Maharashtra News LIVE : जळगाव : ठाकरे गट व मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
Maharashtra News LIVE : शिवसेना निवडणूक चिन्हासंदर्भात तसंच आमदार अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आजही सुनावणी पार पडणार आहे. याविषयीचे अपडेट्स आणि इतरही महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या..

विधीमंडळ पक्षाचा एक गट फुटतो, स्वत:ला पक्ष म्हणवतो आणि निवडणूक आयोगाकडे जातो, अशा रीतीने कुठल्याही गटाला मान्यता दिली तर परिस्थिती वादळासारखी विनाशकारी होईल, असा गंभीर इशारा ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तीवादादरम्यान दिला. शिवसेना निवडणूक चिन्हासंदर्भात तसंच आमदार अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश सूर्यकांत, न्या. जॉयमाल्या बागची आणि न्या. व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर बुधवारी सुनावणी झाली. आज कपिल सिब्बल त्यांचा युक्तीवाद संपवणार आहेत. या युक्तीवादाकडे आज संपूर्ण राज्याचं आणि देशाचं लक्ष लागून आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, देश-विदेशातील, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील इतरही अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
वाशिम : कारंजा येथे भटक्या कुत्र्यांचा फळ विक्रेत्यावर हल्ला
वाशिमच्या कारंजा येथे भटक्या कुत्र्याचा हैदोस बघायला मिळाला. फळ विक्रेत्यावर कुत्र्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. जखमी फळविक्रेत्याला सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
-
चेंबूर : FDAची मोठी कारवाई, पार्ले फ्रुटी कंपनीच्या गोदामावर छापा
चेंबूरच्या वाशीनाका परिसरात FDA ने मोठी कारवाई केली. गडकरी खदानजवळील प्रयाग नगर परिसरातील नामांकित पार्ले फ्रुटी कंपनीच्या गोदामावर छापा टाकला. या गोदामात मुदत संपलेल्या फ्रुटीचा साठा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या FDA अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू आहे. संशयास्पद साठ्याचे नमुने तपासणीसाठी घेतले जाण्याची शक्यता आहे.
-
-
जळगाव : ठाकरे गट व मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
जळगावमध्ये शिवसेना ठाकरे गट व मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. कुंभमेळ्याच्या कामांच्या बनावट वर्कऑर्डरच्या घोटाळ्याविरुद्ध ठाकरे गटाचे व मनसेचे घोषणाबाजी करत आंदोलन केले. या प्रकरणात मंत्री गिरीश महाजन यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ठाकरे गट व मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.
-
धाराशिवमध्ये अमलीपदार्थ आणि सोन्याचे दागिने जप्त
छत्रपती संभाजीनगरच्या ( ANTF )अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स कृती विभागाने धाराशिवमध्ये मोठी कारवाई केली आहे. तेरणानगर, ढोकी परिसरात गांजा – चरससह 61 लाख 99 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 50 किलो 385 ग्रॅम गांजा, 131 ग्रॅम चरस आणि 21 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. आरोपी बाप्पा शंकर पवार याच्या आलिशान घरावर छापा टाकून हा मुद्देमाल जप्त केला आहे. ढोकी पोलीस ठाण्यात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
-
जळगावातील भवरखेडे गावात दारूबंदीसाठी महिलांचा पुढाकार
जळगावच्या धरणगाव तालुक्यातील भवरखेडे गावात दारूबंदीसाठी गावातील महिला आक्रमक झाल्या आहेत. गावातील सर्व महिलांनी एकत्र येत ग्रामपंचायतीमध्ये ठिय्या मांडून गावात दारूबंदीची मागणी केली. ग्रामपंचायतच्या बैठकीमध्ये महिलांनी एकत्र येऊन दारूमुळे उद्भवणाऱ्या वेगवेगळ्या अडचणी आणि समस्यावरून ग्राम सदस्य तसेच अधिकाऱ्यांना जाब विचारला. महिलांच्या आक्रमक मागणीमुळे तसेच आंदोलनामुळे ग्रामसेवकाच्यावतीने गावात दारूबंदीसाठीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
-
-
जुन्या इमारतीचे काम सुरु असताना कोसळून कामगाराचा मृत्यू
नायगाव येथे बिल्डिंग रिपेरिंगचे काम चालू असताना परातीवरुन कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सायंकाळी चार वाजताच्या सुमारास काम करत असताना हा मजूर अचानक खाली कोसळला. त्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. नायगाव पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या कामगारांच्या सुरक्षेतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
-
सुखबीर सिंग बादल यांच्यावरील हल्ला : एकनाथ शिंदे यांनी केली विचारपूस
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सुखबीर सिंग बादल यांच्या पत्नी आणि खासदार हरसिमरत कौर बादल यांच्याशी फोनवरून संवाद साधून त्यांची विचारपूस केली.या संभाषणादरम्यान, त्यांनी सुखबीर सिंग बादल यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली असून ते लवकरात लवकर पूर्णपणे स्वस्थ व्हावेत अशी प्रार्थना केली. या हल्ल्या प्रकरणात लवकरात लवकर कारवाई करुन दोषींना शिक्षा होईल असेही ते म्हणाले.
-
एकनाथ शिंदे नाराज नाहीत. केवळ प्रकृती अस्वस्थामुळे अनुपस्थित
एकनाथ शिंदे नाराज नाहीत. केवळ प्रकृती अस्वस्थामुळे आजच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहू शकले नाहीत, अशी माहिती त्यांच्या निटकवर्तीयांनी दिली आहे.
