AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नास्तिक जावेद अख्तर यांच्या करिअरमधील सर्वांत कठीण गाणं; देवासाठीचं हे गाणं ऐकून आजही डोळ्यात येईल पाणी

'लगान'ला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आमिर खान त्याच्या चित्रपटातील संपूर्ण कलाकार आणि क्रू टीमसाठी एका विशेष पार्टीचं आयोजन करणार असल्याचं समजतंय. ही पार्टी 13 जून रोजी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडणार आहे.

नास्तिक जावेद अख्तर यांच्या करिअरमधील सर्वांत कठीण गाणं; देवासाठीचं हे गाणं ऐकून आजही डोळ्यात येईल पाणी
Javed Akhtar and Aamir KhanImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 12, 2026 | 8:22 AM
Share

अभिनेता आमिर खानचा ‘लगान’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र या चित्रपटाच्या आठवणी आजही अनेकांच्या मनात कायम आहेत. 2001 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. यातील गाणी, कलाकारांचं दमदार अभिनय आणि ‘लगान’मधली प्रत्येक गोष्ट आयकॉनिक मानले जातात. या चित्रपटातील गाणी दिग्गज गीतकार जावेद अख्तर यांनी लिहिली होती. ‘लगान’मधील सर्व गाणी अख्तर यांनीच लिहिली होती आणि या गाण्यांना प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. मात्र या चित्रपटातील एक गाणं लिहिण्यासाठी जावेद अख्तर यांना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला होता. नुकत्याच एका कार्यक्रमात त्यांनी याविषयीचा खुलासा केला.

‘लगान’ या चित्रपटातील ‘ओ पालनहारे’ हे गाणं लिहिणं त्यांच्यासाठी खूप कठीण असल्याचं अख्तर यांनी सांगितलं. या गाण्याने त्यांच्या करिअरमध्येही बऱ्याच अडचणी घेऊन आला होता. नास्तिक असतानाही देवासमोर विनवणी करणारं हे गाणं लिहिताना त्यांना स्वत:च्या मनात संपूर्ण समर्पित भावना जागृत करावी लागली, असं ते म्हणाले. “जेव्हा कधी लोक मला विचारतात की आजवरच्या करिअरमध्ये कोणतं गाणं लिहिणं तुमच्यासाठी सर्वांत कठीण होतं, तेव्हा मी नेहमीच म्हणेन ती ‘ओ पालनहारे’. ए. आर. रेहमान साहेब यांनी या गाण्याला इतक्या शुद्ध भक्तीचं संगीत दिलं की ऐकताच कोणालाही समजेल की हे अध्यात्मिक गाणं आहे. मी स्वत: नास्तिक आहे, तरीसुद्धा मला देवाप्रती समर्पणाची भावना मनात कुठेतरी शोधावी लागली. अशी गाणी चलाखीने किंवा कोणतीही युक्ती वापरून लिहिले जाऊ शकत नाहीत. त्यासाठी फक्त मन स्वच्छ, पवित्र आणि निर्मळ असावं लागतं”, असं अख्तर यांनी सांगितलं.

या कार्यक्रमात ए. आर. रेहमानसुद्धा उपस्थित होते. जावेद अख्तर यांचं हे वक्तव्य ऐकून ते म्हणाले, “हे गाणं टाइमलेस बनावं अशी माझी इच्छा होती आणि नशिबाने तसंच घडलं.” आमिरच्या ‘लगान’ चित्रपटातील गाणी प्रचंड गाजली आणि ही गोष्ट त्याच्या साऊंड ट्रॅकच्या विक्रीवरून स्पष्ट होते. बॉलिवूडच्या इतिहासातील हा सर्वांत मोठ्या ऑडिओ हिट्सपैकी एक आहे. त्याच्या 35 लाखांहून अधिक रेकॉर्ड्सची विक्री झाली आहे.

Follow Us
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...