Varun Sardesai : आता छावा बाहेर, दसऱ्यानंतर वाघही मैदानात, शिवसेनेमध्ये नेमक्या काय आहेत हालचाली?

संतोष जाधव

संतोष जाधव | Edited By: राजेंद्र खराडे

Updated on: Sep 18, 2022 | 12:48 PM

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मतदार संघातील भूम येथे युवासेनेचा मेळावा पार पडला. हा मतदार संघ काय शिवसेनेकडे राहिलेला आहे. युवासेनेची जबाबदारी अनेकांवर देण्यात आली.

Varun Sardesai : आता छावा बाहेर, दसऱ्यानंतर वाघही मैदानात, शिवसेनेमध्ये नेमक्या काय आहेत हालचाली?
वरुण सरदेसाई

उस्मानाबाद : वितचारांचे सोने लूटण्यासाठी गेल्या 56 वर्षांपासून (Shivsena Party) शिवसेनेच्यावतीने मुंबईतील (Shiv Tirth) शिवतीर्थावर या दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाते. यंदाची स्थिती वेगळी आहे. (Dussehra Gathering) दसरा मेळावा होणार कुठे यावरुन राजकारण पेटले आहे. दसरा मेळावा होणारच अशी भूमिका शिंदे गटानेही घेतली आहे. मात्र, अद्याप दोघांचेही ठिकाण निश्चित झालेले नाही. असे असतानाच दसऱ्यामध्ये विचारांचे सोने लूटल्यानंतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार असे युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी सांगितले आहे. आता छावा बाहेर असे म्हणत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यांचे कौतुक केले. पण आता वाघही मैदनात उतरणार असल्याचे ते म्हणाले आहेत.

आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यात अनेक ठिकाणी सभा, मेळावे आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत.विशेष म्हणजे ज्या आमदारांनी बंड केले त्यांच्याच मतदारसंघात त्यांनी दौरे केले आहेत. यानिमित्ताने आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर सडकून टीका केली. शिवाय वेळोवेळी त्यांचा उल्लेख गद्दार म्हणून केला आहे.

शिवसंवाद यात्रा सुरु असतानाच दुसरीकडे युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई हे देखील तालुक्याच्या ठिकाणी मेळावे घेत आहेत. दसऱ्यापर्यंत संपूर्ण राज्यात असे कार्यक्रम राहणार आहेत. आतापर्यंत छावा मैदानात होता आता दसऱ्यानंतर वाघच मैदनात उतरणार असल्याचे सरदेसाई हे म्हणाले आहेत.

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मतदार संघातील भूम येथे युवासेनेचा मेळावा पार पडला. हा मतदार संघ काय शिवसेनेकडे राहिलेला आहे. त्यामुळे या भागातील जनता गद्दारी खपवून घेणार नसल्याचे खा. ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले. तर युवासेनेची जबाबदारी अनेकांवर देण्यात आली.

राज्यात झालेल्या राजकीय घडामोडीनंतर पक्षप्रमुख हे आता आक्रमक स्वरुप धारण करणार आहेत. यापूर्वीच त्यांनी स्पष्टीकरण दिले असून शिवसेनेचा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार असल्याचे ते म्हटले आहेत. त्यामुळे मेळाव्याची परंपरा तर आहेच पण यंदाचा मेळावा हा संघटनात्मकदृष्ट्याही महत्वाचा राहणार आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI