मी तुम्हाला भाऊ म्हणते, तुम्ही माझा बाई म्हणून एकेरी उल्लेख करता?; सुषमा अंधारे कुणावर भडकल्या?

शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पण त्यावर ते चकार शब्द बोलत नाहीत. त्यावर बोलण्यासाठी अभ्यास असायला हवा. कसे बोलतील?, असा टोलाही त्यांनी गुलाबराव पाटील यांना लगावला.

मी तुम्हाला भाऊ म्हणते, तुम्ही माझा बाई म्हणून एकेरी उल्लेख करता?; सुषमा अंधारे कुणावर भडकल्या?
मी तुम्हाला भाऊ म्हणते, तुम्ही माझा बाई म्हणून एकेरी उल्लेख करता?; सुषमा अंधारे कुणावर भडकल्या?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 02, 2022 | 9:17 AM

जळगाव: उद्धव ठाकरे (uddhav thackeray) गटावर वारंवार टीका करणारे शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (sushma andhare) यांनी त्यांच्याच मतदारसंघात जाऊन ललकारले आहे. सुषमा अंधारे यांनी भाषेवरून थेट गुलाबराव पाटील यांच्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे. मी तुम्हाला तोंडभरून भाऊ म्हणते आणि तुम्ही माझा बाई असा एकेरी उल्लेख करता? ही कोणती पद्धत आहे? असा संतप्त सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे.

सुषमा अंधारे काल धरणगावात होत्या. यावेळी त्यांनी संवाद साधताना थेट गुलाबराव पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. गुलाबराव पाटील गद्दारीचा शिक्का घेऊन फिरत आहे. गुलाबराव पाटील यांना पाणीवाले बाबा व्हायचं आहे.

हे सुद्धा वाचा

मात्र, धरणगावात 25 दिवस पाणी सुटत नाही. पाणी पिनेवाला बाबा तुम्ही आहात. पण ते पिण्याचं पाणी आहे की सायंकाळी ग्लासात घेण्यात येणारे पाणी आहे, याचा शोध घ्यायला हवा, असा हल्ला सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर चढवला.

गुलाबराव पाटील माझा बाई म्हणून एकेरी उल्लेख करतात. मी तुमचा हजारवेळा भाऊ म्हणून उल्लेख करते. तरीही तुम्ही माझा एकेरी उल्लेख करता. ही कोणती पद्धत आहे? असा सवाल त्यांनी केला.

शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पण त्यावर ते चकार शब्द बोलत नाहीत. त्यावर बोलण्यासाठी अभ्यास असायला हवा. कसे बोलतील?, असा टोलाही त्यांनी गुलाबराव पाटील यांना लगावला. तसेच गुजरातला जाणाऱ्या प्रकल्पावरून राज्य सरकारवर टीकाही केली.

ज्याला ज्यातलं कळत नाही. त्यांना मंत्रीपद देण्यात आलं आहे. त्यामुळेच राज्यातील प्रकल्प बाहेर जात आहे. एक एका प्रकल्पामुळे राज्यातील लाखो मुलांना रोजगार मिळाला असता.

गुजरातमधील माणसंही आमचीच आहेत. पण गुजरातचं भलं करण्यासाठी त्यांनी त्यांच्या नेत्यांना निवडून दिलं आहे. तुम्हाला महाराष्ट्राचं भलं करण्यासाठी राज्यातील जनतेने निवडून दिलं आहे. तरीही तुम्ही आपले प्रकल्प बाहेरच्या राज्यात जाऊच कसे देता? असा सवाल त्यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलून उपयोग नाही. एकनाथ शिंदे यांचा ऐकनाथ करून टाकण्यात आला आहे. फडणवीस शिंदे यांचा वारंवार अपमान करतात. त्यांच्या समोरचा माईक हिसकावून घेतात.

हे प्रकार जाणीवपूर्वक केले जात आहे. आम्ही मराठा मुख्यमंत्री दिला. मात्र त्या मुख्यमंत्र्याला बुध्यांक नाही, हे बिंबावल्या जात आहे. हे जाणीवपूर्वक केले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

आज मी बोलल्यावर आज आमच्या भावाला गुलाबराव पाटील यांना झोप लागणार नाही. मी तुम्हाला सळो की पळो करून सोडणार आहे. बोलून शब्द बदलायला मी अण्णा हजारे नाही किंवा बोलून शब्द फिरवायला मी राणा नाही. मैने जो कमिंटमेंट कर दी तो मैं अपने आप की भी नहीं सुनती, असा इशाराच त्यांनी दिला.

Non Stop LIVE Update
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले...
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले....
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर.
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या.
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.