NCP Merger : सुनेत्रा पवारांच्या पक्षात काहीजण अस्वस्थ, उद्या शरद पवारांना भेटणार; विलिनीकरणाच्या चर्चेत वेगवान घडामोडी
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सध्या नेमकं काय सुरू आहे? पक्षात दोन गट पडल्याचा दावा करत विकास लवांडे यांनी विलीनीकरणाच्या चर्चेवरही भाष्य केलं आहे. शरद पवारांची भूमिका काय, हेही त्यांनी स्पष्ट केलं.

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या धुसफूस सुरू असल्याचा दावा विकास लवांडे यांनी केला आहे. पक्षात दोन गट पडल्याचेही ते म्हणाले. विलीनीकरणाबाबत त्यांनी काय सांगितले आहे.
नेमकं काय म्हणाले विकास लवांडे?
सध्या अजितदादांच्या पक्षामध्ये धुसफूस सुरू आहे. पक्षांमध्ये सध्या आलबेल नाही. निश्चितच दोन गट पडले आहे, असं स्पष्टपणे दिसत आहे. उद्या काही नेते भेटत आहेत, परंतु याचा अर्थ लगेच विलीनीकरण होणे असा नाही. पवार साहेबांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं आहे आम्ही कोणाबरोबर जाणार नाही. ज्यांना कुणाला सोबत यायचं असेल तर आमच्यासोबत यावे, असं पवार साहेबांनी स्पष्टपणे सांगितले आहे. आमच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी स्पष्टपणे वेळोवेळी सांगितले आहे, की विलीनीकरण होणार नाही. परंतु अजित पवारांच्या पक्षातील काहीजण अस्वस्थ आहेत हे नक्की आहे, असं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी म्हटलं आहे.
बातमी अपडेट होत आहे…