महाराष्ट्र विधिमंडळाच्या समित्या संवैधानिक की असैविधानिक? ‘त्या’ 12 जागांमुळे पेच!

| Updated on: Feb 15, 2021 | 4:20 PM

महाराष्ट्र विधिमंडळाच्या समित्या या संवैधानिक की असंवैधानिक आहेत, हे तपासावे लागेल, अशी प्रतिक्रिया माजी विधानसभा अध्यक्ष आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या समित्या संवैधानिक की असैविधानिक? त्या 12 जागांमुळे पेच!
नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
Follow us on

मुंबई : राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची नियुक्ती अद्याप झाली नसल्यानं त्यावरुन जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी सरकारकडून 12 जणांची नावं राज्यपालांकडे पाठवण्यात आली आहेत. पण राज्यापालांनी त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेते राज्यपालांच्या या भूमिकेवर नाराज आहे. खुद्द शरद पवार यांनीही राज्यपालांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. पण त्या 12 आमदारांची अद्याप नियुक्ती झाली नसल्यामुळे नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.(Nana Patole’s reaction on the issue of MLAs appointed by the Governor)

महाराष्ट्र विधिमंडळाच्या समित्या या संवैधानिक की असंवैधानिक आहेत, हे तपासावे लागेल, अशी प्रतिक्रिया माजी विधानसभा अध्यक्ष आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. विधिमंडळ कामकाजासाठी आपल्या सहीनं एकूण 16 कमिट्या तयार करण्यात आल्या आहेत. या कमिट्यांमध्ये राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. जर या जागा रिक्त असतील तर त्या क्षेत्राच्या लोकांना न्याय मिळणार नाही. त्यामुळे या सर्व कमिट्या असंवैधानिक ठरु शकतात. जर कामकाज संवैधानिक नसेल तर या सर्व कमिट्या सरकारला रद्द कराव्या लागतील, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. त्यामुळे राज्य सरकारसमोर आता नवा पेच निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संजय राऊतांची राज्यपालांवर टीका

राज्य सरकारने राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवली आहे. पण कोश्यारी यांनी अद्याप या सदस्यांची नियुक्ती केलेली नाही. त्यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नुकतीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सडकून टीका केली होती. “विधानपरिषदेसाठी राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न मुद्दामहून प्रलंबित ठेवला आहे. मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय राज्यपालांसाठी बंधनकारक असतो. काही लोक आम्हाला घटनेविषयी ज्ञान देतात. घटनात्मक पदावर बसलेल्यांनी आधी घटना पाळायला हवी”, असं संजय राऊत म्हणाले होते.

हा तर संविधानाचा अपमान

“राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्यांवर अजून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. जूनमध्ये या निवडणुका व्हायला हव्या होत्या. मात्र, त्या झाल्या नाहीत. आमदारांच्या नियुक्त्यांवर आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे. 12 सदस्यांच्या नियुक्त्या न होणं हा संविधानाच अपमान आहे. मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय राज्यपालांसाठी बंधनकारक असतो. विधानपरिषदेसाठीच्या राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न मुद्दामहून प्रलंबित ठेवला आहे,” असं राऊत म्हणाले. तसेच, नियुक्त्या न होणं हा विधिमंडळाचा अपमान असल्याचंही राऊत म्हणाले.

12 सदस्यांमध्ये कोणाची नावं?

काँग्रेस

1) सचिन सावंत – सहकार आणि समाजसेवा
2) रजनी पाटील – सहकार आणि समाजसेवा
3) मुजफ्फर हुसैन – समाजसेवा
4) अनिरुद्ध वनकर – कला

राष्ट्रवादी काँग्रेस

1) एकनाथ खडसे – सहकार आणि समाजसेवा
2) राजू शेट्टी – सहकार आणि समाजसेवा
3) यशपाल भिंगे – साहित्य
4) आनंद शिंदे – कला

शिवसेना

1) उर्मिला मातोंडकर – कला
2) नितीन बानगुडे पाटील
3) विजय करंजकर
4) चंद्रकांत रघुवंशी

संबंधित बातम्या :

हे तर घटनेचे मारेकरी, राज्यपालांचं नाव न घेता राऊतांची टीका

पंतप्रधान मोदींचे अश्रू मगरीचे, राकेश टिकैत यांचे अश्रू दिसत नाहीत का? नाना पटोले आक्रमक

Nana Patole’s reaction on the issue of MLAs appointed by the Governor