किशोरी पेडणेकर यांना दणका, ‘त्या’ चार सदनिकांवर टाच येणार; एसआरएचे महापालिकेला आदेश काय?

पेडणेकर परिवाराने वरळी गोमाता जनता एसआरए येथील 4 सदनिकांवर बेकायदेशीरपणे कब्जा केल्याची माझी तक्रार होती. पुढील आठवड्यात हे निष्कासन होणार आहे, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.

किशोरी पेडणेकर यांना दणका, त्या चार सदनिकांवर टाच येणार; एसआरएचे महापालिकेला आदेश काय?
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना दणका, 'त्या' चार सदनिकांवर टाच येणार; एसआरएचे महापालिकेला आदेश काय?
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 19, 2022 | 10:13 AM

मुंबई: मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांना एसआरएने दणका दिला आहे. किशोरी पेडणेकर यांच्या वरळीतील चार सदनिका ताब्यात घेण्याचे आदेश एसआरएने मुंबई महापालिकेला दिले आहेत. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांच्यासाठी हा पहिला मोठा झटका मानला जात आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर एसआरएने हे आदेश दिले आहेत.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्या चार सदनिकांविषयी एसआरएमध्ये तक्रार केली होती. पेडणेकर यांनी या सदनिका बळकावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या बेनामी सदनिकांवर कारवाई करा, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली होती. त्यानंतर एसआरएने महापालिकेला हे आदेश दिले आहेत.

किशोरी पेडणेकर यांनी वरळी गोमाता जनता येथे चार सदनिका बेनामी ताब्यात घेतल्या होत्या. त्याविरोधात एसआरएने आदेश दिला आहे. मुंबई महापालिकेने या बेनामी सदनिका चार दिवसात ताब्यात घ्याव्यात असे आदेश दिल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

एसआरए अधिकार्‍यांनी किशोरी पेडणेकर, किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस आणि बेनामी सहकारी विरुद्ध कलम 3ए अंतर्गत या सदनिकांचे निष्कासन करण्याचे आदेश दिले आहेत.

 

पेडणेकर परिवाराने वरळी गोमाता जनता एसआरए येथील 4 सदनिकांवर बेकायदेशीरपणे कब्जा केल्याची माझी तक्रार होती. पुढील आठवड्यात हे निष्कासन होणार आहे, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.