-
रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मंत्री भरत गोगावले यांचे सूचक वक्तव्य
मंत्री भरत गोगावले हे आज बीड जिल्ह्यात दौरावर असून गेवराई येथे शिवसैनिकांच्या मेळाव्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत सूचक वक्तव्य केले आहे.. आमचे नेते एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाली आहे… त्यातून नक्कीच सकारात्मक निर्णय होईल… पावणे दोन वर्षे थांबलो आहे सब्र का फल मीठा होता है आणि हे फळ भरतशेठलाच मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तटकरे यांच्या पुतण्याला आता आमदारकी मिळाली आहे.. त्यामुळे पालकमंत्री पदाचा आमचा मार्ग मोकळा झाला असल्याचे देखील भरत गोगावले यांनी म्हटले असून 15 ऑगस्ट झेंडा देखील मीच फडकवणार असल्याचे त्यांनी सांगितले..
-
आजची सुनावणी संपली, पुढील सुनावणी संपली..
आजची सुनावणी संपली, कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तीवाद. पुढील सुनावणी मंगळवारी होणार.
-
अपात्र व्यक्तीला उपमुख्यमंत्रिपद दिले
एकनाथ शिंदे यांच्या निवडीचा घटनाक्रम कोर्टात सादर करण्यात आला. कपिल सिब्बल यांच्याकडून मोठा युक्तीवाद कोर्टात केला जात आहे.
-
नोंदणी रद्दचा निर्णय प्रशासकीय पातळीवर, न्यायिक पातळीवर नाही- कपिल सिब्बल
नोंदणी रद्दचा निर्णय प्रशासकीय पातळीवर झाला असून न्यायिक पातळीवर झाला नाही, असंही सिब्बल यांनी कोर्टात म्हटलंय. पक्षाच्या कामकाजात 29 अ चं उल्लंघन झाल्यास अहवाल मागवला जाऊ शकतो, असा युक्तिवाद त्यांनी केला आहे.
-
29 अ नुसार आयोगाला राजकीय पक्षाची नोंदणी रद्दचा अधिकार नाही- सिब्बल
पक्षाच्या नोंदणीसाठी आवश्यक माहिती मागवली जाऊ शकते. पक्षाला अनावश्यक वाटेल अशी माहिती आयोगानं मागवू नये. 29 अ नुसार आयोगाला राजकीय पक्षाची नोंदणी रद्दचा अधिकार नाही, असा युक्तिवाल कपिल सिब्बल यांनी केला आहे.
-
हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही- सिब्बल
हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही. 19 अ नुसार आयोगाला राजकीय पक्षाची नोंदणी रद्दचा अधिकार नाही, असं म्हणत कपिल सिब्बल यांनी विविध दाखले दिले आहेत.
-
कायदे होतात पण कायद्यांची कसोटी न्यायालयात होते- कपिल सिब्बल
कायदे होतात पण कायद्यांची कसोटी न्यायालयात होते. कायद्याची अंमलबजावणी नीट होते का हा प्रश्न आहे. आयोगाकडे काही विषय होते तर कळवायला हवं होतं. आयोगाने परस्पर निर्णय कसा घेतला, असं सिब्बल म्हणाले.
-
तुम्ही आमच्या इतरही घटनात्मक संस्थांना कमी लेखू नका- कोर्ट
तुम्ही आमच्या इतरही घटनात्मक संस्थांना कमी लेखू नका. इतरही घटनात्मक संस्था आपलं काम करत आहेत, असं कोर्टाने म्हटलं आहे.
-
आयोगाच्या अधिकारात स्पष्टता आणणं गरजेचं- कपिल सिब्बल
आयोगाच्या अधिकारात स्पष्टता आणणं गरजेचं आहे. आयोग अधिकाराचा चुकीचा वापर करतंय. पक्ष सत्तेत असतो, त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होत नाही. दुर्दैवाने ही वस्तुस्थिती आहे, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे.
-
लोकशाहीच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर- कपिल सिब्बल
लोकशाहीच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे, कारण तुम्ही निर्णय देणार आहात, असं कपिल सिब्बल यांनी कोर्टात म्हटलंय. तर ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचं कोर्टाने नमूद केलं.
-
हे अत्यंत चुकीचं असून केवळ शिवसेनेसाठी नाही तर लोकशाहीसाठी महत्त्वाचं- कपिल सिब्बल
हे अत्यंत चुकीचं असून केवळ शिवसेनेसाठी नाही तर लोकशाहीसाठी महत्त्वाचं आहे. या पद्धतीने आयोग किंवा अध्यक्ष निर्णय घेऊ शकत नाहीत, असं सिब्बल यांनी नमूद केलंय.
-
अपात्र होणाऱ्या व्यक्तीला तुम्ही मुख्यमंत्री बनू दिलं- कपिल सिब्बल
ज्या घडामोडी घडल्या त्या पाहता त्यांना राजकीय मदत झाली. अपात्र होणाऱ्या व्यक्तीला तुम्ही मुख्यमंत्री बनू दिलं. चिन्ह कसं दिलं पाहिजे, याचेही काही नियम आहेत. शिंदेंकडे गेलेल्या आमदारांना ईडी, सीबीआयच्या नोटीस दिल्या गेल्या, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे.
