नोटाबंदीप्रमाणे आता नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी रांगा लावाव्या लागतील : सोनिया गांधी

| Updated on: Dec 20, 2019 | 8:12 PM

नागरिकता सुधारणा कायदा हा पक्षपाती आहे. काँग्रेसपक्ष या कायद्याचा तीव्र निषेध करतो. संविधानाची मर्यादा अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेस बांधिल आहे

नोटाबंदीप्रमाणे आता नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी रांगा लावाव्या लागतील : सोनिया गांधी
Follow us on

नवी दिल्ली : “केंद्र सरकार नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. लोकशाहीत नागरिकांचा आवाज दाबणे चुकीचं आहे. जनतेचा आवाज ऐकणे सरकारचं कर्तव्य आहे”, अशा शब्दांत काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन मोदी सरकारला खडसावलं आहे (Sonia Gandhi On CAA). “भाजप सरकारची धोरणं देशविरोधी आहेत. काँग्रेस देशातील जनता आणि संविधानाच्या बाजूने आहे”, असं सोनिया गांधी म्हणाल्या (Sonia Gandhi On CAA).

“नागरिकांचं म्हणणं ऐकूण घेणं सरकारचं कर्तव्य आहे. सध्या जे घडत आहे ते लोकशाहीत स्वीकारलं जाऊ शकत नाही”, असं मत सोनिया गांधी यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीवर व्यक्त केलं (Sonia Gandhi On CAA).

“नागरिकता सुधारणा कायदा हा पक्षपाती आहे. काँग्रेसपक्ष या कायद्याचा तीव्र निषेध करतो. संविधानाची मर्यादा अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेस बांधिल आहे”, असंही सोनिया गांधी म्हणाल्या.

“नागरिकत्व सुधारणा कायदा हा भेदभाव करणारा आहे. नोटाबंदीप्रमाणे पुन्हा एकदा एक-एक व्यक्तीला स्वत:चं आणि आपल्या पूर्वजांचं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी रांगेत लागावं लागेल”, असं म्हणत सोनिया गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला.

महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काच्या रक्षणासाठी राज्य सरकार समर्थ : मुख्यमंत्री

देशात सध्या नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे (CAA). मात्र, या कायद्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने घाबरण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील जनतेचे हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, त्यांच्या हक्काच्या रक्षणासाठी राज्य सरकार समर्थ आहे, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपुरात दिलं (CM Uddhav Thackeray on CAA).

“सर्वोच्च न्यायालयात हा कायदा योग्य की अयोग्य याबाबतचा निर्णय व्हायचा आहे. मी अनेकांशी बोलत आहे. मला भेटल्यानंतर अनेकांचे गैरसमज दूर होत आहेत. कोणत्याही समाजातील नागरिकाने भीती, गैरसमज बाळगू नये. महाराष्ट्रातील सलोखा कायम ठेवा”, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.