AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुजयला पाडणं माझं कर्तव्य, विखेंचा सख्खा भाऊ संग्राम जगतापांच्या मदतीला

अहमदनगर : अहमदनगरच्या राजकारणाला आता वेगळी कलाटणी मिळाली आहे. शिवसेना भाजप युतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचे काका आघाडीच्या घोटात सामील झाले आहेत. चुलते अशोक विखे पाटील यांनी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला पाठींबा दिला आहे. अशोक विखेंनी आघडीचे उमेदवार संग्राम जगताप यांचे वडील आमदार अरुण जगताप यांची भेट घेतली. आमदार अरुण जगताप आणि अशोक विखेंमध्ये निवडणुकी संदर्भात […]

सुजयला पाडणं माझं कर्तव्य, विखेंचा सख्खा भाऊ संग्राम जगतापांच्या मदतीला
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM
Share

अहमदनगर : अहमदनगरच्या राजकारणाला आता वेगळी कलाटणी मिळाली आहे. शिवसेना भाजप युतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचे काका आघाडीच्या घोटात सामील झाले आहेत. चुलते अशोक विखे पाटील यांनी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला पाठींबा दिला आहे. अशोक विखेंनी आघडीचे उमेदवार संग्राम जगताप यांचे वडील आमदार अरुण जगताप यांची भेट घेतली. आमदार अरुण जगताप आणि अशोक विखेंमध्ये निवडणुकी संदर्भात अनेक विषयांवर चर्चा झाली. अशोक विखे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

यावेळी बोलताना अशोक विखे यांनी मी आणि अरुण जगताप बालमित्र आहे. मात्र सुजय, राधाकृष्ण विखे पाटील आणि शालिनी विखे यांचं राजकारण अन्यायकारक असल्याचा आरोप अशोक यांनी केला. हे आमच्यातील महाभारत असून न्याय आणि नितीचा लढा असल्याचा दावा अशोक विखेंनी केला आहे.

सुजयविरोधात प्रचार करणार

दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांचे मोठे बंधू अशोक विखे आता डॉ सुजय विखेंच्या विरोधात प्रचार सुरु करणार आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात विखे कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला आहे. तीनच दिवसांपूर्वी अशोक विखे पाटील यांनी टीव्ही 9 मराठीला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत भाऊ राधाकृष्ण विखेंवर खळबळजनक आरोप केले होते.

राधाकृष्ण विखेंच्या संस्थेने झाकीर नाईक यांच्या संस्थेकडून 2 कोटींचा फंड घेतल्याचा आरोप अशोक विखे पाटील यांनी केला होता. तसेच भाजपने अनेक प्रकरणातून राधाकृष्ण विखे पाटलांना वाचवल्याचा दावा त्यांनी केला. त्याचबरोबर सुजय विखे विकासाचा दावा करत आहेत, मात्र सर्व खोटे असल्याचं त्यांनी म्हटलंय.  कोण निवडून येतं याच्याशी मला कर्तव्य नाही, सुजय विखेंना पाडणे याच्याशी हे माझं कर्तव्य आहे, असं ते म्हणाले होते. निवडणूक संपेपर्यंत मी जिल्ह्यात मुक्काम करणार असून, सुजय विखेंविरुद्ध प्रचार करणार असल्याचे त्यांनी म्हटलंय.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?