Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक होणार, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी बजावणार व्हीप

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीही सक्रिय झाली आहे. ते राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलावून व्हीप जारी करणार आहेत. कारण राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे हे साळवींचे सूचक आहेत, तर काँग्रसचे आमदार संग्राम थोपटे हे अनुमोदक झाले आहेत.

Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक होणार, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी बजावणार व्हीप
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jul 02, 2022 | 6:14 PM

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलावली जाणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष (NCP State President) जयंत पाटलांनी ही बैठक बोलावली आहे. उद्या सकाळी 10 वाजता राष्ट्रवादी आमदारांना एकत्र केलं जाणार आहे. बैठकीत आमदारांना सूचना दिल्या जातील. बैठकीतचं आमदारांना व्हीप बजावला जाणार आहे. पक्षाचे प्रतोद अनिल पाटील ( Anil Patil) व्हीप बजावणार आहेत. उद्या सकाळी विधानभवनात हजर राहण्याचे आदेश राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना दिल्याची माहिती आहे. विधानसभा अध्यक्षपदाची (Assembly Speaker) निवडणुकीसाठी 3 व 4 जुलैला विशेष अधिवेशन बोलावण्यात आलाय. 3 जुलै रोजी पहिल्याच दिवशी अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

महाविकास आघाडीतर्फे राजन साळवी उमेदवार

विधानसभेच्या विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपालांनी दिलेत. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे. शिवसेनेचे मुख्य प्रदोत सुनील प्रभू यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हीप जारी केला आहे. राजन साळवी हे शिवसेनेचे विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत. महाविकास आघाडीतर्फे राजन साळवी यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. साळवी हे कोकणातील सामान्य कुटुंबातील आमदार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीही सक्रिय झाली आहे. ते राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलावून व्हीप जारी करणार आहेत. कारण राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे हे साळवींचे सूचक आहेत, तर काँग्रसचे आमदार संग्राम थोपटे हे अनुमोदक झाले आहेत.

भाजपतर्फे राहुल नार्वेकरांना उमेदवारी

भाजपने विधानसभा अध्यक्षपदासाठी कुलाब्याचे आमदार राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली. नार्वेकर आधी शिवसेनेत होते. त्यानंतर ते राष्ट्रवादीत आले. आणि आता भाजपच्या पाठिंब्याने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लढत आहेत. भाजपकडून कुलाब्याचे आमदार राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. भाजपचे 106 आणि शिंदे गटाचे 50 आमदार यामुळं नार्वेकरांचा विजय सोपा मानला जात आहे. तरीही राष्ट्रवादीनं खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या आमदारांसाठी व्हीप जारी केला आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें