लग्नमंडपात सुप्रिया सुळेंनी बांगड्या भरल्या

| Updated on: May 29, 2019 | 11:49 AM

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा विजयी हॅटट्रिक केली आहे. यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदारांचे आभार मानण्यासाठी आपल्या मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी चक्क एका लग्नघरी थांबून बांगड्या भरल्या. इतकंच नव्हे, तर संबंधित कुटुंबियांना लग्नाच्या शुभेच्छाही दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस आणि विशेषत: पवार […]

लग्नमंडपात सुप्रिया सुळेंनी बांगड्या भरल्या
Follow us on

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा विजयी हॅटट्रिक केली आहे. यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदारांचे आभार मानण्यासाठी आपल्या मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी चक्क एका लग्नघरी थांबून बांगड्या भरल्या. इतकंच नव्हे, तर संबंधित कुटुंबियांना लग्नाच्या शुभेच्छाही दिल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि विशेषत: पवार कुटुंबींयांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे सलग तिसऱ्यांदा निवडून आल्या आहे. यंदा सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या उमेदवार आणि रासप आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना पराभूत केले. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी 1 लाख 52 हजार 429 मतांनी भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचा पराभव केला.

यानंतर काल 28 मे रोजी सुप्रिया सुळे यांनी मतदारांचे आभार मानण्यासाठी आपल्या मतदारसंघाचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान इंदापूर तालुक्यातील बावडामार्गे नरसिंह पूर येथे जात असताना काही महिलांनी सुप्रिया सुळे यांचे औक्षण केलं. त्यादरम्या सुप्रिया सुळेंना एका घरासमोर मंडप दिसला. त्यांनी याबाबत औक्षण करणाऱ्या महिलांकडे चौकशी केली असता, ते लग्न घर आहे. आज त्या ठिकाणी बांगड्या भरण्याचा कार्यक्रम आयोजित केला असल्याचं सांगितलं.

तुम्हीही नववधूच्या घरी बांगड्या भरण्यासाठी चला असा आग्रह जमलेल्या महिलांनी सुप्रिया सुळेंना केला. महिलांच्या आग्रहाचे मान राखत सुप्रिया सुळे नववधूच्या घरी गेल्या. त्या ठिकाणी बांगड्या भरण्याच्या कार्यक्रमाला सहभागी झाल्या. त्याशिवाय नववधूची चौकशी करत तिला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा आणि आशीर्वादही दिले.