शिंदे की ठाकरे? गोव्याचे राज्यप्रमुख कुणासोबत?, स्पष्टीकरण देत म्हणाले…

शिवसेना गोवा राज्यप्रमुख जितेश कामत नक्की कुणासोबत आहेत? एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे अशी सध्या चर्चा होतेय. त्यावर स्वत: जितेश कामत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

शिंदे की ठाकरे? गोव्याचे राज्यप्रमुख कुणासोबत?, स्पष्टीकरण देत म्हणाले...
| Edited By: | Updated on: Sep 17, 2022 | 3:53 PM

मुंबई : शिवसेना गोवा राज्यप्रमुख जितेश कामत (Jitesh Kamat) नक्की कुणासोबत आहेत? एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? अशी सध्या चर्चा होतेय. त्यावर स्वत: जितेश कामत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो नाही. मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबतच (Uddhav Thackeray) आहे”, असं म्हणत त्यांनी आपली बाजू मांडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांना शिवसेनेच्या 12 राज्यप्रमुखांनी व्यक्तिशः भेटून पाठिंबा दिल्याची पोस्ट त्यांच्या समाजमाध्यमातील अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आलीय. या 12 राज्यप्रमुखांत गोव्याचे राज्य प्रमुख जितेश कामत यांचंही नाव आहे. पण त्यांनी स्पष्टीकरण देत आपण उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं म्हटलंय.