‘दुनिया घुम लो, हमारे पुणे के आगे कुछ नहीं’; सुप्रिया सुळेंची मोदींवर खोचक टीका

| Updated on: Nov 28, 2020 | 5:31 PM

शेवटी पुण्यातच लस तयार होत आहे. ही लस पुणेकरांनी शोधली आहे नाहीतर कोणीतरी म्हणायचं मीच (स्वतःबाबत) शोधली अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी मोदींवर निशाणा साधला आहे.

दुनिया घुम लो, हमारे पुणे के आगे कुछ नहीं; सुप्रिया सुळेंची मोदींवर खोचक टीका
Follow us on

पुणे : ‘दुनिया घुम लो, हमारे पुणे के आगे कुछ नहीं’ अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदींच्या पुणे दौऱ्यावर टीका केली आहे. एक लाख कोटींच्यावर गप्पा मारणारे आज पुण्यात आहेत. शेवटी पुण्यातच लस तयार होत आहे. ही लस पुणेकरांनी शोधली आहे नाहीतर कोणीतरी म्हणायचं मीच (स्वतःबाबत) शोधली अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी मोदींवर निशाणा साधला आहे. त्या पुण्यात आयोजित मेळाव्यामध्ये बोलत होत्या. (Supriya Sule criticizes on pm narendra Modi visit pune for review corona vaccine)

देशभरात कोरोना लसीची निर्मिती आणि त्याच्या वितरणाची जोरदार तयारी सुरू असताना या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (28 नोव्हेंबर 2020) पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले आहेत. यावरच सुप्रिया सुळे यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. कोरोनाची लस पुण्यामध्येच तयार झालेली आहे. पुणेकरांनी ती लस शोधलेली आहे. त्यामुळे बाहेरून येऊन लसीवर कोणी क्लेम केलं तर गैरसमज नसावेत असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले असून मोदी कॉन्फरन्सिंगद्वारे शास्त्रज्ञांशी संवाद साधणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर लसीची चाचणी, त्याचे वितरण याचीही माहिती घेणार आहेत. (Supriya Sule criticizes on pm narendra Modi visit pune for review corona vaccine)

खरंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील तीन शहरांचा दौरा केला. मोदींनी अहमदाबाद, पुणे आणि हैदराबाद या तीन शहरांचा दौरा केला. या तिन्ही ठिकाणी कोरोना लसीच्या निर्मिती केली जात आहे. त्यानुसार मोदींनी कोरोना लसीच्या प्रगतीचा आढावा घेतला. पंतप्रधान मोदींचा दौरा अहमदबादमधील जेडियस बायोटेक पार्क या ठिकाणाहून सुरू केला. त्यानंतर ते पुण्यात आले आहेत. पुण्यानंतर मोदी हैदराबादमधील भारत बायोटेक या ठिकाणी भेट देणार आहे. भारत बायोटेक ही कंपनी कोरोनाची स्वदेशी लसीची निर्मिती करत आहे.

इतर बातम्या –

पवारांना नोटीस आली अन् चित्रं बदललं, आता शिवसेनेलाही नोटीस आलीय, ईडीचा पायगुण चांगला; येऊ द्या नोटीसा: सुप्रिया सुळे

नव्या नवरीच्या बांगड्या वाजतात, पण तीच नवरी वर्षभराने घराची मालकीण होते; सुप्रिया सुळेंचा टोला

(Supriya Sule criticizes on pm narendra Modi visit pune for review corona vaccine)