 7:52 AM
Share

मुंबई : आदित्य ठाकरे यांचं नाव शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत येत असलं तरी, शिवसेनेतूनच आणखी दोन नेत्यांची नावंही पुढे येत आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि सुभाष देसाई (Subhash Desai) मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचं (Shivsena Candidates for Chief Minister) बोललं जात आहे. दोन्ही नेत्यांच्या जमेच्या आणि कमकुवत बाजू जाणून घेणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

जनआशीर्वाद यात्रेतून शिवसेनेने आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट केलं. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रिपद मिळेल की नाही, यावरील सस्पेन्स अजूनही कायम आहे. मात्र दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शिवसेनेतून मुख्यमंत्रीपदाचे रेसमध्ये आदित्य ठाकरे हे एकटेच आहेत, असंही नाही.

आदित्य ठाकरेंसोबतच एक महत्वाचं चर्चेत आहे, ते म्हणजे एकनाथ शिंदे आणि दुसरं नाव म्हणजे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचं.

एकनाथ शिंदे यांचा परिचय

कडवट शिवसैनिक, जोडतोडीच्या राजकारणाचं कौशल्य या एकनाथ शिंदेंच्या जमेच्या बाजू आहेत. 2014 च्या मोदी लाटेतही शिंदेंनी ठाण्यात शिवसेनेची पडझड होऊ दिली नाही. कार्यकर्त्यांचं गाऱ्हाणं ऐकून घेण्याची क्षमता आणि ‘मास बेस’ असलेला नेता म्हणून शिंदेची ओळख आहे. आनंदराव दिघेंनंतर ठाण्यात शिवसेना टिकवण्यामागे शिंदेंचं योगदान मोठं आहे.

राजकीय वजन मोजलं, तर एकनाथ शिंदे हे सुभाष देसाईंपेक्षा उजवे आहेत. शिवाय मुख्यमंत्र्यांसोबत असलेल्या चांगल्या संबंधांमुळे भाजपही शिंदेंच्या नावाला फारसा नकारार्थी सूर लावण्याची शक्यता नाही. शिवसेनेत एक देसाई आणि दुसरा शिंदेंचा गट असल्याचं बोललं जातं. त्यात शिंदेंच्या गटानं विधानपरिषदेवर निवडून येणाऱ्यांना मंत्रिपदं नको, असा आग्रह धरला आहे. अर्थात त्यांचा निशाणा सुभाष देसाईंवर आहे.

सुभाष देसाई यांचा परिचय

सुभाष देसाई हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सर्वात जवळच्या नेत्यांमधले मानले जातात. बाळासाहेब ठाकरेंपासून शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेला नेता ही देसाईंची जमेची बाजू आहे. शिवाय बाळासाहेब गेल्यानंतर शिवसेनेला सावरण्यात उद्धव ठाकरेंना ज्यांचा मोठा आधार मिळाला, त्यात देसाईंचं नाव सर्वात आघाडीवर आहे.

शिवसेनेच्या स्थापनेपासून सुभाष देसाई शिवसेनेचा मुंबईतला महत्वाचा चेहरा आहेत. जे गोरेगाव, समाजवादी नेत्या मृणाल गोरेंचं गोरेगाव म्हणून ओळखलं जायचं, त्याच गोरेगावात सुभाष देसाईंनी शिवसेना रुजवली. त्यांना एकनाथ शिंदेंइतका मास बेस नसला तरी संघटनात्मक बांधणीवर त्यांची भूमिका महत्वाची राहिली आहे.

शिवसेना खासदारांनी युतीधर्म पाळला नाही : चंद्रकांत पाटील

आता शिवसेनेला मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रीपद मिळतं की नाही? मिळालं तर आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे की मग सुभाष देसाई?.. शिवसेनेतून कुणाचं नाव (Shivsena Candidates for Chief Minister) पुढे येतं? हे नजीकचा काळच ठरवेल.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.