‘माणिकराव ठाकरेंना निवडून आणून भावी मुख्यमंत्री घडवायचाय’, ठाकरे गटाच्या खासदाराचं वक्तव्य

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी राठोड यांच्या विकासकामांवर प्रश्न उपस्थित केले आणि माणिकराव ठाकरे यांचे समर्थन केले. देशमुख यांनी राठोड यांच्यावर भांडेवाटपावरुन टीका केली. त्यांनी राठोडांवर गायरान जमीन विक्रीचा आरोप केला. तसेच, त्यांनी येणाऱ्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसोबत कोणताही गैरप्रकार घडल्यास कठोर प्रत्युत्तर देण्याचा इशाराही दिला.

माणिकराव ठाकरेंना निवडून आणून भावी मुख्यमंत्री घडवायचाय, ठाकरे गटाच्या खासदाराचं वक्तव्य
माणिकराव ठाकरे आणि संजय देशमुख
| Updated on: Oct 29, 2024 | 11:01 PM

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्यावर सडकून टीका केली. “शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 13 वर्ष जिल्हा प्रमुख, 4 वेळ आमदारकी, 3 वेळ मंत्रीपद दिले, तुम्ही त्यांचे होऊ शकले नाही जनतेचे काय व्हाल? ज्या माणसाने उपकार केले त्याची परतफेड गद्दारी करून केली आहे. या मतदारसंघात माणिकराव ठाकरेंना निवडून आणून भावी मुख्यमंत्री घडवायचा आहे”, असं मोठं वक्तव्य संजय देशमुख यांनी केलं आहे. “विकासकामे सोडून आपला पालकमंत्री काय करतो? भांडे वाटप करतो. तुला भांडे वाटायला निवडून दिले का?”, असा खोचक सवाल संजय देशमुख यांनी केला. “लोकांमध्ये हिंमत आहे. त्यांच्या कापसाला, सोयाबीनला भाव दिला तर घामाच्या पैशांनी भांडे घेऊ शकतात”, असं संजय देशमुख यांनी संजय राठोड यांना केला.

“तुमच्या तोंडातून लाडकी बहीण चांगली वाटते का, तुम्हाला लाडकी म्हणायचं अधिकार तरी आहे का? 40 टक्के महिलांचे नाव यादीत नाही. ह्यांनी 1500 दिले आम्ही 2000 रुपये देऊ”, असं संजय देशमुख म्हणाले. “कधी टीव्ही उघडा. आपले साहेब टीव्ही उघडलं की काहीतरी लफडं केलं म्हणूनच येतो. कधी चांगलं काही केलं म्हणून आलं तर ठीक आहे. सेवालाल महाराजांनी गाईंची सेवा केली. पण गायरान जमीन विकण्याचे काम ह्यांनी केले”, अशी टीका संजय देशमुखांनी केली. “आता शिधा वाटप सुरू आहे. सोयाबीनचा एवरेज आम्हला आला नाही. तुला एवढा आला की 8 कोटींचा शिधा वाटप करत आहे. कधी 20 वर्षात इतकं शिधा वाटप केलं नाही. तुमच्या पायाखाली वाळू सरकली आहे”, असं संजय देशमुख म्हणाले.

‘उसकी आँखे बोहोत खूबसुरत हैं, नजर अच्छी नहीं’

“माणिकराव ठाकरे आदर्श, संयमी नेता आहेत. त्यांच्या पाठिशी खंबीर उभे राहा. आम्ही टक्केवारी घेणार नाही. आम्ही कधी टक्केवारी घेत नाहीत. अनेकवेळा सांगत होते बारामती करणार आहे. मात्र बारा काढले माती केली आहे. गब्रू पहेलवानने त्या दिवशी खूप शेर मारले आहे मी एक शेर मारतो. मंजिलो को कोण जाने रहगुजर अच्छी नहीं, उसकी आँखे बोहोत खूबसुरत हैं, नजर अच्छी नहीं”, अशी फटकेबाजी संजय देशमुखांनी केली.

‘एकही कार्यकर्त्यावर आच आली तर…’, संजय देशमुखांचा इशारा

“मी असाच खासदार झालो का? गोट्या खेळतो का? तुमच्या केसाला धक्का जरी धक्का लागला तर जश्यास तसे उत्तर देऊ. याद राखा. तुम्हला ज्या पद्धतीने वागता येते त्यापेक्षा जास्त पटीने आम्हाला वागता येते. निवडणूक चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे. एकही कार्यकर्त्यावर आच आली तर संजय देशमुख घरी बसणार नाही”, असा इशारा संजय देशमुखांनी दिला.