-
पक्ष फूट, चिन्ह आणि आमदार अपात्रता हे मुद्दे तुम्ही एकत्र करत आहात- कोर्ट
पक्ष फूट, चिन्ह आणि आमदार अपात्रता हे मुद्दे तुम्ही एकत्र करत आहात, असं कोर्टाने म्हटलंय. तर आम्ही तिन्ही प्रकरणं एकत्र करत नाही आहोत. पक्ष फूट आणि अपात्रता दोन्ही मुद्दे अध्यक्षच पाहू शकत नाहीत, असं सिब्बल यांनी म्हटलंय.
-
पक्ष फूट आणि अपात्रता हे दोन वेगवेगळे मुद्दे- कपिल सिब्बल
निवडणूक आयोगाने सरसकट चिन्ह शिंदेंना दिलं. आमदार दोन तृतीयांश होण्याची वाट पाहून मान्यता देण्यात आली. फुटीसंदर्भात निवडणूक आयोग भूमिका घेईल. पक्ष फूट आणि अपात्रता हे दोन वेगवेगळे मुद्दे आहेत. दोन्ही मुद्दे अध्यक्षच पाहू शकत नाही, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय.
-
आमच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय प्रलंबित ठेवला- कपिल सिब्बल
पक्षात संविधानानुसार निवडणुका घेणं, हा देखील एक पर्याय आहे. पक्षाचं संविधान पाळा, असे निर्देश आयोग देऊ शकतात. आमच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय प्रलंबित ठेवला. अडचण असेल तर आयोग सूचना देऊ शकतं. पक्ष, चिन्ह देऊ शकत नाही, असं सिब्बल यांनी नमूद केलं.
-
हे प्रकरण आमच्या बाजूने, कारण आम्हाला आयोगाने नोटीस दिली नाही- कपिल सिब्बल
हे प्रकरण आमच्या बाजूने, कारण आम्हाला आयोगाने नोटीस दिली नाही. प्रत्येक पक्षाला पुराव्यानिशी बाजू मांडण्याचा अधिकार आहे, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे.
-
निवडणूक आयोगाने तथ्य तपासून निकाल का दिला नाही? कपिल सिब्बल यांचा सवाल
नोटीस दिल्याशिवाय आयोग कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. निवडणूक आयोगाने तथ्य तपासून निकाल का दिला नाही? संघटनात्मक रचनेवरून घटना चुकीची ठरू शकत नाही. एखादा पक्ष काही करत नसेल तर आयोग फक्त नोंदणी रक्क करू शकतो, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.
-
काही पक्षांमध्ये 10-10 वर्षे निवडणुका होत नाहीत- कपिल सिब्बल
काही पक्षांमध्ये 10-10 वर्षे निवडणुका होत नाहीत. जनता दल, सपामधील फूट आणि आमचं प्रकरण वेगळं आहे, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे.
-
गेल्या चार वर्षांमध्ये अनेक पक्षफुटीची प्रकरणं पाहिली- कपिल सिब्बल
कपिल सिब्बल यांच्याकडून 1994 च्या जनता दलाच्या घडामोडींचा दाखला देण्यात आला आहे. कोणत्या आधारावर त्यांनी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. गेल्या चार वर्षांमध्ये अनेक पक्षफुटीची प्रकरणं पाहिली आहेत. प्रत्येक प्रकरणामध्ये बऱ्यापैकी साम्य आहे, असं सिब्बल यांनी म्हटलंय.
-
जनता दलाचं अधिवेशन कुणी बोलावलं, हे रेकॉर्डवर नाही- कपिल सिब्बल
जनता दल-शिवसेना प्रकरणात सर्वच साम्य आहे, असं नाही. आमचा निर्णय घेताना आयोग जनता दलाच्या निर्णयावर अवलंबून राहिली. जनता दलाचं अधिवेशन कुणी बोलावलं, हे रेकॉर्डवर नाही. तेव्हा कुणाला निमंत्रण होतं, हेदेखील रेकॉर्डवर नाही, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला.
-
शिंदेंनी स्वत:ची राष्ट्रीय कार्यकारिणी बनवली- कपिल सिब्बल
पक्षाच्या संविधानानुसार पक्षाचं काम चालतं. आयोगानं जनता दलाचा दाखला दिला मात्र इथं लागू होत नाही. शिंदेंनी स्वत:ची राष्ट्रीय कार्यकारिणी बनवली, असं कपिल सिब्बल म्हणाले.
-
जनता दल फुटीचा दाखला कपिल सिब्बल यांनी कोर्टात दिला
जनता दल फुटीचा दाखला कपिल सिब्बल यांनी कोर्टात दिला आहे. एस. आर. बोम्मई केसचा दाखलाही त्यांनी दिला आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीवर कुणीही आक्षेप घेतला नव्हता, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला आहे.
-
कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाची ऑर्डर दाखवली
कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाची ऑर्डर दाखवली आहे. आयोगाने चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतला, असा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे.
-
कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तिवादाला सुरुवात
शिवसेना निवडणूक चिन्हासंदर्भात तसंच आमदार अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवादाला सुरुवात केली आहे.
-
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर थोड्याच वेळात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर थोड्याच वेळात सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात होणार आहे. कपिल सिब्बल आज अपात्रतेवर युक्तिवाद करणार आहेत. ठाकरेंचे दुसरे वकील देवदत्त कामतही आज युक्तीवाद करण्याची शक्यता आहे. सुनावणीसाठी न्यायाधीश न्यायालयात दाखल झाले आहेत.
-
कल्याण – मदतीच्या बहाण्याने टॅक्सी चालकाला लुटण्याचा प्रयत्न; ब्लॅकमेलिंगचा डाव उधळला
कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवर दोन तरुणींनी टॅक्सी चालक सचिन शेंडगे यांची गाडी अडवून भिवंडीला सोडण्याची विनंती केली. मात्र काही अंतर गेल्यावर तरुणींनी चालकाकडे 10 हजार रुपयांची मागणी करत धमकावण्यास सुरुवात केली. पैसे देण्यास नकार दिल्यावर कपडे फाडून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. चालकाने प्रसंगावधान राखत 112 हेल्पलाईनवर फोन करून मदत मागितल्यावर त्या तरूणी फरार झाल्या.
-
दोडामार्ग तालुक्याच्या आमसभेत सत्ताधारी- विरोधक आमनेसामने
सिंधुदुर्ग – दोडामार्ग तालुक्याच्या आमसभेत सत्ताधारी- विरोधक आमनेसामने आले. ठाकरेंची सेना, पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेचे पदाधिकाी भिडल्याचं दिसून आलं. दोन्ही गटाचे कार्यकर्ते अक्षरश: एकमेकांच्या अंगावर धावू गेल्याचा प्रकार पहायला मिळाला.
-
वर्षा बंगल्यावर , आमचे गरीब पोर आंदोलन करणार आहेत- मनोज जरांगे पाटील
वर्षा बंगला , फडणवीस आमचे नाही का. वर्षा बंगल्यावर , आमचे गरीब पोर आंदोलन करणार आहेत. राज्यातील पोरांना आंदोलन करण्यासाठी फडणवीस यांनी मन मोठ दाखवून…वर्ष बंगल्याचा स्लॅब वर बसून आंदोलन करू. द्या. मी भीत नाही , महाराष्ट्राचा काना कोपरासाठी मी काम करत आहेत. सगळे मराठा माझ्या सोबत , सत्तेतील लोकही. मी कुणाला अजून विरोधक मानले नाही, मला अजूनही गोरगरीब धनगर समाजासाठी वाटत. माझ्या गाव शेजारी धनगर राहतात.
-
70 वर्षात मराठा समाजाचे वाटोळे-मनोज जरांगे पाटील
70 वर्षात मराठा समाजाचे वाटोळे या सरकारने केले. सरकार प्रमाणपत्र देण्यात हस्तक्षेत करत नाही , तर बावनकुळे यांनी हस्तक्षेप कसा केला…पत्र कसे दिले..वर्षा बंगल्यावर आंदोलन का करू नये..डाव कसा टाकतात त्यावर , आम्ही पण डाव टाकू..एकनाथ शिंदे आणि फडणवीस मध्यरात्री जर बैठका घेत असतील… तर मराठा समाजाला न्याय द्यायचा विचार करा. रात्रीच्या बैठकीत नवे कुठले तरी डाव टाकायचा विचार करू नका…
-
मुंबई विमानतळावर प्रवाशाकडून बॉम्बची खोटी धमकी
मुंबई विमानतळावर प्रवाशाकडून बॉम्बची खोटी धमकी. दिल्लीचं विमान उडण्यापूर्वी थांबवण्याची वेळ, प्रवाशाने सांगितले की माझ्या बॅगेत बॉम्ब आहे. यानंतर विमानातून खाली उतरवून ताब्यात घेतले आहे.
-
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर. नाशिक महापालिकेत पक्षातील नगरसेवकांची घेणार बैठक. बैठकीनंतर आदित्य ठाकरे घेणार पत्रकार परिषद. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली विकासकामे आणि रस्त्यांची दुरवस्था यावर मांडणार भूमिका. नाशिकच्या रस्त्यांवरून आदित्य ठाकरे काय भूमिका मांडतात, याकडे लक्ष. कुंभमेळ्याच्या कामांबाबतही आदित्य ठाकरे काय बोलतात किंवा मागण्या करतात, हे पाहणे महत्त्वाचे.
-
आदित्य ठाकरे त्र्यंबकेश्वरच्या पेगलवाडी मध्ये पोहचले
आदित्य ठाकरे त्र्यंबकेश्वरच्या पेगलवाडी मध्ये पोहचले. शाळेतील विद्यार्थ्यांशी आदित्य ठाकरे यांनी साधला संवाद. ज्या शाळकरी विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दुरावस्थेचा व्हिडिओ बनवला त्यांच्यासह इतर विद्यार्थ्यांसोबत आदित्य ठाकरे यांनी संवाद साधला. तुम्हाला अजून काय पाहिजे मला सांगा मी तुम्हाला मदत करतो. कोणाला काय बनायचे यासह विद्यार्थ्यांचे व्हिजन आदित्य ठाकरे यांनी जाणून घेतले
-
पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या जतन आणि संवर्धनासाठी तब्बल ७५ कोटी रुपयांची तरतूद
पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या जतन आणि संवर्धनासाठी तब्बल ७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यापैकी आतापर्यंत सुमारे ३४ कोटी रुपये खर्च झाले आहेत. मात्र, काम पूर्ण करण्यासाठी निश्चित केलेल्या दोन वर्षांच्या कालावधीला तीन वर्षांहून अधिक काळ उलटूनही संवर्धनाची अनेक कामे अद्याप अपूर्णच आहेत. गर्भगृह, सोळखांबी आणि परिवार देवतांच्या संवर्धनाची कामे झाली असली, तरी पश्चिम द्वार आणि नामदेव पायरी परिसरातील महत्त्वाची कामे अजून बाकी आहेत. त्यामुळे कोट्यवधींचा खर्च होऊनही विठ्ठल मंदिर संवर्धनाचा प्रकल्प कधी पूर्ण होणार असा सवाल उपस्थित होत आहे याचाच आढावा घेतला आहे.
