सानपांच्या जाण्याने नुकसान व्हायला त्यांच्यामुळे फायदा तरी कुठे झाला?: राऊत

| Updated on: Dec 22, 2020 | 4:25 PM

टीका करण्यासाठी भाजपच्या काही नेत्यांना भारतरत्न मिळायला हवा. तर उर्वरित नेत्यांना पीएडची आणि डिलीट पदवी मिळायला हवी | Sanjay Raut

सानपांच्या जाण्याने नुकसान व्हायला त्यांच्यामुळे फायदा तरी कुठे झाला?: राऊत
Follow us on

मुंबई: शिवसेनेतून भाजपमध्ये घरवापसी करणाऱ्या बाळासाहेब सानप (Balasaheb Sanap) यांचा शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खोचक शैलीत समाचार घेतला. बाळासाहेब सानप यांच्या जाण्यामुळे शिवसेनेचे नुकसान झाले का, असे संजय राऊत यांना विचारण्यात आले. त्यावर संजय राऊत यांनी तितक्याच हजरजबाबीपणे उत्तर देत बाळासाहेब सानप यांनी खिल्ली उडविली. बाळासाहेब सानप यांच्या येण्याने शिवसेनेला कोणताही फायदा झाला नव्हता. त्यामुळे नुकसानीचा प्रश्नच नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. (Former MLA Balasaheb Sanap returns to Bharatiya Janata Party)

ते मंगळवारी शिवसेना भवनात पार पडलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मुंबईत लागू करण्यात आलेल्या रात्रीच्या संचारबंदीच्या (Night Curfew) निर्णयावरुन राज्य सरकारवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांनाही फैलावर घेतले. टीका करण्यासाठी भाजपच्या काही नेत्यांना भारतरत्न मिळायला हवा. तर उर्वरित नेत्यांना पीएडची आणि डिलीट पदवी मिळायला हवी, अशी खोचक टिप्पणी संजय राऊत यांनी केली.

‘गेल्या 50 वर्षात केंद्रात इतके हतबल सरकार पाहिले नाही’

दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुनही संजय राऊत यांनी भाजपला लक्ष्य केले. दिल्लीतील शेतकरी आंदोलनामुळे केंद्र सरकार हतबल झाले आहे. गेल्या 50 वर्षात सरकारी कधीही इतके हतबल दिसले नाही. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा आहे. मात्र, हे आंदोलन राजकारणविरहीत असल्यामुळे शिवसेना या आंदोलनात सहभागी होत नसल्याचेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

बाळासाहेब सानपांच्या ‘घरवापसी’नंतर शिवसेनेचाही पक्षप्रवेशाचा धडाका

शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी सोमवारी भाजपमध्ये घरवापसी केली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि अन्य नेत्यांच्या उपस्थितीत सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. बाळासाहेब सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता शिवसेनेकडूनही पक्षप्रवेशाचा धडाका सुरु करण्यात आलाय. नाशिक आणि धुळे जिल्ह्यातून भाजपचे शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज शिवसेनेत प्रवेश केला.

संबंधित बातम्या:

सानपांच्या प्रवेशानं भाजपची डोकेदुखी वाढली! अनेक नगरसेवक रामराम ठोकणार?

बाळासाहेब सानपांनी केवळ दहा मिनिटात पुनर्प्रवेशाचा निर्णय कसा घेतला? फडणवीसांकडून ऐका

बाळासाहेब सानपांच्या ‘घरवापसी’नंतर शिवसेनेचाही पक्षप्रवेशाचा धडाका

(Former MLA Balasaheb Sanap returns to Bharatiya Janata Party)