मुलायम सिंहांची तब्येत बिघडली, रात्री उशिरापर्यंत उपचार सुरु

| Updated on: Jun 10, 2019 | 8:52 AM

समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना रविवारी सायंकाळी तात्काळ रुग्णायलात दाखल करण्यात आले.

मुलायम सिंहांची तब्येत बिघडली, रात्री उशिरापर्यंत उपचार सुरु
Follow us on

लखनऊ : समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना रविवारी सायंकाळी तात्काळ रुग्णायलात दाखल करण्यात आले. लखनऊच्या राम मनोहर लोहिया इन्स्टिट्युट या रुग्णालयात रात्री उशिरा पर्यंत त्यांच्यावर उपचार सुरु होते. रक्तातील साखर वाढल्याने त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिरावल्याने रात्री उशिरा त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. मात्र, अशी अचानक सपा प्रमुखांची प्रकृती बिघडल्याने कार्यकर्त्ये चिंतातूर झाले होते.

डॉक्टर काय म्हणाले?

डॉ. भूवन चंद्र तिवारी यांनी मुलायम सिंह यांच्यावर उपचार केले. मुलायम सिंहांना हाय शुगरची समस्या उद्भवली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना हायपर ग्लायसिमिया (हायपर टेन्शन) आणि हायपर डायबिटीजची समस्या आहे. त्यांना लोहिया इन्स्टिट्युटच्या दुसऱ्या मजल्यावर प्रायव्हेट वार्डात दाखल करण्यात आलं होतं. सध्या त्यांची रिपोर्ट आल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती डॉ. भुवन चंद्र तिवारी यांनी दिली.

शिवपाल सिंहांनीही रुग्णालय गाठलं

मुलायम सिंह यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळताच त्यांचे भाऊ शिवपाल सिंह यादव यांनी तात्काळ रुग्णालय गाठलं. शिवपाल सिंह हे पुन्हा सपामध्ये जाण्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.

काहीच दिवसांपूर्वी मुलायम सिंह यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता पुन्हा त्यांची प्रकृती खालावल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या :

उद्धव ठाकरे दहा वेळा अयोध्येला गेले तरी राम मंदिर अशक्य : रामदास आठवले

पवार काका-पुतणे आणि सुप्रिया सुळे एकत्रितपणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

‘चाणक्य’ प्रशांत किशोर आता ममता बॅनर्जींसाठी काम करणार

अमित शाहांकडून विधानसभेसाठी मुख्यमंत्री फडणवीसांना ‘टार्गेट’