-
रिअल इस्टेट एजंट भावेश कावरेने व्हिडिओ डिलीट केला
सोशल मीडियावर रिअल इस्टेट एजंट भावेश कावरेचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. तुम्ही मांसाहार करत असाल तर ताडदेवमध्ये तुम्हाला घर मिळणार नाही असं म्हणाणाऱ्या रिअल इस्टेट एजंट भावेश कावरेने व्हिडिओ डिलीट केला आहे.
-
दक्षिण मुंबईऐवजी साऊथ बॉम्बे म्हणण्यावर रिअल इस्टेट भावेश कावरेची प्रतिक्रिया
“मी फक्त बॉम्बे हायकोर्टाच्या बाहेर आलो होतो, त्यामुळे कोर्टाच्या बाहेर आल्यामुळे माझ्यात लक्षात होत आणि तेच मी माझ्या व्हिडिओमध्ये म्हटले की साऊथ बॉम्बे असं. ” रिअल इस्टेट भावेश कावरे म्हणाले.
-
मी तर आता चिकन पिझ्झा खाताना व्हिडिओ बनवणार आहे आणि तो आता टाकणार आहे-रिअल इस्टेट भावेश कावरे
“मी तर आता चिकन पिझ्झा खाताना व्हिडिओ बनवणार आहे आणि तो आता टाकणार आहे.” असं रिअल इस्टेट भावेश कावरे
-
मी एक मराठी माणूस माझ्या कंपनीत लोकांना रोजगार देतोय-रिअल इस्टेट भावेश कावरे
मी बघतो काही नेते लोक आहेत ते बोलतायेत की याला पकडा आणि चोपा, पहिलं तर एका युवाला जर तुम्ही असं म्हणत असाल तर फार चुकीच आहे. एक तर तुम्ही रोजगार देत नाही आणि मी एक मराठी माणूस माझ्या कंपनीत लोकांना रोजगार देतोय तर तुम्ही असं म्हणातायेत.
-
महाराष्ट्रात जर व्हेज खात असाल तर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जा असं म्हटलं जातं-रिअल इस्टेट भावेश कावरे
महाराष्ट्रात जर व्हेज खात असाल तर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जा असं म्हटलं जातं, तर हा फ्लॅट हा व्हेज खाणाऱ्या वारकरीचा पंताचा होता आणि त्याची इच्छा होती की तो फ्लॅट व्हेज खाणाऱ्यांकडे जावा. रिअल इस्टेट भावेश कावरे
-
हा मुद्दाच नाहीये तरीही त्याला मुद्दा बनवला जात आहे- रिअल इस्टेट भावेश कावरे
कोणाला जर मांसाहाराचा वास आवडत नसेल तर त्या लोकांनी काय कराव, हा मुद्दाच नाहीये तरीही त्याला मुद्दा बनवला जात आहे. असं रिअल इस्टेट भावेश कावरे म्हणाले आहे.
-
मुंबईत 80 टक्के लोक मांसाहर करतात तर 20 टक्के लोक हे व्हेज खातात- रिअल इस्टेट भावेश कावरे
मुंबईत 80 टक्के लोक मांसाहर करतात तर 20 टक्के लोक हे व्हेज खातात. हा व्हिडिओ प्योर व्हेज खाणाऱ्यांसाठी आहे. असं रिअल इस्टेट भावेश कावरे म्हणाला
-
मी हा व्हिडिओ मराठी व्हेज खाणाऱ्यांसाठी बनवला-रिअल इस्टेट भावेश कावरे
मांसाहार खाणाऱ्यांना ताडदेवमध्ये घर मिळणार नाही या विधानामुळे रिअल इस्टेट एजंट भावेश कावरेचा व्हिडिओ चर्चेत आला आहे. आता या प्रकरणावर त्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, ” जय महाराष्ट्र मी हा व्हिडिओ याच्यासाठी बनवला आहे की, अजूनही महाराष्ट्रात व्हेज खाणारे लोक आहेत. यासाठी तो व्हिडिओ बनवला आहे.”
-
केस वेगळ्या वळणावरती सुद्धा जाऊ शकते-असिम सरोदे
ही केस वेगळ्या वळणावरती सुद्धा जाऊ शकते. पक्षात फूट पडली होती का हे जर आधी ठरवावे लागत असेल अशी शंका व्यक्त करण्यात आली आहे तर त्यामध्ये याचा अर्थ सुद्धा निघतो की. शिवसेना पक्षात आधी फूट पडली होती का हा मुद्दा उपस्थित करून संविधानिक नैतिकता प्रस्थापित करणाऱ्या राजकीय दरोडेखोरीला कायदेशीरता देण्याचा प्रयत्न होणार आहे का असा प्रश्न आता सामान्य लोकांच्या मनात उमटायला लागला आहे. कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन काहीतरी वेगळेच अन्वयार्थ काढणं म्हणजे लोकशाही यंत्रणेवरचा विश्वास कमजोर करणारा ठरेल…असं असिम सरोदे म्हणाले.
