Video:चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल?-राज्यपाल कोश्यारी

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव तसेच राजभाषा मराठी दिनाचे औचित्य साधून औरंगाबाद येथे आयोजित श्री समर्थ साहित्य संमेलनाचे उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. त्यावेळी बोलताना राज्यपाल कोश्यारी यांनी समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा दाखला देत एक वक्तव्य केलं आहे.

Video:चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल?-राज्यपाल कोश्यारी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
Image Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Feb 27, 2022 | 10:37 PM

औरंगाबाद : अमरावती आणि धुळे येथे छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्यावरुन मोठा वाद पाहायला मिळाला. त्यानंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्या एका वक्तव्यावरुनही पुन्हा एकदा वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव तसेच राजभाषा मराठी दिनाचे औचित्य साधून औरंगाबाद (Aurangabad) येथे आयोजित श्री समर्थ साहित्य संमेलनाचे उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. त्यावेळी बोलताना राज्यपाल कोश्यारी यांनी समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा दाखला देत एक वक्तव्य केलं आहे.

भगतसिंह कोश्यारी नेमकं काय म्हणाले?

“चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? शिवाजीला किंवा चंद्रगुप्ताला छोटं नाही म्हणत आहे मी. पण गुरुचं आपल्या समाजात मोठं स्थान असतं. छत्रपतींनी समर्थांना म्हटलं की, राज्य मला तुमच्या कृपेने मिळालंय. आपल्याकडे गुरुला गुरुदक्षिणा देण्याची परंपरा आहे. त्याच भावनेतून छत्रपती शिवाजी महाराज समर्थांना म्हणाले की, ‘या राज्याची चावी मी तुम्हाला देतो’ त्यावर समर्थ म्हणाले की, ‘ही राज्याची चावी मला कुठे देता. तुम्हीच याचे ट्रस्टी आहात”, असं वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केलं आहे.

वादाची शक्यता का?

बहुतांश इतिहास अभ्यासक आणि इतिहासकारांच्या मते 1672 पूर्वी शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची भेट झाल्याचे उल्लेख नाहीत. त्यामुळे स्वराज्य निर्मितीच्या काळात, तसेच शिवाजी महाराज यांच्या बालपणी रामदासांनी मार्गदर्शन केले असावे याबाबत पुरावे सापडत नसल्याचं मत काही इतिहासकार व्यक्त करतात. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही जानेवारी 2020 मध्ये रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांच्याबाबत बोलताना ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड नीट अभ्यासला तर त्या काळात रामदास नव्हते’, असं वक्तव्य केलं होतं.

इतर बातम्या : 

‘एक रुपया जरी खाल्ला असेल तर धैर्यवर्धन पुंडकरांच्या घरासमोर हात कलम करेन!’ आरोप फेटाळत बच्चू कडूंचा पलटवार

‘मातोश्री’चं नाव दिल्ली ठेवण्याचा विचार दिसतो! सदाभाऊ खोतांचा आदित्य ठाकरेंना जोरदार टोला