राजेंद्र आज असा नटलाय, लग्नात सुद्धा इतका नटला नव्हता : अजित पवार

| Updated on: Jan 31, 2020 | 12:45 PM

अजित पवार म्हणाले, “राजेंद्र (उपसरपंच) आज असा नटलाय की त्याच्या लग्नात देखील तो नटला नव्हता. आम्ही साधेच आहोत”

राजेंद्र आज असा नटलाय, लग्नात सुद्धा इतका नटला नव्हता : अजित पवार
Follow us on

नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नाशिकमध्ये भल्या पहाटे विकासकामांचं भूमिपजून केलं. या उद्घाटन आणि भूमिपूजन सोहळ्यादरम्यान केलेल्या भाषणात, अजित पवारांनी टोलेबाजी (Ajit Pawar on Early Morning Oath Ceremony) करत धमाल उडवून दिली. सकाळी 8 च्या आधी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होत असल्याने, अनेकांची तारांबळ उडाली. त्यावरुन अजित पवारांनी आपण पहाटे पहाटे शपथ घेत असतो (Ajit Pawar on Early Morning Oath Ceremony) असं म्हणत फडणवीसांसोबतच्या शपथेची आठवण करुन देताच, हास्यकल्लोळ झाला.

अजित पवारांनी आधी दिंडोरीतील कादवा इंग्लिश स्कूलच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन केलं. त्यानंतर त्यांनी वरखेडा ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजनाला हजेरी लावली.

यावेळी अजित पवार म्हणाले, “एखाद्या ग्रामपंचायत कार्यालयाला लिफ्ट असते हे मी इथेच पाहिलं”. या कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंचांसह गावकरी उपस्थित होते. अजित पवारांनी उपसरपंचांच्या पेहरावावरुनही टोलेबाजी केली. राजेंद्र (उपसरपंच) आज असा नटलाय की लग्नात सुद्धा इकता नटला नसेल, असं अजित पवार म्हणताच, उपस्थित हसून हसून लोटपोट झाले.

अजित पवार म्हणाले, “राजेंद्र (उपसरपंच) आज असा नटलाय की त्याच्या लग्नात देखील तो नटला नव्हता. आम्ही साधेच आहोत”

‘अरे काय पाहिजे सांग, मी द्यायला बसलोय’

आघाडीचं सरकार आहे, मात्र  ग्रामविकास, जलसंपदा, वित्त नियोजन, अन्न नागरी पुरवठा खातं पवारसाहेबांनी राष्ट्रवादीकडे घेतले. अरे काय पाहिजे सांग, मी द्यायला बसलोय सांग, असं अजित पवार म्हणाले.

ग्रामपंचायतीला लिफ्ट इथेच पाहिली

बारामती चांगली करण्याचा प्रयत्न करतोय. पण ग्राम पंचायतीच्या कार्यालयाला लिफ्ट मी इथे पाहिली, असं ते म्हणाले.

2 लाखांवरील कर्ज

बळीराजाला कर्जमाफी देण्याचा प्रयत्न करतोय. 2 लाखांच्यावर पीक कर्ज घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. 2 लाखांवर कर्ज असलेल्या शेतकऱयांना कर्जमाफ करण्याचा प्रयत्न करतोय. पण 2 लाखांवर ज्यांचे कर्ज आहे ,त्यांनी देखील थोडे भरावं. शेतकरी समाज ही आपली जात आहे. आपण मुद्दाम कोणाचं नुकसान करत नाही. आम्ही पण पीक कर्ज काढतो, पण ते वेळेत फेडतो. 1700 कोटी रुपये नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून दिलं जायचं, असं अजित पवार म्हणाले.

पोलीस भरती

महागाई, बेकारी वाढली आहे. पोलीस भरती आता सुरु करतो आहे. पहिल्या टप्प्यात 8 हजार पोलिसांची भरती करणार. याशिवाय विविध विभागात नोकरभरती करावी लागणार आहे. रोजगार निर्मितीसाठी कौशल्य विकासाचा कार्यक्रम राबवतो आहे. शपथ घेऊन एक महिन्याच्या वर झाले आहेत. सकाळी लवकर आणखी एक कार्यक्रम करून आलो. जितक्या कमी वेळात समाजाचं भलं करता येईल अशा प्रकारे काम करतो आहे, असं अजित पवारांनी सांगितलं.

गावाकडे लक्ष देणारं सरकार

गेल्या सरकारने ग्रामीण भागाकडे लक्ष दिलं नाही. गावाकडे बघण्यासाठी कोणी तयार नव्हता. आता मात्र गावाकडे लक्ष देणारं सरकार आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सरकार काम करत आहे, बातम्यांकडे लक्ष देऊ नका, असा सल्ला अजित पवारांनी दिला.

तीन पक्षांचं सरकार आलंय, दोन पक्षांचं असतं तर जास्त मंत्रिपदे मिळाले असती. साहेबांचं लक्ष आहे. सगळ्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करतोय, असंही अजित पवारांनी नमूद केलं.

देशात तणावाचं वातावरण

महागाईवरुन लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी देशात तणावाचे वातावरण निर्माण केलं जातं आहे. आवश्यकता नसताना कांद्याची आयात केली जाते आहे. आम्ही काही नव्याच्या नऊ दिवसांसाठी आलेलो नाही, असं अजित पवार म्हणाले.

संबंधित बातम्या 

हा सकाळी लवकर शपथ घेत असतो; नाशिकच्या थंडीत भल्या पहाटे अजित पवारांची टोलेबाजी