भाजपकडून वाचाळवीरांची दखल, अखेर अमित शाह बोलले!

नवी दिल्ली : महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेबाबत वक्तव्य करण्यात भाजप नेत्यांमध्ये जणू स्पर्धाच लागली आहे. भाजपची भोपाळ लोकसभेची उमेदवार प्रज्ञा ठाकूरने तर नथुराम गोडसेला देशभक्त म्हटलं. चहूबाजूच्या टीकेनंतर तिने माफी मागितली. त्यानंतर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांनी प्रज्ञा ठाकूरच्या वक्तव्याचं समर्थन केलं, तसंच तिने माफी मागण्याची गरज नसल्याचं म्हटलं. मात्र काही […]

भाजपकडून वाचाळवीरांची दखल, अखेर अमित शाह बोलले!
| Updated on: Jul 05, 2019 | 3:37 PM

नवी दिल्ली : महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेबाबत वक्तव्य करण्यात भाजप नेत्यांमध्ये जणू स्पर्धाच लागली आहे. भाजपची भोपाळ लोकसभेची उमेदवार प्रज्ञा ठाकूरने तर नथुराम गोडसेला देशभक्त म्हटलं. चहूबाजूच्या टीकेनंतर तिने माफी मागितली. त्यानंतर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांनी प्रज्ञा ठाकूरच्या वक्तव्याचं समर्थन केलं, तसंच तिने माफी मागण्याची गरज नसल्याचं म्हटलं. मात्र काही वेळातच अनंतकुमार हेगडेंनी आपलं ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचं स्पष्टीकरण दिलं.

या सर्व पार्श्वभूमीवर भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी अखेर आपली प्रतिक्रिया दिली. नथुराम गोडसेबाबत भाजप नेत्यांनी जी वक्तव्ये केली आहेत, ती त्यांची वैयक्तिक आहेत, त्याच्याशी पक्षाचं देणंघेणं नाही, असं ट्विट अमित शाह यांनी केलं. प्रज्ञा ठाकूर आणि नलीन कटील यांच्या वक्तव्याशी पक्षाचा संबंध नाही, असं अमित शाह म्हणाले.


इतकंच नाही तर अमित शाहांनी या नेत्यांवर कारवाईचे संकेतही दिले. भाजपची अनुशासन समिती या तीनही नेत्यांकडून उत्तर मागेल, तसंच त्यांना दहा दिवसांच्या आत अहवाल देण्यास बजावलं आहे, असं अमित शाहांनी म्हटलं.


अमित शाह एका ट्विटमध्ये म्हणतात, “या लोकांनी आपली वक्तव्ये मागे घेतली आहेत. त्यांनी माफीही मागितली आहे. मात्र पक्षाची प्रतिष्ठा आणि विचारधारेमुळे पक्षाने त्यांची ही वक्तव्ये गांभीर्याने घेतली आहेत”

नथुराम गोडसे देशभक्त

भाजपची भोपाळची उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूरने महात्मा गांधींचा हत्यारा नथुराम गोडसे देशभक्त होता, आहे आणि राहील असं म्हटलं होतं. तिच्या या वक्तव्याने देशभरात संतापाची लाट उठली. त्यानंतर प्रज्ञा ठाकूरने माफी मागितली.

यानंतर केंद्रीय मंत्री अनंत हेगडेंनी ट्विट करत, प्रज्ञा ठाकूरचं वक्तव्य योग्य असल्याचं म्हटलं होतं. जवळपास 7 दशकांनी आज नवी पिढी या मुद्द्यावर चर्चा करत आहे. साध्वी प्रज्ञाने माफी मागण्याची गरज नाही, असं  म्हटलं होतं.