AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समाजसेवक अण्णा हजारे संतापले … शिष्य अरविंद केजरीवाल यांना पत्रातून या मुद्द्यावर खडसावलं…

या पत्राविषयी माध्यमांशी बोलताना अण्णा हजारे म्ङणाले, ' केजरीवाल मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी दारूबंदीची जी पॉलिसी केली, ती अत्यंत चुकीची आहे. प्रत्येक वॉर्डात दारुचं दुकान उघडायचं आणि दारू पिाणाऱ्यांना 25 वर्ष वय होतं ते 21 वर्ष आणलं.

समाजसेवक अण्णा हजारे संतापले ... शिष्य अरविंद केजरीवाल यांना पत्रातून या मुद्द्यावर खडसावलं...
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 30, 2022 | 5:25 PM
Share

अहमदनगर । नेहमी शांततेच्या मार्गाने प्रतिक्रिया देणार समाजसेवक अण्णा हजारे आज संतापल्याचं दिसून आलंय. तेसुद्धा त्यांचे एकेकाळचे शिष्य अरविंद केजरीवाल (Arvind kejariwal) यांच्यावर. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या दारुविषयक नव्या धोरणावरून अण्णा हजारेंनी (Anna Hajare) आगपाखड केली आहे. गांधीजींच्या विचारांवरून प्रेरणा घेत तुम्ही समाजकारण आणि राजकारण सुरु केलं होतं. लोकांच्या तुमच्याकडून अपेक्षा होत्या. मात्र मुख्यमंत्री (Delhi CM) झाल्यानंतर तुम्ही हे विसरलात. तुम्हाला सत्तेची नशा चढली आहे, अशा शब्दात अण्णा हजारेंनी अरविंद केजरीवाल यांना सुनावलं आहे. अण्णा हजारेंनी अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिलंय..

पत्रातला मजकूर काय?

पत्रात अण्णा हजारेंनी लिहिलंय, दिल्ली सरकारच्या दारुविषयक धोरणांच्या बातम्या वाचून खूप दुःख होतंय. मी ४७ वर्षांपासून भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करतोय. महाराष्ट्रात भ्रष्टाचाराविरोधात मी लढा दिला. गावातील अनेक दारुभट्ट्या बंद केल्या. लोकपाल आंदोलनात आपण एकत्र काम केले. तेव्हा तुम्ही मनीष सिसोदियांसोबत अनेकदा राळेगणसिद्धीत आला आहात. येथील दारुबंदी पाहिल्यानंतर तुम्ही प्रभावित झाला होतात. पण दिल्ली सरकारने नवेच धोरण आणले आहे. यामुळे दारु विक्री आणि दारु पिण्याला प्रोत्साहन मिळू शकते. यामुळे भ्रष्टाचारही वाढू शकतो. एका आंदोलनातून जन्मलेल्या राजकीय पार्टीला हे शोभत नाही…. letter

अण्णा हजारेंची प्रतिक्रिया काय?

या पत्राविषयी माध्यमांशी बोलताना अण्णा हजारे म्ङणाले, ‘ केजरीवाल मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी दारूबंदीची जी पॉलिसी केली, ती अत्यंत चुकीची आहे. प्रत्येक वॉर्डात दारुचं दुकान उघडायचं आणि दारू पिाणाऱ्यांना 25 वर्ष वय होतं ते 21 वर्ष आणलं. दारूने बर्बाद होते. मला दुःख झालं. पहिल्यांदा मी अरविंदच्या विरोधात अशा प्रकारची नोट काढली. माझी अपेक्षा आहे, मी बोलत होतो, तुम्ही मला गुरू गुरू म्हणत होते. कुठे गेले ते विचार? असा सवाल अण्णा हजारे यांनी केलाय.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.