VIDEO | गाडीतून उतरले, शर्ट काढत झाड हटवलं, शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा ‘बाहुबली’ अवतार

| Updated on: May 31, 2021 | 3:38 PM

बुलडाणा मतदारसंघात वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावर पडलेले झाड आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत रस्त्याच्या बाजूला केले (Shivsena Sanjay Gaikwad lifts tree)

VIDEO | गाडीतून उतरले, शर्ट काढत झाड हटवलं, शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा बाहुबली अवतार
शिवसेना आमदार संजय गायकवाड
Follow us on

बुलडाणा : बुलडाणा मतदारसंघाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांची “डॅशिंग मॅन” म्हणून जिल्ह्यात ओळख आहे. संजय गायकवाड यांचा ‘बाहुबली’ अवतार दाखवणारा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. वादळामुळे रस्त्यात पडलेलं झाड बाजूला करुन त्यांनी वाट मोकळी करुन दिली. (Shivsena MLA Sanjay Gaikwad lifts tree on road)

आमदार संजय गायकवाड आपल्या वक्तव्यांमुळे मागील काही दिवसापासून संपूर्ण राज्यात चर्चेत आलेले आहे. नुकतंच, बुलडाणा मतदारसंघात वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावर पडलेले झाड आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत रस्त्याच्या बाजूला केले. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

वाढदिवशी वादळ नुकसान पाहणी दौरा

शुक्रवार 28 मेच्या रात्री बुलडाणा मतदारसंघातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला होता. याची माहिती आमदार गायकवाड यांना समजल्यानंतर ते 29 मे रोजी स्वतःचा वाढदिवस असतानाही नुकसानाच्या पाहणीसाठी गेले. सकाळी गुळभेली ते राहेरा मार्गाने जात असताना एक झाड त्यांना रस्त्यात पडलेले दिसले.

शर्ट काढत सहकाऱ्यांच्या साथीने झाड हटवले

सरकारी यंत्रणेला आदेश देऊन ते रस्ता मोकळा करु शकत होते, मात्र ते स्वतः गाडी खाली उतरले. त्यांनी आपला शर्ट काढला आणि सहकाऱ्यांसह गायकवाडांनी ते झाड बाजूला केले. या कामात त्यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते नयन शर्मा, बॉडीगार्ड विक्रांत गुळवे, चालक योगेश मुळे यांच्यासह गावातील काही नागरिकांनीही हातभार लावून झाडाला रस्त्याच्या बाजूला केलं. आमदार संजय गायकवाड यांचा झाड बाजूला करतानाचा व्हिडीओ त्यांनी स्वतः फेसबुकवर शेअर केला असून सोशल मीडियावरही खूप वायरल होत आहे.

व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

(Shivsena Sanjay Gaikwad lifts tree)

गायकवाडांच्या वक्तव्यांची चर्चा

नागरिकांनी रोग प्रतिकारशक्‍ती वाढविण्यासाठी जास्तीत जास्त मांसाहार सेवन करावा, असं बुलडाणा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड म्हणाले होते. मात्र या वक्तव्यावरुन ज्यांच्या भावना दुखावल्या असतील त्यांची दिलगिरीही गायकवाडांनी व्यक्त केली. ज्यांची मनं दुखावली, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहे. मात्र, ज्यांनी या विषयाचं राजकारण केलं, त्यांची माफी मागणार नाही, असं संजय गायकवाड म्हणाले होते.

संबंधित बातम्या :

आधी म्हणाले मांसाहार करा, आता थेट चिकन बिर्याणी आणि उकडलेली अंडी वाटली, आमदार संजय गायकवाडांनी करुन दाखवलं

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न

(Shivsena MLA Sanjay Gaikwad lifts tree on road)