Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा ताफा मुस्लिम नगरसेवक, कार्यकर्त्यांनी अडवला! उस्मानाबाद दौऱ्यात नाराजीनाट्य

| Updated on: May 29, 2022 | 2:09 PM

सुळे यांनी मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळाला भेट न दिल्याने कार्यकर्ते नाराज असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांनी नाराजी दूर करण्यासाठी नंतर मनधरणीचे प्रयत्नही केलेत.

Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा ताफा मुस्लिम नगरसेवक, कार्यकर्त्यांनी अडवला! उस्मानाबाद दौऱ्यात नाराजीनाट्य
उस्मानाबाद दौऱ्यात नाराजीनाट्य
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

उस्मानाबाद : उस्मानाबाद (Usmanabad) दौऱ्यावेळी राष्ट्रवादीच्या (NCP) नगरसेवकांच्या नाराजीनाट्याचा सामाना सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना करावा लागला. सुप्रिया सुळे यांचा ताफा मुस्लिम समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी अडवला. राष्ट्रवादीचे मुस्लिम नगरसेवक व कार्यकर्ते नाराज ,सुप्रिया सुळे यांना भेटले. त्यानंतर नाराज कार्यकर्त्यांना सुप्रिया सुळे यांनी स्वतःच्या गाडीत बसवले आणि त्या स्वतः दुसऱ्या गाडीत बसल्या. यानंतर पुन्हा सुप्रिया सुळे यांचा ताफा मार्गस्थ झाला. दरम्यान, मुस्लिम समाजाला उस्मानाबाद दौऱ्यात स्थान न दिल्याने व एक ही कार्यक्रम न घेतल्याने कार्यकर्ते नाराज असल्याचं सांगितलं जातंय. सुळे यांनी मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळाला भेट न दिल्याने कार्यकर्ते नाराज असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांनी नाराजी दूर करण्यासाठी नंतर मनधरणीचे प्रयत्नही केलेत.

नेमकं काय झालं

सुप्रिया सुळे या आज उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहेत. आज अचानक त्यांच्या गाड्यांचा ताफा राष्ट्रवादीच्या काही नाराज कार्यकर्त्यांनी अडवला. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी त्यांची समजूत काढल्याची माहिती समजली आहे. नाराज कार्यकर्त्यांना स्वत:च्या गाडीत बसवलं आणि त्या स्वत: दुसऱ्या गाडीने निघून गेल्याचे बैठकीच्या ठिकाणी पोहोचल्या आहेत. उस्मानाबाद दौऱ्यात त्यांनी मुस्लिम समाजाच्या लोकांना वेळ दिला नसल्याने त्यांनी नाराजी आहे. विशेष म्हणजे सुप्रिया सुळेंनी मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळाला भेट न दिल्याने कार्यकर्ते अधिक नाराज आहेत. त्यानंतर एका ठिकाणी झालेल्या बैठकीत सुप्रिया सुळेंनी त्यांची मनधरणी केली आहे.

राष्ट्रवादीने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. सुप्रिया सुळे यांनी राजकारणात न राहता ‘घरी जावे आणि जेवण तयार करावे’ असे सांगून पाटील यांनी वाद निर्माण केला आहे.या वक्तव्यावर राष्ट्रवादीने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीच्या खासदार आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या आहेत.

हे सुद्धा वाचा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपच्या मुंबई युनिटने बुधवारी केलेल्या आंदोलनादरम्यान पाटील यांनी हे वक्तव्य केले.