-
पक्षचिन्ह बद्दल वाद करणाऱ्या दोन्ही पक्षांनी ते चिन्ह वापरायचं नाही- असिम सरोदे
चिन्हांबद्दल जेव्हा जेव्हा वाद झाले त्या त्या वेळेस ज्या पक्षचिन्ह बद्दल वाद आहे ते पक्षच चिन्ह गोठवले गेले. पक्षचिन्ह बद्दल वाद करणाऱ्या दोन्ही पक्षांनी ते चिन्ह वापरायचं नाही.. शिंदे गटाला तलवार आणि ढाल हे चिन्ह दिलं होतं त्यांनी ते वापरायला पाहिजे होतं पण अचानक निवडणूक आयोगाने जो वेगवान निर्णय दिला एकनाथ शिंदे च्या बाजूने निकालावरती आतापर्यंत चर्चा झाली आहे. त्यामुळे पक्ष चिन्ह गोठणे जाण्याची शक्यता जास्त आहे. असे असिम सरोदे म्हणाले.
-
आजच्या सुनावणीमध्ये वकील कपिल सिब्बल महत्वपूर्ण बाबी वरती युक्तिवाद करतील
आजच्या सुनावणीमध्ये वकील कपिल सिब्बल महत्वपूर्ण बाबी वरती युक्तिवाद करतील…आताची सुनावणी अपात्रतेच्या मुद्द्यावरती लक्ष केंद्रित आहे. निवडून आयोगाने कोणत्याही राजकीय पक्षासोबत समन्वय ठेवला नाही. पूर्ण चर्चा अपात्रतेवरती होईल. विधानसभा अध्यक्षांनी आपल्या पदाचा केलेला गैरवापर.
-
नाशिकच्या मनपासमोर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन
नाशिक जिल्हा खड्ड्यांचा बालेकिल्ला आहे असं म्हणतं नाशिकच्या मनपासमोर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन सुरु आहे.
-
आता फक्त जॅकेट घालायचे आहे. रायगडाचा पालकमंत्री मीच- भरत गोगावले
आता फक्त जॅकेट घालायचे आहे. रायगडाचा पालकमंत्री मीच, आता फक्त २ दिवस शिल्लक यादरम्यान निर्णय होऊ शकेल असे विधान भरत गोगावले यांनी केले आहे.
-
मुंबई लोकलचा प्रवास भविष्यात मेट्रोसारखा होणार – मुख्यमंत्री
मुंबई लोकलचा प्रवास भविष्यात मेट्रोसारखा होणार आहे. मुंबईच्या सर्व लोकल आधुनिक, एसी होणार… मुंबईच्या 3 कोच फॅक्टरीत ट्रेन तयार करण्याचा निर्णय… अशी घोषणा मुख्यमंत्री देव्रेंद्र फडणवीस केलं आहे.
-
मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मयत नागेश गायकवाड यांच्या पत्नीने रात्री उशिरा गळफास घेऊन आत्महत्या
मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मयत नागेश गायकवाड यांच्या पत्नीने रात्री उशिरा गळफास घेऊन आत्महत्या केली. मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मयत नागेश गायकवाड यांच्या पत्नीने रात्री उशिरा गळफास घेऊन आत्महत्या केली. सोनाली नागेश गायकवाड अस आत्महत्या केलेल्या महिलेच नाव आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गायकवाड दांपत्याला दोन मुली आहेत, परंतु ठीक एक महिन्यानंतर नागेश यांच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे,नागेश गेल्यानंतर त्या तणावात होत्या, दुःखी होत्या, यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय.
-
मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरु
मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईकडे येणारी वाहतून 25 ते 30 मिनिटं उशीराने सुरु आहे.
-
विरारच्या कळंब समुद्रकिनारी एर्टिगा कार समुद्राच्या भरतीच्या पाण्यात अडकली
आज सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. सकाळी समुद्रकिनारी फिरायला गेलेल्या सतर्क नागरिकाने हा सर्व प्रकार आपल्या मोबाईल कॅमेरा मध्ये कैद केला आहे. जवळच्याच मच्छीमार बांधवांनी शर्तीचे प्रयत्न करून, एक तासानंतर पाण्यात अडकलेली कार बाहेर काडण्यात यश मिळविले आहे. मात्र समुद्रकिनारी धोकादायक पद्धतीने वाहन चालवणाऱ्या अतिहौशी चालकावर चांगलेच बेतले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कारचालकाचे कारचे नुकसान झाले आहे.
-
मनसे नेते अमित ठाकरेंची मालाडमधील कमलादेवी मित्तल कॉलेजला भेट
विद्यार्थ्यांच्या न्यायहक्कांसाठी मनविसेचे सदस्य नोंदणी अभियान वेगात आहे. विद्यार्थ्यांच्या न्यायहक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये व्यापक सदस्य नोंदणी अभियान राबवले जात आहे. याच अभियानाचा भाग म्हणून आज मनसे युवा नेते अमित ठाकरे यांनी मालाड येथील श्रीमती कमलादेवी मित्तल कॉलेजला भेट दिली. अमित ठाकरेंच्या या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह कॉलेज परिसरातील विद्यार्थ्यांकडून अभियानाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
-
१० लाख झाडं, १२ तास आणि वर्ल्ड रेकॉर्डचा प्रयत्न — ‘हरित धाराशिव २.०’साठी प्रशासन सज्ज!
