AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Snakes In Home : साप अचानक घरात येत नाहीत ! किचनमधील या 6 चुका ठरू शकतात धोकादायक

Snakes In Home : किचनमधील रोजच्या काही गोष्टी तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात, कारण त्यांची वेळेवर काळजी घेतली नाही तर त्यामुळे सापांना घरात निमंत्रण मिळू शकतं. किचनमधील अशा 6 वस्तू ज्या सापांना आकर्षित करू शकतात, त्या आत्ताच हटवा, नाहीतर धोका वाढू शकतो.

Snakes In Home : साप अचानक घरात येत नाहीत ! किचनमधील या 6 चुका ठरू शकतात धोकादायक
सापांपासून कसा कराल बचाव ?
| Updated on: Aug 13, 2026 | 8:56 AM
Share

Snakes In Home : पावसाळा असो किंवा उन्हाळा, घराच्या आसपास साप दिसण्याच्या घटना वाढतात. अनेकांना वाटते की साप अचानक घरात शिरतात. पण अनेकदा त्यामागे एक कारण असते—घराच्या आसपास उंदीर, कीटक आणि छोटे जीव असणे. थेट अन्नाच्या वासाने साप घरात येत नाहीत. मात्र स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी असतात, ज्या उघड्या ठेवल्यामुळे किंवा अस्वच्छता असल्यामुळे उंदीर आणि कीटक आकर्षित होतात. आणि जिथे त्यांचं भक्ष्य असतं, तिथेच सापही येण्याची शक्यता वाढते. म्हणूनच घरात साप यायला नको असतील, तर तुम्हीही या चुका टाळा. अशा काही वस्तू किचनमध्ये असतील तर त्या लगेच काढून टाका.

1. धान्य आणि डाळी उघड्या ठेवू नका

तांदूळ, गहू, डाळी किंवा इतर धान्य उघड्या पिशव्यांमध्ये ठेवल्यास उंदीर आणि कीटक घरात येऊ शकतात. उंदीर हे सापांचे भक्ष्य असल्याने साप येण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे धान्य नेहमी हवाबंद डब्यांमध्ये ठेवा आणि ज्या ठिकाणी धान्य ठेवता ती जागा स्वच्छ ठेवा.

2. भाज्यांच्या साली आणि उरलेलं अन्न साठवू नका

भाज्यांच्या साली, उरलेले अन्न किंवा ओला कचरा बराच वेळ घरात पडून राहिल्यास माश्या, कीटक आणि उंदीर आकर्षित होतात. यामुळे सापही त्या परिसरात येऊ शकतात. म्हणूनच ओला कचरा दररोज बाहेर टाका आणि कचरापेटी नेहमी झाकून ठेवा.

3. दूध, अंडी आणि पनीर उघडं ठेवू नका

दूध, पनीर, अंडी किंवा इतर पदार्थ उघडे राहिल्यास ते खराब होऊ शकतात. त्यातून येणारा वास कीटक आणि उंदरांना आकर्षित करू शकतो. ते लगेचच तुमच्या कीचनमध्ये येऊ शकतात. त्यामुळे उंदीर टाळायचे असतील तर अन्नपदार्थ नेहमी झाकून किंवा फ्रिजमध्ये ठेवा आणि खराब झालेले पदार्थ लगेच फेकून द्या.

4. मांस आणि माशांचा कचरा लगेच बाहेर टाका

मांस किंवा माशांचे उरलेले तुकडे लवकर खराब होतात आणि दुर्गंधी निर्माण करतात. त्यामुळे कीटक आणि उंदीर घरात येऊ शकतात. असा कचरा लगेच घराबाहेर टाका आणि कचरापेटी व्यवस्थित बंद ठेवा.

5. पाळीव प्राण्यांचं खाद्य उघडं ठेवू नका

कुत्रे, मांजरी किंवा पक्ष्यांसाठी ठेवलेले खाद्य उघडे राहिल्यास उंदीर आणि इतर छोटे जीव त्याकडे आकर्षित होऊ शकतात. पर्यायाने त्यांच्या शोधात सापही घरापर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे तुमच्याकडे जर पाळीव प्राणी असतील तर त्यांचं खाण-पिणं हे एखाद्या डब्यात नीट बंद करून योग्य जागी ठेवा. उघड्यावर ठेवणं टाळा.

6. सिंकखाली पाणी साचू देऊ नका

सिंकखाली पाणी साचणं, पाइपमधून गळती होणं किंवा घरात सतत ओलावा असणं, यामुळे थोडा गारवा निर्माण होतो, आणि अशीचा जागा सांपाना लपण्यासाठी आवडू शकते. हे टाळण्यासाठी सिंकखालील जागा नेहमी कोरडी ठेवा आणि पाइप गळत असेल तर वेळीच दुरुस्त करा.

सापांपासून घर सुरक्षित ठेवायचं असेल तर हे नक्की करा

स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवा.

धान्य आणि अन्नपदार्थ बंद डब्यांमध्ये ठेवा.

उंदरांची समस्या दिसताच त्यावर उपाय करा.

स्टोअररूममध्ये अनावश्यक सामान साचू देऊ नका.

भिंती, पाइप आणि दरवाज्याजवळील भेगा बंद करा.

घराभोवती झाडाझुडपं, लांब गवत आणि कचरा साचू देऊ नका.

Follow Us
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा...
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख...
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे नेटवर्कला मंजुरी
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा
दहीहंडी उत्सवात नियमभंग; पुणे नागपुरात 28 जणांवर गुन्हे दाखल
दहीहंडी उत्सवात नियमभंग; पुणे नागपुरात 28 जणांवर गुन्हे दाखल
भाजप मोठ्या तयारीत? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांच्या...
भाजप मोठ्या तयारीत? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक
मोठी बातमी! शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीच्या आठवडाभर आधीच... अमित शहा...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीच्या आठवडाभर आधीच... शहांचं नाव घेत बड्या नेत्याचं खळबळजनक विधान
कराळे मास्तरांचा पारा चढलाच! थेट बड्या नेत्याचं नाव घेत केला आरोप,
कराळे मास्तरांचा पारा चढलाच! थेट बड्या नेत्याचं नाव घेत केला आरोप, व्हिडीओ व्हायरल
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा विखेंवर गंभीर आरोप; म्हणाले, वर्षभर...
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा विखेंवर गंभीर आरोप; म्हणाले, वर्षभर घात केला अन्...
विद्यानंद बापटांनंतर विवेकानंद नावाचा तरुण तुफान चर्चेत; उद्धव ठाकरे..
विद्यानंद बापटांनंतर विवेकानंद नावाचा तरुण तुफान चर्चेत; उद्धव ठाकरेंनी थेट...
3.16 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप! सामंत, लाडांनी आकडेवारीच सांगितली
Maratha Reservation | मराठवाड्यात 3.16 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप! उदय सामंत-प्रसाद लाडांनी आकडेवारीच सांगितली