ठाकरे की शिंदे गट? पाहा कुणाला मिळणार धनुष्यबाण, अखेर…

| Updated on: Oct 06, 2022 | 11:21 PM

निवडणूक आयोग चिन्हाबाबात निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

ठाकरे की शिंदे गट? पाहा कुणाला मिळणार धनुष्यबाण, अखेर...
Follow us on

मुंबई :अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनुष्यबाण या तिन्हा बाबात मोठी अपडेट सोमर आली आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय उद्या होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोग उद्या निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग चिन्हाबाबात निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

उद्धव ठाकरे गटाने याबाबत निवडणुक आयोगाला पत्र दिले आहे. उर्वरीत कागदपत्रे 7 ऑक्टोबर पर्यंत सादर करण्याचे त्यांनी निर्देश निवडणुक आयोगाने उद्धव ठाकरेंना दिले आहेत.

4 तारखेलाच शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पत्र दिल्याचे समजते. धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे या पत्राद्वारे केली आहे.

धनुष्यबाण चिन्हाचा निकाल लावावा, त्यानंतर इतर मुद्द्यांवर सुनावणी घ्यावी. ठाकरे गटाकडून धनुष्यबाण चिन्हाचा गैरवापर केला जातोय असाही दावा केला जातोय. तात्काळ सुनावणी घ्या अशी विनंती शिंदे गटाने निवडणूक आयोगाला केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी एकही कागदपत्र सादर केलेले नाहीत. ठाकरे गट जाणून बुजून वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

पक्षात आमदार, खासदार, जिल्हा प्रमुख, राज्य प्रमुख, मूळ सदस्य, पदाधिकारी सर्व आपल्या बाजूने आहेत. शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे आकडेवारी देखील सादर केली आहे.

निवडणूक आयोगानं वारंवार मुदत दिली तरीही ठाकरे गटाने एकही पुरावा सादर केला नाही. निवडणूक आयोगाचा मान राखला जात नाही असा आरोपही शिंदे गटाने केलाय.