AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्पेशल रिपोर्ट : चंद्राबाबू मोदींचा खेळ बिघडवणार?

नवी दिल्ली : सातव्या टप्प्यातील मतदान सुरु असताना, मोदी देवदर्शनात मग्न आहे. पण त्याचवेळी विरोधीपक्षांनी मात्र निकालानंतरची जुळवाजुळव सुरु केल्याचं चित्रं आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे विरोधकांना एकत्र आणण्याचं काम करत आहेत. चंद्राबाबू गटातटात विखुरलेल्या विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नाही, तर अशा परिस्थितीत चंद्राबाबू नायडू किंगमेकर […]

स्पेशल रिपोर्ट : चंद्राबाबू मोदींचा खेळ बिघडवणार?
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM
Share

नवी दिल्ली : सातव्या टप्प्यातील मतदान सुरु असताना, मोदी देवदर्शनात मग्न आहे. पण त्याचवेळी विरोधीपक्षांनी मात्र निकालानंतरची जुळवाजुळव सुरु केल्याचं चित्रं आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे विरोधकांना एकत्र आणण्याचं काम करत आहेत. चंद्राबाबू गटातटात विखुरलेल्या विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नाही, तर अशा परिस्थितीत चंद्राबाबू नायडू किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे.

बातमीतील महत्त्वाचे मुद्दे :

  • चंद्राबाबूंकडून विरोधांची मोट बांधण्याचे प्रयत्न
  • मतदानाच्या शेवटच्या दिवशी चंद्राबाबूंकडून मॅरनेथॉन भेटी
  • सोनिया गांधी, शरद पवार, राहुल गांधींसहसह ममता-मायावतींचीही भेट
  • मतभेद विसरुन सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न

लोकसभा निवडणुकीच्या आधी सर्व मोदीविरोधक एकत्र येणार अशी जोरदार चर्चा होती. पण प्रत्यक्षात मात्र तसं घडलं नाही. उत्तर प्रदेशात मायावती आणि अखिलेश यादवांनी आघाडी करत काँग्रेसला एकाकी पाडलं. तर तिकडे पश्चिम बंगालमध्ये ममता आणि काँग्रेसमध्ये बेबनाव कायम राहिला. पण आता निवडणूक संपल्यानंतर सर्व विरोधक एकत्र येण्याची शक्यता आहे आणि विरोधकांना एकत्र आणण्याची धडपड करत आहेत, ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू.

एनडीएतून बाहेर पडल्यापासून चंद्राबाबू नायडूंनी मोदी आणि भाजपविरोधात रणशिंग फुंकलं आहे. त्यामुळे त्यांनी वेळोवेळी मोदी विरोधकांना एकत्र आणण्यासाठी धडपड केली होती. आता निकालाच्या तोंडावर चंद्राबाबू पुन्हा एकदा विरोधकांना एकत्र आणण्यासाठी सक्रीय झाले आहे. सातव्या टप्प्यातील प्रचारांची सांगता होताच, चंद्राबाबूंनी विरोधी पक्षातील वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत.

चंद्राबाबूंनी गेल्या दोन दिवसात कुणा-कुणाच्या भेटी घेतल्या?

  • यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी
  • काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी
  • राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार
  • भाकप नेते सुधाकर रेड्डी
  • भाकप नेते डी. राजा
  • माकपचे महासचिव सीताराम येचुरी
  • एलजेडी प्रमुख शरद यादव
  • तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी
  • आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल
  • बसपा प्रमुख मायावती
  • सपाचे नेते अखिलेश यादव

विशेष म्हणजे, रविवारी (19 मे) सलग दुसऱ्या दिवशी चंद्राबाबू नायडूंनी दिल्लीत विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेत, सत्तेची गणित जुळवण्याचे प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं.

निकालाच्या दिवशी चंद्राबाबूंच्या मॅरेनथॉन बैठका

  • सकाळी 10:30 वाजता चंद्रबाबूंनी पुन्हा एकदा राहुल गांधींची भेट घेतली.
  • सकाळी 11:00 वाजेच्या सुमारास सलग दुसऱ्या दिवशी ते शरद पवारांसोबत चर्चा करताना दिसले.
  • सकाळी 30 वाजेच्या सुमारास त्यांनी आंध्र भवनमध्ये अनेक प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांशी बैठक घेतली.
  • दुपारी15 वाजता त्यांनी माकप नेते सीताराम येचुरींशी चर्चा केली.

विशेष म्हणजे, दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास चंद्राबाबूंनी सोनिया गांधींचीही भेट घेऊन निकालानंतरच्या स्थितीवर खलबतं केली. त्यामुळे चंद्राबाबूंचा हा भेटींचा सिलसिला, त्यांची रणनिती स्पष्ट करतो. भाजप बहुमताच्या आकड्यापासून दूर राहिल्यास, सर्व विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी चंद्राबाबू जोरदार प्रयत्न करतत आहेत.

विरोधकांमधील मतभेद, मनभेद दूर करून केवळ मोदींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी चंद्राबाबूंचे प्रयत्न आहेत. त्यामुळे 2019 मध्ये भाजप किंवा काँग्रेसला बहुमत न मिळाल्यास तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून चंद्राबाबू केवळ किंगमेकर ठरणार, हे निश्चित.

कोण आहेत चंद्राबाबू?

चंद्राबाबू नायडू हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख आहेत. आंध्रप्रदेशच्या चंद्रागिरी मतदारसंघातून काँग्रेसमधून 1978 मध्ये आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 1982 मध्ये तेलुगू देसम पक्षाची स्थापना केली. 1 सप्टेंबर 1995 मध्ये चंद्राबाबू नायडू हे पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. 1995 ते 2004 मध्ये संपूर्ण आंध्रप्रदेशचे ते मुख्यमंत्री होते. त्यानंतर 2004 ते 2014 पर्यंत त्यांनी विरोधी पक्षनेते पद भूषवले. त्यानंतर 2014 साली पुन्हा एकदा आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.