Nashik : … म्हणून निवडणूका लांबणीवर, जयंत पाटलांनी सांगितली पडद्यामागची गोष्ट..!

| Updated on: Sep 04, 2022 | 9:01 PM

जनता आता जागृत झाली आहे. राजकीय घडामोडी ह्या राज्याच्या राजधानीत होत असल्या तरी गल्लीतील ग्रामस्थही आता अपडेट आहे. त्यामुळे काही लपून हे राहतच नाही. महाविकास आघाडी सरकारने सत्ता स्थापन केली ती रीतसर मार्गानेच. त्यामुळे अडीच वर्ष सरकार यशस्वीरित्या काम करु शकले. पण शिंदे सरकार हे अवैध मार्गाने सत्तेत आले आहे. आता अडीच महिने होऊनही त्यांच्या मनात कायम भीती आहे.

Nashik : ... म्हणून निवडणूका लांबणीवर, जयंत पाटलांनी सांगितली पडद्यामागची गोष्ट..!
जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : गेल्या अडीच महिन्यात घडलेल्या राजकीय घटनांचे साक्षीदार राज्यातील 11 कोटी जनता आहे. सर्वकाही जनतेसमोर झाले असून या सर्व प्रकारावर चिंतन केले जात आहे. ज्या पद्धतीने (Transfer of power) सत्तांतर झाले त्याबद्दल जनतेच्या मनात रोष असून हे न विसरता येण्यासारखे आहे. कदाचित मतदानातून जनता आपला रोष व्यक्त करेल हीच भीती सरकारला असावी म्हणूनच (Municipal Election) महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूका ह्या लांबणीवर टाकल्या जात आहेत. जे झाले ते रीतसर नाही याची कल्पना खुद्द सरकारलाही असल्याने त्याचा फटका आगामी काळात बसू नये म्हणूनच निवडणूकीचे धोरणे ठरवली जात असावीत असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष (Jayant Patil) जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर केला आहे. शिवाय महाविकास आघाडी कोणतीही बाब रीतसर मार्गानेच करते, तर राज्य सरकार सर्वकाही अवैध मार्गाने हाच दोन्ही मधला फरक असल्याचे म्हणत त्यांनी शिंदे सरकारवर बोचरी टीका केली आहे.

निवडणूका लागल्या तर चित्र वेगळे

सध्या राज्यातील महापालिकांवर प्रशासक नेमलेले आहे. शिवाय अद्यापही निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला नाही. विकास कामे आणि कमी कालावधीत असे दावे शिंदे सरकारकडून केले जात असतील तर निवडणूकांपासून हे सरकार दूर का पळतंय असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे. जनतेने आम्हाला मान्य केले हे ठणकावून सांगितले जात असले तरी जनतेच्या मनात काही वेगळेच आहे. त्याचाच फटका बसू नये म्हणून आजची निवडणूक उद्यावर ढकलली जात असल्याचा आरोपही पाटलांनी केला आहे.

पाटलांनी सांगितला दोन्ही सरकारमधला फरक

जनता आता जागृत झाली आहे. राजकीय घडामोडी ह्या राज्याच्या राजधानीत होत असल्या तरी गल्लीतील ग्रामस्थही आता अपडेट आहे. त्यामुळे काही लपून हे राहतच नाही. महाविकास आघाडी सरकारने सत्ता स्थापन केली ती रीतसर मार्गानेच. त्यामुळे अडीच वर्ष सरकार यशस्वीरित्या काम करु शकले. पण शिंदे सरकार हे अवैध मार्गाने सत्तेत आले आहे. आता अडीच महिने होऊनही त्यांच्या मनात कायम भीती आहे. हाच दोन्ही सरकारमधला फरक असल्याचे पाटील म्हणाले आहेत.

सत्तांतराचे वर्तुळ हे पूर्ण होणारच

राजकारणात दिवस हे सारखे राहत नाहीत. अलिकडच्या काळात तर अधिक झपाट्याने बदल होत आहे. बदलावर विश्वास ठेऊन कार्यकर्त्याने आपले काम कऱणे महत्वाचे आहे. शिवाय सरकार तर गैरमार्गाने सत्तेत आले आहे. त्यामुळे किती काळ टिकेल हे सांगता येणार नाही. राजकारणात असे प्रसंग येतात पण विचलित न होता काम करणे महत्वाचे असल्याचेही जयंत पाटील म्हणाले आहेत.

सरकारच्या मनात भीती कायम

शिंदे सरकारकडून जो अविर्भाव आणला जात आहे तो दिखावून आहे, पण जनतेसमोर गेल्यावर काय होईल याची धास्तीही त्यांच्या मनात आहे. त्यामुळेच होऊ घातलेल्या निवडणूका दिवसेंदिवस लांबणीवर पडत आहेत. मुंबई महापालिका निवडणूक लवकर लागली तर पंचाईत होईल असेही काही लोकांना वाटत असल्याचे म्हणत त्यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.