धाराशिवमध्ये उद्या १० लाख वृक्ष लागवडीचा विक्रम! ‘हरित धाराशिव अभियान २.०’ अंतर्गत उद्या जिल्ह्यात १० लाख वृक्ष लागवडीची महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेण्यात आली आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ७ या १२ तासांत १० लाख रोपांची लागवड करण्यात आली आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते उद्या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आलं आहे. ‘अटल घनवन’ योजनेच्या माध्यमातून विविध प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली.
-
छत्रपती संभाजीनगरच्या MIT कॉलेजमध्ये पंचमहासंमेलनाला सुरुवात
छत्रपती संभाजीनगरच्या MIT कॉलेजमध्ये पंचमहासंमेलनाला सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागातील रोजगार आणि आजीविकेला चालना देण्यासाठी विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियान (ग्रामीण) अंतर्गत पंचमहासंमेलनाचे आयोजन करण्याात आलं. कार्यक्रमाला मंत्री भरत गोगावले, मंत्री संजय शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती आहेत. आमदार संजना जाधव, आमदार विलास भुमरे आणि आमदार सुहास शिरसाट यांचीही उपस्थिती आहे.
-
विरारच्या कळंब समुद्रकिनारी एर्टिगा कार समुद्राच्या भरतीच्या पाण्यात अडकली
विरारच्या कळंब समुद्रकिनारी एर्टिगा कार समुद्राच्या भरतीच्या पाण्यात अडकली
आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली घटना
सकाळी समुद्रकिनारी फिरायला गेलेल्या नागरिकाने हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यामध्ये केला कैद
मच्छिमारांच्या मदतीने तब्बल एक तासानंतर कार काढली पाण्याच्या बाहेर
-
पोलिसांची नाशिक – त्र्यंबकेश्वर रोड परिसरात मोठी कारवाई, बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त
नाशिक ग्रामीण आणि शहर पोलीस दलाने नाशिक- त्र्यंबकेश्वर रोड परिसरात मोठी कारवाई केली आहे, बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान लाखो रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
-
जळगाव शहरातील मेहरून तलावाच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ
जळगाव शहरातील मेहरून तलावाच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली असून, तलाव 78 टक्क्यांपर्यंत भरला आहे. दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे मेहरून तलावात पाण्याची आवक वाढली असून पाणीसाठा वाढल्याने नागरिकांमध्ये आनंदाच वातावरण आहे. मेहरूण तलावाच्या गणेशघाटावरील सात पायऱ्या पाण्यात बुडाल्या आहेत.
-
अमित शाह यांच्या निवेदनाशिवाय लोकसभेचं कामकाज तहकूब; सभागृहात प्रचंड गदारोळ
अमित शाह यांच्या निवेदनाशिवाय लोकसभेचं कामकाज तहकूब
सभागृहात प्रचंड गोंधळ
राज्यसभेत देखील विरोधकांचा गोंधळ
संसदेच्या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस
सभागृहात मोदी आणि शाह यांची उपस्थिती
-
पेगलवाडी येथील रस्त्याची जिल्हा प्रशासनाने घेतली दखल
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पेगलवाडी येथील रस्त्याची जिल्हा प्रशासनाने घेतली दखल. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह आमदार हिरामण खोसकर यांनी केली पेगलवाडी रस्त्याची पाहणी केली. प्रशासनाला तत्काळ रस्ता दुरुस्त करण्याच्या सूचना.
-
मंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड
शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला आहे. उदय सामंत नागपूरवरून गडचिरोली येथील सुरजागड येथे पहाणी दौरा करणार होते. हेलिकॉप्टर उड्डाणा दरम्यान पायलटला तांत्रिक बिघाड लक्षात आला आणि अनर्थ टळला. हेलिकॉप्टर उड्डाणापूर्वी तांत्रिक तपासणीत बिघाड लक्षात का आला नाही? याची चौकशी करण्याची स्थानिक शिवसैनिकांची मागणी.
-
HSRP नंबर प्लेट बाबत परिवहन विभागाकडून आता कारवाईचा फास आवळला
परिवहन विभागाकडे आतापर्यंत १ कोटी १० लाख ८४ हजार वाहन चालकांनी HSRP नंबर प्लेटसाठी केल्या बुकिंग. यातील ९८ लाख ०८ हजार लोकांनी नंबर प्लेट लावल्याची परिवहन विभागाची माहिती. मात्र अद्यापही १ कोटींहून अधिक वाहन धारकांना HSRP नंबरप्लेटबाबत कुठलिही नोंद किंवा अद्याप लावलेली नाही.
-
जालना शहरात पोलिस विभागाकडून काढण्यात आली भव्य तिरंगा रॅली
जालना शहरात हर घर तिरंगा अभियानांतर्गत भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीत शालेय विद्यार्थी आणि पोलिस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आज जालना शहरात पोलिस विभागाकडून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली.
-
राज्यातील १ कोटी ८० लाख मतदार अपात्र?
राज्यातील १ कोटी ८० लाख मतदार अपात्र होण्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे. मतदारांच्या नोंदी अद्याप आवश्यक कागदपत्रांद्वारे निश्चित झालेल्या नसल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित मतदारांनी घाबरून न जाता आपले नाव मतदार यादीत कायम ठेवण्यासाठी आवश्यक अर्ज आणि कागदपत्रे सादर करावीत, असे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांचं आवाहन
-
आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यानंतर
आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर असणार आहे. नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची पाहणी करणार आहेत. १७ ऑगस्टला नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा खड्ड्यांच्या मुद्द्यावरून मोर्चा काढला जाणार आहे.
