Video : MLC Election 2022 : फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आमदारांचा मुक्काम तर अपक्षांच्या संपर्कात विभागीय नेते, भाजप लागली कामाला

| Updated on: Jun 16, 2022 | 12:32 PM

परिणय फुके म्हणाले, 10 जूनला लोकांना विश्वास नव्हता की, राज्यसभेची जागा भाजपनं जिंकेल. आताही तसाच चमत्कार देवेंद्र फडणवीस 20 जून रोजी दाखविणार आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत मतं दाखवून करायचं होतं. तरीही भाजपचा पाचवा उमेदवार निवडून आला. यावेळी म्हणजे विधान परिषदेच्या निवडणुकीत गुप्त पद्धतीनं मतदार करावं लागते.

Video : MLC Election 2022 : फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आमदारांचा मुक्काम तर अपक्षांच्या संपर्कात विभागीय नेते, भाजप लागली कामाला
भाजप नेते डॉ. परिणय फुके
Follow us on

नागपूर : विधान परिषद निवडणुकीसाठी अपक्ष (Independent MLA) आणि इतर पक्षातील आमदारांशी भाजपने संपर्क सुरु केलाय. गेल्या तीन दिवसांपासून भाजपचा संपर्क सुरू आहे. अपक्ष आणि इतर पक्षातील आमदारांशी संपर्क साधण्याची जबाबदारी वेगवेगळ्या नेत्यांवर सोपवली आहे. आप आपल्याला विभागानुसार भाजप नेत्यांवर अपक्ष आमदारांशी संपर्क साधण्याची जबाबदारी आहे. राज्यसभा निवडणुकीप्रमाणे विधानपरिषद निवडणुकीत चमत्कार होणार, असा विश्वास भाजप नेते डॉ. परिणय फुके यांनी व्यक्त केला. मुंबईत ते बोलत होते. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये (Five Star Hotel) आमदारांचा मुक्काम आहे. अपक्षांच्या संपर्कात भाजपचे विभागीय नेते (Divisional Leader) आहेत. भाजप कामाला लागली आहे. याचा परिणाम 20 जूनच्या निकालाच्या दिवशी दिसणार आहे.

पाहा व्हिडीओ

20 जूनला चमत्कार घडेल

अपक्ष आणि इतर पक्षातील आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, अशी माहिती भाजप नेते परिणय फुके यांनी दिली. तीन दिवसांपासून भाजप इतर आमदारांच्या संपर्कात आहे. वेगवेगळ्या नेत्यांवर संपर्क साधण्याची जबाबदारी असल्याचं कळतंय. परिणय फुके म्हणाले, 10 जूनला लोकांना विश्वास नव्हता की, राज्यसभेची जागा भाजपनं जिंकेल. आताही तसाच चमत्कार देवेंद्र फडणवीस 20 जून रोजी दाखविणार आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत मतं दाखवून करायचं होतं. तरीही भाजपचा पाचवा उमेदवार निवडून आला. यावेळी म्हणजे विधान परिषदेच्या निवडणुकीत गुप्त पद्धतीनं मतदार करावं लागते.

हे सुद्धा वाचा

नाराज आमदार भाजपला मतदान करतील

फुके म्हणाले, मुख्यमंत्र्यांबद्दल सर्वच पक्षातील आमदारांमध्ये नाराजी आहे. या नाराजीमुळं 20 जूनचा निकाल वेगळा लागेल, असं ते म्हणाले. अपक्ष आणि इतर काही पक्षातील आमदारांची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी ही परिणय फुके यांच्याकडं आहे. हे गणित सहज जुळेल. बरेच आमदार नाराज आहेत. पाच उमेदवार निवडून येणे हे कठीण काम आहे. असं असलं तरी विधान परिषद निवडणुकीत नाराज आमदार भाजपला मतदान करतील. शिवाय अपक्षांची मदत घेतली जाणार आहे. यामुळं भाजपचे पाचही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास परिणय फुके यांनी व्यक्त केला.