AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मध्यरात्री एकनाथ शिंदे अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी, भेटीचं कारण आलं समोर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमागचं कारण आता समोर आलं आहे.

मध्यरात्री एकनाथ शिंदे अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी, भेटीचं कारण आलं समोर
| Updated on: Aug 13, 2026 | 9:37 AM
Share

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल बुधवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये 20 मिनिटे बैठक चालली. महायुतीतील दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये महत्त्वाच्या विषयावर बैठक झाली. या भेटीमागचं कारण आता समोर आलं आहे.

राज ठाकरेंनी सकाळी भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोघांमध्ये २० मिनिटं बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत रायगड पालकमंत्रीपद , दोन आठवड्यात राज्यातील महामंडळ वाटप, शिवसेनेच्या आमदारांना विकास काम निधी आणि रखडलेल्या कामांना गती देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

एककीकडे सुप्रीम कोर्टात शिवसेना कोणाचीय याबाबत सुनावणी सुरू हे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल जोरदार युक्तिवाद करत आहे. त्यामुळे महायुतीच्या गोटातही हालचालींना वेग आएला आहे. त्यात दोन जिल्ह्यातील पालकमंत्रिपदाचा तिढा कायम आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.

फडणवीसांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे काय म्हणाले होते?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर जोरदार टीका केली. देशात विरोधकांना फक्त राजकारण करायचं असून त्यांना संसदेत चर्चा करायची नाही. त्यांना फक्त स्टंटबाजी करण्यातच रस आहे. खरतंर विरोधकांना प्रश्नाचं उत्तर हवं आहे की, फक्त राजीनामा मागण्याचे नाटक करायचं आहे, असा सवाल एकनाथ शिंदेनी उपस्थित केला. भारतातील जनतेला सर्वांचं काम माहीत असून देशांने पंतप्रधान मोदींची काम पाहिलं आहे. अमित शहा यांचही काम जनतेला माहीत आहे. त्यामुळे देशातील 140 कोटी जनता मोदींजीसोबत आहे. युवक, तरुणी पिढी देशाचं भविष्य आहे. त्यांच्यासाठी मोदींनी पटापट निर्णय घेतले आहेत’.

Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल