
Shivsena MLA Disqualification Case | सगळ्या महाराष्ट्राच लक्ष आज शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाकडे लागलं आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर दुपारी 4 वाजल्यानंतर निकाल वाचन करणार आहेत. निकाल कोणाच्या बाजून लागणार? त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार का? मुख्यमंत्री बदल होणार का? नवीन समीकरण आकाराला येणार का? असे अनेक प्रश्न राज्यातील जनतेच्या मनात आहेत. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर संध्याकाळी 4 वाजल्यानंतर मिळतील. दरम्यान शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यामधून त्यांनी आधीच हार मानल्याच दिसतय. आज मीडियाशी बोलताना त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना टोले लगावले तसच निकालाबद्दल शून्य उत्सुक्ता असल्याच सांगितलं.
“मला आजच्या निकालाबद्दल शून्य उत्सुक्ता आहे. शून्य अपेक्षा नाही, शून्य उत्सुक्ता असा शब्द उच्चारते, कारण हा निकाल इतक्या उशिरा लागतोय. सर्वोच्च न्यायालायने निर्देश दिल्यानंतर 13 ते 14 महिन्यानंतर वेळकाढूपणा करत ज्या पद्धतीने निकाल टोलवत आणण्याचा प्रयत्न झाला, उशिरा न्याय मिळणं हे सुद्धा अन्याय होण्यासारखच असतं. निकालाबद्दल मला भाष्य करायाच नाही. या निकालाबद्दल शुन्य उत्सकुता, कुतूहल आहे” असं त्या म्हणाल्या. येणाऱ्या निवडणुकीसाठी आम्ही फोकस करुन काम करणार आहोत, असं त्या म्हणाल्या.
‘त्यांना सत्तामेव जयते अस म्हणायच आहे’
राहुल नार्वेकरांनी दोन दिवसापर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. वेगळा निकाल लागू शकतो असं ते म्हणाले, त्यावर सुषाम अंधारे म्हणाल्या की, “आज शिंदे गटाचे लोक जे सत्यमेव जयते म्हणतात, त्यांना सत्तामेव जयते अस म्हणायच आहे” “एखाद्या लवादास निर्णय घ्यायचा आहे, न्यायाधीश म्हणून निरपेक्ष म्हणून न्यायादानाच्या खुर्चीत जाऊन बसणार आहात. तेच जेव्हा एकाबाजूच्या प्रतिनिधीला भेटतात, याचा अर्थ काय काढायचा? त्याचं वेगळ काही काम असू शकतो, पण यामुळे प्रतिपक्षाच्या मनात साशंकता निर्माण होत असेल, तर अशी साशंकता निर्माण होऊ नये याची खरबदारी नार्वेकर यांनी घ्यावी” असं सुषमा अंधारे म्हणाले.
नार्वेकरांवर कोणाचा दबाव आहे का?
“महाराष्ट्राच्या जनतेला काय वाटेल? इतरांना काय वाटेल? याची फिकीर करायची गरज नाही, असा महाशक्तींनी त्यांना मूलमंत्र दिलेला असू शकतो” असा टोला त्यांनी लगावला. नार्वेकरांवर कोणाचा दबाव आहे का? या प्रश्नावर अंधारे म्हणाल्या की, “मला अस वाटत नाही. ते खूप चांगली मैत्री निभावत आहेत. अशी मैत्री निभावली पाहिजे, ज्याने त्याने जागा निश्चित केलेल्या असतात. दबावापेक्षा सुद्धा छान हमजोली पद्धतीने मिळून मिसळून महाराशक्तीच्या मदतीसाठी काम करत असतील, तर तो त्यांच्या कामाचा भाग आहे. महाशक्तीशी एकनिष्ठ राहणं, ही त्यांची जबाबदारी आहे” असं सुषमा अंधारे म्हणाल्या.