Tukaram Mundhe: तुम्ही तिकडेच मजा मारून राहिले, एकदा बुलढाण्यात या; 75 वर्षीय आजीचा तुकाराम मुंढेंसाठी खास व्हिडीओ

Tukaram Mundhe: अन्न व औषध प्रशासनानेचे आयुक्त आयुक्त तुकाराम मुंढे हे त्यांच्या बेधडक कारवाईसाठी ओळखले जातात. नुकताच त्यांच्यासाठी 75 वर्षीय आजीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी तुकाराम मुंढे यांना बुलढण्यात येऊन कारवाई करण्याची विनंती केली आहे.

Tukaram Mundhe: तुम्ही तिकडेच मजा मारून राहिले, एकदा बुलढाण्यात या; 75 वर्षीय आजीचा तुकाराम मुंढेंसाठी खास व्हिडीओ
Tukaram Mundhe
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Aug 13, 2026 | 9:16 AM

अधिकारी तुकाराम मुंढे यांनी FDA ची सूत्रे हातात घेतल्यावर संपूर्ण राज्यभर कारवाया सुरू केल्या आहेत . अनेक भेसळ खोरांवर त्यांनी कडक कारवाई केली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात भेसळखोरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे सर्वसामान्य वर्गाकडून त्यांचे कौतुक ही होत आहे. मात्र, खामगावच्या एका आजीचा तुकाराम मुंडे यांना साद घालणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

आजीची बुलढाणा आणि खामगावमध्ये येण्याची मागणी

सध्या बुलढण्यातील अनेक खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होत आहे आणि अधिकारी कारवाई करत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे धडाकेबाज कारवाई करणाऱ्या तुकाराम मुंढे यांनी बुलढाण्यात यावे अशी मागणी 75 वर्षीय आजीने सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. या आजींनी शेअर केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

काय आहे व्हिडीओ?

या व्हिडिओमधील आजीचे नाव निर्मलाबाई हेलोडे असे आहे. या आजीच्या व्हिडीओमध्ये त्या तुकाराम मुंडे यांना खामगावमध्ये येण्याची साद घातल आहेत. तुकाराम मुंढे साहेब बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगावमध्ये सगळी भेसळ सुरु आहे. दुकानातील तेलामध्ये, बुलढाण्यात साहेब लोक नुसते पैसे खाऊन राहिले. तुम्ही खामगावमध्ये येऊन पहा, किती भ्रष्टाचार होऊन राहिला. हे लोक पैसे खातात, काहीच कामे नाही करत. केळी, भाजीपाला, पपईमध्ये औषध. सारे लोकं बिमार पडून राहिले. एन तुम्ही तिकडेच मजा मारून राहिले, जरा इकडे या खामगावमध्ये असे आजी बोलताना दिसत आहेत निर्मला आजीने तुकाराम मुंढे यांना साद घातली असून मुंडे आता या आजीच्या व्हिडिओला किती दाद देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काल तुकाराम मुंढे यांनी मुंबईतील डॉमिनोज पिझ्झाच्या चार आउटलेट्सवर धडक कारवाई केली आहे. त्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. डॉमिनोज पिझ्झाच्या आऊटलेटवर धाड टाकल्यानंतर तिथे तपासणीमध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छता मानकांचं उल्लंघन होत असल्याचं आढळून आलं. ही कारवाई राज्यभरात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सुरु असलेल्या कारवाईचा भाग आहे. या आउटलेट्समध्ये पिण्याच्या पाण्याची खराब व्यवस्था, अन्न स्टोरेज व्यवस्था, पेस्ट कंट्रोल एकूणच अस्वच्छता मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे त्यांचे परवाने निलंबित करण्यात आले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us