इंदापुरात राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचा हर्षवर्धन पाटलांना पाठिंबा

| Updated on: Oct 15, 2019 | 12:18 PM

राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी (NCP supports Harshvardhan patil) मेळावा घेत हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. तर इंदापूर तालुक्यातील धनगर समाजातील नेत्यांनीही हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा दिलाय.

इंदापुरात राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचा हर्षवर्धन पाटलांना पाठिंबा
Follow us on

बारामती : राष्ट्रवादीला इंदापूर मतदारसंघात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. इंदापूरच्या विधासभेच्या अटीतटीच्या लढाईत भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील (NCP supports Harshvardhan patil) यांचं पारडं जड होताना दिसून येत आहे. कारण, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी (NCP supports Harshvardhan patil) मेळावा घेत हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. तर इंदापूर तालुक्यातील धनगर समाजातील नेत्यांनीही हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा दिलाय.

राष्ट्रवादीचे मोठे नेते सभापती आप्पासाहेब जगदाळेंसह राष्ट्रवादीचे इतर नेत्यांसह हजारो कार्यकर्यांनी भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला. राष्ट्रवादीचे उमेदवार दत्तात्रय भरणे गेल्या पाच वर्षात इंदापूर तालुक्याच्या शेतीच्या पाण्यासाठी पाणी आणण्यात अपयशी ठरले आहेत. ते निष्क्रिय आमदार असून त्यांना यावेळची राष्ट्रवादीची उमेदवारी देऊ नये. असा सूर या नेत्यांनी केला होता. मात्र पक्षाने भरणे यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या या नेत्यांनी भव्य मेळावा घेत भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा जाहीर.

दुसरीकडे धनगर समाजाने निमगाव केतकी या भागात मेळावा घेत हर्षवर्धन पाटील यांना घोंगडे, काठी देत पाठिंबा दिला. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचा मार्ग सुखर होत चालल्याचं चित्र निर्माण होत आहे. इंदापूरच्या जागेवरुनच हर्षवर्धन पाटलांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता. आता इंदापुरातच राष्ट्रवादीला घेरण्याची रणनिती हर्षवर्धन पाटील यांनी आखली आहे.