अजित पवार, आव्हाड, धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे मंत्री कोण?

| Updated on: Dec 30, 2019 | 12:14 PM

नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, अदिती तटकरे, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, प्राजक्त तनपुरे, अजित पवार, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, संजय बनसोडे हे ठाकरे मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात मंत्रिपदाची शपथ घेण्याची चिन्हं आहेत.

अजित पवार, आव्हाड, धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे मंत्री कोण?
Follow us on

मुंबई : महाविकास आघाडीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची यादी समोर आली आहे. अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तर नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, अदिती तटकरे, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह 14 नेते मंत्रिपदाची शपथ (NCP Ministers List) घेणार आहेत.

नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, अदिती तटकरे, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, प्राजक्त तनपुरे, अजित पवार, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, संजय बनसोडे, राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, दत्तात्रय भरणे हे ठाकरे मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आतापर्यंत जयंत पाटील आणि छगन भुजबळ या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

राष्ट्रवादीचे मंत्री

अजित पवार (उपमुख्यमंत्री)  – बारामती (पुणे)
दिलीप वळसे पाटील – आंबेगाव (पुणे)
धनंजय मुंडे – परळी (बीड)
अनिल देशमुख  – काटोल (नागपूर)
हसन मुश्रीफ – कागल (कोल्हापूर)
राजेंद्र शिंगणे  – सिंदखेड राजा (बुलडाणा)
नवाब मलिक – अणूशक्तिनगर (मुंबई)
राजेश टोपे – उदगीर (लातूर)
जितेंद्र आव्हाड – मुंब्रा कळवा (ठाणे)
बाळासाहेब पाटील – कराड उत्तर (सातारा)
दत्तात्रय भरणे (राज्यमंत्री) – इंदापूर (पुणे)
आदिती तटकरे (राज्यमंत्री) – श्रीवर्धन (रायगड)
संजय बनसोडे (राज्यमंत्री) – उदगीर (लातूर)
प्राजक्त तनपुरे (राज्यमंत्री) – राहुरी (अहमदनगर)

आतापर्यंत जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील, हसन मुश्रीफ हे नेते सिल्व्हर ओकमधील शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठकीसाठी उपस्थित होते.

राष्ट्रवादीकडे असलेली खाती ( NCP Ministers List) कोणती?

छगन भुजबळ (07)

ग्रामविकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन, अन्न आणि नागरी पुरवठा, अल्पसंख्याक विकास आणि कल्याण

जयंत पाटील (07)

वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, ग्राहक संरक्षण, कामगार, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास

काँग्रेसकडून कोण?

काँग्रेसकडून अशोक चव्हाण, के सी पाडवी, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, सुनिल केदार, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, अस्लम शेख हे कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तर सतेज पाटील आणि डॉ. विश्वजीत कदम हे राज्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आतापर्यंत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि डॉ. नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर नाना पटोले यांच्या गळ्यात विधानसभा अध्यक्षपदाची माळ पडली आहे.

शिवसेनेकडून कोण ?

शिवसेनेकडून अॅड अनिल परब, उदय सामंत, संजय राठोड, गुलाबराव पाटील, दादा भुसे, अब्दुल सत्तार, डॉ. संदीपान भुमरे, शंभूराजे देसाई हे शिवसेनेकडून मंत्रिपदाची शपथ घेण्याची चिन्हं आहेत तर बच्चू कडू (प्रहार जनशक्ती), शंकरराव गडाख (क्रांतिकारी पक्ष) आणि राजेंद्र पाटील यड्रावकर हे शिवसेनेला पाठिंबा देणारे आमदारही शपथ घेण्याची चिन्हं आहेत.

ठाकरे सरकार

सध्या उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात एकूण 7 मंत्री आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेकडून सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ, तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत अशा सात मंत्र्यांनी 28 नोव्हेंबर रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर दोन आठवड्यांनी, म्हणजेच 12 डिसेंबरला तात्पुरते खातेवाटप करण्यात आले.

NCP Ministers List