राज्यपालांना आधीच कळवलं होतं, परवानगी नाही, CMO चं स्पष्टीकरण

| Updated on: Feb 11, 2021 | 5:08 PM

याबाबत राज्य शासनाची कुठलीही चूक नाही," असे यात म्हटलं आहे. (Thackeray Government First Official Comment Over denying airplane to Governor)

राज्यपालांना आधीच कळवलं होतं, परवानगी नाही, CMO चं स्पष्टीकरण
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
Follow us on

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विमान प्रवासाला परवानगी नाकारल्यावरुन राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. नुकतंच यावर राज्य शासनाकडून अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. “राजभवन सचिवालयाने राज्यपालांच्या दौऱ्याअगोदर राज्यपालांना विमान वापरण्यास परवानगी मिळाली आहे किंवा नाही याची खातरजमा करून घ्यावयास हवी होती. ती खात्री न केल्याने राज्यपालांसारख्या महनीय व्यक्तीचा खोळंबा झाला. याबाबत राज्य शासनाची कुठलीही चूक नाही,” असे यात म्हटलं आहे. (Thackeray Government First Official Comment Over denying airplane to Governor)

?राज्य शासनाचं स्पष्टीकरण काय??

राजभवन सचिवालयाने राज्यपालांच्या दौऱ्याअगोदर राज्यपालांना विमान वापरण्यास परवानगी मिळाली आहे किंवा नाही याची खातरजमा करून घ्यावयास हवी होती. ती खात्री न केल्याने राज्यपालांसारख्या महनीय व्यक्तीचा खोळंबा झाला. याबाबत राज्य शासनाची कुठलीही चूक नाही असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.

राजभवनाने राज्यपाल महोदयांना विमान घेऊन जाण्यास मान्यता देण्याविषयी राज्य शासनास विनंती केली होती. शासकीय विमान घेऊन जाण्यापूर्वी नियमानुसार परवानगी मागितली जाते आणि मान्यता मिळाल्यानंतरच विमान उपलब्ध केले जाते असा प्रघात आहे. यानुसार काल म्हणजे बुधवार दिनांक 10 फेब्रुवारीस मुख्यमंत्री सचिवालयातून विमान वापराबाबत अद्याप मान्यता दिलेली नसल्याचा निरोप देण्यात आला होता. ही मान्यता मिळाल्यानंतरच राजभवन सचिवालयाने राज्यपाल महोदयांच्या विमान प्रवासाबाबत नियोजन करून त्यांना विमानतळावर आणणे अपेक्षित होते. मात्र राजभवनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी मान्यतेविषयी कुठलीही खात्री करून न घेतल्याने राज्यपाल महोदयांना शासकीय विमानाने इच्छित स्थळी जाता आले नाही.

वस्तूत: राज्यपालांसारख्या महनीय पदावरील व्यक्तींच्या बाबतीत राजभवन सचिवालयाने पुरेशी काळजी घेणे अपेक्षित होते, ते झाले नसल्याने या प्रकाराबाबत शासनाने देखील गंभीर दखल घेतली असून राजभवनातील संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. (Thackeray Government First Official Comment Over denying airplane to Governor)

कोश्यारी उत्तराखंडला का निघाले होते?

राज्यपालांना उत्तराखंडमधील मसुरीला आयएएस अकॅडमीच्या सांगता समारोपाला जायचं होतं. आठवड्यापूर्वी राज्यपाल कार्यालयाने मुख्यमंत्री कार्यलयाला परवानगी मागितली होती. मुख्यमंत्री कार्यलयाडे परवनागी मागितली होती.

मुख्यमंत्री कार्यलयाकडून शेवटपर्यंत परवानगी मिळाली नाही. राज्यपाल सरकारी विमानाने मसुरीला जाणार होते. एका आठवड्यापूर्वी त्यांनी परवानगी मागितली होती. मात्र ही परवानगी न मिळाल्याने, राज्यपाल कोश्यारी खासगी विमानाने मसुरीला रवाना झाले. आज दुपारी 12.15 च्या विमानाने ते रवाना झाले.

राज्यपाल खासगी विमानाने रवाना

मुख्यमंत्री कार्यलयाकडून शेवटपर्यंत परवानगी मिळाली नाही. राज्यपाल सरकारी विमानाने मसुरीला जाणार होते. एका आठवड्यापूर्वी त्यांनी परवानगी मागितली होती. मात्र ही परवानगी न मिळाल्याने, राज्यपाल कोश्यारी खासगी विमानाने मसुरीला रवाना झाले. आज दुपारी 12.15 च्या विमानाने ते रवाना झाले. राज्यपाल डेहराडूनला स्पाईसजेट विमानाने रवाना झाले. सव्वा बाराचं विमान सव्वा दोनला डेहराडूनला पोहोचणार आहे. (Thackeray Government First Official Comment Over denying airplane to Governor)

संबंधित बातम्या : 

राज्यपालांच्या हवाई प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारली, विमानातून उतरुन कोश्यारी राजभवनात

‘इतका इगो असेलेलं सरकार राज्याच्या इतिहासात पाहिलं नाही’, फडणवीसांचा हल्लाबोल

राज्यपाल प्रकरणी जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आवाज चढतो!