-
निवडणूक आयोग दलाल, आतापर्यंत 4 पक्ष विकले – संजय राऊत
संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, सुनावणी उद्यापर्यंत जाऊ शकते. पक्ष आणि चिन्हाचा युक्तिवाद महत्वाचा आहे. निवडणूक आयोग दलाल असून आतापर्यंत 4 पक्ष विकले, असा आरोप राऊत यांनी केला.
-
ऐन पावसाळ्यात नंदूरबारमध्ये हंडाभर पाण्यासाठी आदिवासींची पाटपीट
भर पावसाळ्यातही सातपुड्यातील आंबलीचाफडी पाडा तहानलेला आहे. नंदूरबारमध्ये हंडाभर पाण्यासाठी आदिवासी कुटुंबांची डोंगर-दऱ्यांतून जीवघेणी पायपीट सुरू आहे. माणिबेलीच्या आंबलीचाफडी पाड्यात तब्बल २० कुटुंबांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाण्यासाठी खोदलेल्या सातही बोअरवेल कोरड्या ठरल्या आहेत.
-
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज गुरुवारी पुणे दौऱ्यावर जाणार आहे. पुण्यातील पक्ष कार्यालयात राज ठाकरे बैठक घेणार आहे. राज ठाकरेंच्या उपस्थितीत शहर प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता पक्ष कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे.
-
Dhule Pathole : धुळ्यात बसस्थानकात मोठेमोठे खड्डे, प्रवाशांची मोठी कसरत
धुळे मध्यवर्ती बसस्थानकात मोठमोठे खड्डे झाले आहेद. त्यात पावसामुळे खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहेत. खड्ड्यांमधून वाट काढताना प्रवाशांची मोठी कसरत करावी लागत आहे. त्यात बसचालकांनाही वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून खड्ड्यांचा प्रवाशांना त्रास होत आहे. तर अद्याप खड्ड्यांचे डांबरीकरण न झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यात बसस्थानकातील खड्डे तातडीने बुजविण्याची प्रवाशांची मागणी आहे.
-
Nashik : नाशिकच्या गुन्हेगारांना दणका, 46 सराईत गुन्हेगार तडीपार
नाशिक पोलिसांनी गुन्हेगारांना मोठा दणका दिला आहे. नाशिकमधील ४६ सराईत गुन्हेगारांना २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आलं आहे. श्रावणासह आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोठी कारवाई करण्यात आली आहे. -शहरातील शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सराईत गुन्हेगारांविरोधात मोहिम हाती घेण्यात आली आहे.
-
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळ्यांप्रकरणी चौकशी करण्याचे सहकार व पणन विभागाचे आदेश
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळ्यांप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश सहकार आणि पणन विभागाने दिले आहेत. गाळ्यांच्या व्यवहारात गैरव्यवहार झाल्याबाबत माजी सभापती आणि विद्यमान संचालक शामकांत बळीराम सोनवणे यांनी तक्रार केली होती. तक्रारीची दखल घेत सहकार आणि पणन विभागाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत. २०१३ ते २०२६ या कालावधीतील सर्व व्यवहारांची तपासणी करून दोषी आढळल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची आणि त्यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
-
नाशिक जिल्ह्यातील सर्व अनुदानित आदिवासी आश्रमशाळांचं ‘सुरक्षितता ऑडिट’ होणार
नाशिक जिल्ह्यातील सर्व अनुदानित आदिवासी आश्रमशाळांचं ‘सुरक्षितता ऑडिट’ होणार आहे. गडचिरोलीतील आश्रमशाळेत तीन विद्यार्थ्यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्व अनुदानित आश्रमशाळांची सुरक्षितता तपासणी करण्यात येणार आहे. आदिवासी आयुक्तालयाकडून सर्व प्रकल्प कार्यालयांना चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नाशिक प्रकल्प कार्यालयाच्या अखत्यारित ४० आश्रमशाळा, तब्बल २२ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
-
एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस यांच्या 20 मिनिटं बैठक
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यावेळी दोघांमध्ये २० मिनिटं बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीत रायगड पालकमंत्रीपद, दोन आठवड्यात राज्यातील महामंडळ वाटप, शिवसेनेच्या आमदारांना विकासकाम निधी आणि रखडलेल्या कामांना गती देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे.
-
पार्थ पवार यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी निवडीमध्ये वर्चस्व
पार्थ पवार यांच्याकडून राष्ट्रीय विद्यार्थी अध्यक्ष, महाराष्ट्र युवती आणि विद्यार्थी अध्यक्ष पदावर पदाधिकारी निवड केल्यानंतर आता मुंबई अध्यक्ष पदाकडे मोर्चा वळविण्यात आला आहे. लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई अध्यक्ष पदावर पार्थ पवार यांच्या जवळच्या व्यक्तीची निवड होण्याची शक्यता आहे. आमदार झिशान सिद्धकी यांची लवकरच मुंबई अध्यक्ष पदावर निवड होण्याची शक्यता आहे. समीर भुजबळ यांच्या राजीनाम्यानंतर दोन वर्षापासून मुंबई अध्यक्ष पद रिक्त आहे.
Published On - Aug 13,2026 8:40 AM
