TMC Election 2022 Ward 3 : शिंदे गट फुटल्यामुळे ठाण्यातल गड शिवसेनेला राखता येईल का ?

व्याप्ती - वन हिरानंदानी पार्क, अनामित्रा सोसायटी, ब्रह्मांड, स्वास्तिक पार्क-सी, रिजेन्सी टॉवर्स, आझाद नगर, दुर्गानगर, कोलशेत वरचा गाव, अकबर

TMC Election 2022 Ward 3 : शिंदे गट फुटल्यामुळे ठाण्यातल गड शिवसेनेला राखता येईल का ?
Thane MNP Ward 03
Image Credit source: tv9marathi
महेश घोलप | Updated on: Aug 06, 2022 | 11:21 PM

ठाणे : ठाणे शहराचे काम ठाणे महानगरपालिकेतर्फे (TMC Election 2022 Ward 3) चालते. मुख्यालय महापालिका भवन, चंदनवाडी, पाचपाखाडी (Pachpakhadi) येथे आहे. लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सदस्यांची महानगरपालिका आहे. महापौरांच्या अध्यक्षतेखाली शहराच्या पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा आणि वाहतूक व्यवस्थापित करते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांसारख्या राज्यातील आघाडीच्या राजकीय पक्षांचे सदस्य तिथे आहेत. ठाणे या मुख्य शहरासह कळवा, आणि मुंब्रा-कौसा या शहरांवर ठाणे महापालिकेचा अधिकार आहे. शहरातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी ठाणे महानगरपालिका स्थापन करण्यात आली आहे. ठाण्यात शिवसेना अधिक आघाडीवर होती. ठाण्याच्या महापौर मिनाक्षी शिंदे या एकनाथ शिंदे (Eknath shinde) गटात सामील झाल्यामुळे तिथं कुणाची सत्ता येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पाच वॉर्ड क्रमांक तीनमध्ये शिवसेनेची सत्ता होती.

प्रभाग क्रमांक 3

अ – पद्मा भगत (शिवसेना)

ब मधुकर पावशे (शिवसेना)

क मीनाक्षी शिंदे (शिवसेना)

ड भूषण भोईर (शिवसेना)

प्रभाग निहाय आरक्षणाचा तपशील

३ (अ) अनुसूचित जाती महिला
३ (ब) सर्वसाधारण
३ (क) सर्वसाधारण

प्रभागाचे नाव – ब्रम्ह्यांड, कोलशेत, आझाद नगर

व्याप्ती – वन हिरानंदानी पार्क, अनामित्रा सोसायटी, ब्रह्मांड, स्वास्तिक पार्क-सी, रिजेन्सी टॉवर्स, आझाद नगर, दुर्गानगर, कोलशेत वरचा गाव, अकबर

  1. उत्तर – घोडबंदर रोडवरील पातलीपाडा जंक्शनपासून पूर्वकडे हिरानंदानी मुख्य रस्त्याने रुतू इस्टेटच्या कुंपण भितीपर्यंत आणि त्यानंतर दक्षिणेकडे कुंपण भितीने रुतू इस्टेट एर बिल्डिंगपर्यंत आणि त्यानंतर उत्तरेकडे नाल्याने अनामित्रा सोसायटीपर्यंत त्यानंतर ब्रम्हांड मुख्य रस्त्याने दक्षिणेकडे पृथ्वी – ब्रम्हांड रो हाऊस क्र. ६ पर्यंत, त्यानंतर कुंपणभिंतीने पूर्वेकडे स्वस्तिक पार्क अंतर्गत रस्त्यापर्यंत, आणि त्यानंतर उत्तरेकडे आतल्या रस्त्याने स्वस्तिक पार्क ए विंग कंपाउंड वॉलपर्यंत आणि त्यानंतर अकबर कॅम्प कंपाउंड वॉलमार्ग उत्तरेकडे उल्हास नदीपर्यंत.
  2. पूर्व – अकबर कॅम्पच्या भितीपासून उल्हास नदीने दक्षिणेकडे कोलशेत बंदर पर्यंत
  3. दक्षिण – उल्हास नदी कोलशेत विसर्जन घाटापासून पश्चिमेकडे कोलशेत रस्त्याने लोढा अमारा संकलनाच्या नाल्यापर्यंत आणि त्यानंतर नाल्याने शेळके इन हॉटेलपर्यंत त्यानंतर उत्तरेकडे नाल्याने दुर्गा विद्या मंदिरापर्यंत, आणि त्यानंतर कुंपण भिंतीने श्री छत्रपती पुर्णकर घरापर्यंतच्या आणि त्यानंतर पश्चिमेकडे गल्लीने दत्त मंदिर आणि त्यानंतर दक्षिणेकडे गल्लीने श्री वसंत कृष्ण भोसले घरापर्यंत. यानंतर रस्त्याने पश्चिमेकडे दिलीप हिरिश्चंद्र यादव फ्लोअर मिल पर्यत, आणि त्यानंतर दक्षिणेकडे रस्त्याने श्री सिद्धेश्वर विश्वनाथ मंदिरापर्यंत, आणि त्यानंतर रस्त्याने पश्चिमेकडे ठामपा कार्यालयापर्यंत आणि त्यानंतर घोडबंदर रोड मानपाडा जंक्शन पर्यंत.
  4. पश्चिम – मानपाडा रस्त्यापासून घोडबंदर रोडने उत्तरवार्ड हिरानंदानी इस्टेट रस्त्यापर्यंत

३ (अ) अनुसूचित जाती महिला

पक्ष उमेवदवार विजयी
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
कॉंग्रेस
मनसे
इतर

३ (ब) सर्वसाधारण

पक्षउमेदवार विजयी
भाजप
शिवसेना
कॉंग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

३ (क) सर्वसाधारण

पक्षउमेदवार विजयी
भाजप
शिवसेना
कॉंग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

 

Follow Us