AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अफगाणिस्तानात काय व्हायचं ते होईल पण रशिया, चीन, पाकिस्तान या त्रिकुटाची बैठक भारतासाठी धोक्याची घंटा, सामनातून केंद्राला सल्ला

अफगाणिस्तानात उद्या काय व्हायचे ते होईल, पण त्यावरून कतारच्या राजधानीत होणारी रशिया, चीन, पाकिस्तान या त्रिकुटाची बैठक भविष्यात भारतासाठी धोक्याची घंटा ठरु शकते, अशी भीती सामनाच्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आलीय.

अफगाणिस्तानात काय व्हायचं ते होईल पण रशिया, चीन, पाकिस्तान या त्रिकुटाची बैठक भारतासाठी धोक्याची घंटा, सामनातून केंद्राला सल्ला
पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि संजय राऊत
| Edited By: Akshay Adhav | Updated on: Aug 07, 2021 | 7:23 AM
Share

मुंबई : अफगाणिस्तानात उद्या काय व्हायचे ते होईल, पण त्यावरून कतारच्या राजधानीत होणारी रशिया, चीन, पाकिस्तान या त्रिकुटाची बैठक भविष्यात भारतासाठी धोक्याची घंटा ठरु शकते, अशी भीती व्यक्त करत त्रिकुटाच्या हालचालींकडेही डोळ्यात तेल घालून पाहणे आता तेवढेच आवश्यक बनले आहे, असा सल्ला सामना अग्रलेखातून (Saamana Editorial) केंद्र सरकारला देण्यात आला आहे.

भारताची अमेरिकेसोबत वाढलेली सलगी, विद्यमान राज्यकर्त्यांच्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षांसोबतच्या गळाभेटी रशियाच्या डोळ्यात खुपत असाव्यात. त्यामुळेच भारताच्या दोन शत्रुराष्ट्रांना सोबत घेऊन रशियाने नवी मोट बांधली आहे. रशियासारखा सच्चा दोस्त आपण का गमावला यावर तर चिंतन व्हायलाच हवे. शिवाय अफगाणच्या खुनी संघर्षात भारत भरडला जाऊ नये यासाठी नवीन त्रिकुटाच्या हालचालींकडेही डोळ्यात तेल घालून पाहणे आता तेवढेच आवश्यक बनले आहे, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

संघर्ष फक्त अफगाणिस्तानापुरता मर्यादित नाही

अफगाणिस्तानातील विद्यमान सरकार आणि तालिबान यांच्यातील रक्तरंजित संघर्ष आता टिपेला पोहचला आहे. मात्र हा संघर्ष केवळ अफगाणिस्तानपुरता मर्यादित राहिला नसून आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे दूरगामी परिणाम होणार, अशी स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. खास करून हिंदुस्थानला या परिणामांचा फटका बसण्याची लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानातील घटना आणि त्यावरून होणाऱ्या घडामोडी याकडे हिंदुस्थानला बारकाईनेच लक्ष ठेवावे लागेल.

भारत रशियाचे जुने नाते धाब्यावर

ताजी बातमी अशी की, अफगाणिस्तानच्या मुद्दय़ावर रशिया, चीन आणि पाकिस्तान हे तीन देश एकत्र आले असून 11 ऑगस्ट रोजी कतारची राजधानी दोहा येथे या त्रिकुटाची बैठक होणार आहे. हिंदुस्थानचा पारंपरिक मित्र असलेल्या रशियाने पुन्हा एकदा अफगाणिस्तानात रस घेतला आहे आणि रशियाच्याच पुढाकाराने ही बैठक होते आहे. कधी काळी भारताचा जिवलग मित्र असलेल्या रशियाने मैत्रीचे हे जुने नाते धाब्यावर बसवून या बैठकीपासून भारताला जाणीवपूर्वक बाजूला ठेवले आहे.

रशियाच्या राजकीय खेळीकडे दुर्लक्ष नक्कीच करता येणार नाही

अमेरिकेने अफगाणिस्तानातील सैन्य माघारी बोलावण्यास प्रारंभ केल्यापासून रशिया अफगाणच्या अंतर्गत राजकारणात कमालीचा सक्रिय झाला आहे. अमेरिका आणि रशिया यांच्यातील शीतयुद्धाचा भाग म्हणून रशियाच्या या राजकीय खेळीकडे दुर्लक्ष नक्कीच करता येणार नाही. कारण रशियाने अफगाणविषयक डावपेच आखण्यासाठी भारताचा शत्रू क्रमांक एक आणि शत्रू क्रमांक दोन अशा दोन्ही शत्रूराष्ट्रांशी हातमिळवणी केली आहे. त्यासाठीच रशियाने कतारमध्ये चीन आणि पाकिस्तानसोबत बैठकीचे आयोजन केले आहे.

रशिया भारताच्या शत्रूंना आपल्या मांडीवर का घेतोय

जगभरातील देश हिंदुस्थानशी मैत्री करण्यासाठी कसे उतावीळ झाले आहेत याचे खूप गोडवे मागील पाच-सहा वर्षांत गायले गेले. मात्र ज्या रशियाकडून हिंदुस्थान आपली निम्म्याहून अधिक शस्त्रास्त्र खरेदी करतो तोच रशियासारखा आपला जुना मित्र आपल्या शत्रूंना मांडीवर का घेत आहे, पाकिस्तानसारख्या शत्रूबरोबर युद्धसराव का करीत आहे याचे तटस्थ विश्लेषण मात्र कोणीच करत नाही.

तालिबान्यांची राजवट प्रस्थापित करण्याची व्यूहरचना आखणं, हाच बैठकीचा उद्देश

अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करणे आणि राष्ट्रीय सहमतीची प्रक्रिया सुलभ करणे या गोंडस नावाखाली रशियाने दोहामध्ये ही बैठक आयोजित केली आहे. तथापि अमेरिकेच्या पुढाकाराने प्रस्थापित झालेले अफगाणिस्तानातील विद्यमान सरकार उलथवून लावणे आणि पुन्हा एकदा तिथे तालिबान्यांची राजवट कशी प्रस्थापित करता येईल याची व्यूहरचना आखणे हाच या बैठकीमागील मुख्य हेतू आहे.

पाकिस्तानचा घोडा हतबल, चीनकडे पाहिल्याशिवाय तो जगू शकत नाही

एकमेकांच्या विरुद्ध दिशेला पाहूनही ही घोडागाडी धावते मात्र सरळ रेषेत. तीदेखील कारच्या वेगाने. रशियाने या तीन घोडय़ांच्या गाडीवरून बैठकीला ‘ट्रोइका मीट’ हे नाव दिले खरे, पण ट्रोइका घोडागाडीचे महत्त्वाचे वैशिष्ट्यच रशियाचे अध्यक्ष पुतीन महाशय विसरलेले दिसतात. ते म्हणजे ट्रोइकाला जोडलेले तीनही घोडे एकाच जातीचे हवेत, अन्य दोन घोड्यांच्या तुलनेत फक्त मधला घोडाच मोठा हवा आणि तीनही घोड्यांनी एकमेकांकडे पाहू नये. खरी गडबड आहे ती इथेच. पाकिस्तानी घोडा इतका हतबल आहे की, चीनकडे पाहिल्याशिवाय तो एकही दिवस जगू शकत नाही आणि चिनी घोड्यालाही अमेरिकाच काय, रशियालाही मागे टाकून महासत्ता बनण्याचे डोहाळे लागले आहेत.

अमेरिका आणि भारताला मात व तालिबान्यांना साथ हाच रशिया पुरस्कृत बैठकीचा छुपा अजेंडा

अशा परिस्थितीत एकमेकांच्या पायात पाय घालून ही ‘ट्रोइका मीट’ होत आहे. अमेरिका आणि भारताला मात व तालिबान्यांना साथ हाच रशिया पुरस्कृत बैठकीचा छुपा अजेंडा आहे. अफगाणिस्तानात उद्या काय व्हायचे ते होईल, पण त्यावरून कतारच्या राजधानीत होणारी रशिया, चीन, पाकिस्तान या त्रिकुटाची बैठक भविष्यात हिंदुस्थानसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.

(Shivsena Sanjay Raut Advice Modi GOVT through Saamana Editorial over Afganistan pakistan Russia Meeting)

हे ही वाचा :

गुजरातची तातडीने पाहणी करणारे पंतप्रधान महाराष्ट्रावर संकट ओढावल्यावर कुठे होते? काँग्रेसचा थेट सवाल

खेलरत्न पुरस्काराला हॉकीच्या जादूगाराचं नाव, का होतेय मोदींच्या निर्णयाचं कौतुक? वाचा 5 कारणे

Follow Us
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा; ऑपरेशन टायगर पुन्हा अॅक्टिव्ह!
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना अटक
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण...
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण... अमोल कोल्हेंचं मोठं विधान; चर्चांना मिळाला पूर्णविराम!
मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट
Rain Alert | मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट मोडवर
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल;
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल; पक्षातील...
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्य
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?
ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं
Sanjay Raut | ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं
थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
Vijay Thalapathy | थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान धक्कादायक घटना