AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! बैठक अर्धवट सोडली, सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास, चर्चांना उधाण

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, एकीकडे राष्ट्रवादी शरद पवार गट हा एनडीएसमोर जाण्याची चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असतानाच सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे यांनी एकाच वाहनातून प्रवास केल्याचं पहायला मिळालं.

मोठी बातमी! बैठक अर्धवट सोडली, सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास, चर्चांना उधाण
Vinod Tawde, Supriya SuleImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 13, 2026 | 8:41 AM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादी शरद पवार  गट हा एनडीएसोबत जाण्याची चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असतानाच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपचे नेते तसेच पक्षाचे राष्ट्रीय रसचिटणीस विनोद तावडे यांनी एकाच गाडीमधून प्रवास केल्याचं पहायला मिळालं. यामुळे पुन्हा एकदा  चर्चेला उधाण आलं आहे. बुधवारी दिल्लीमध्ये असलेल्या महाराष्ट्र सदनमध्ये जलजीवन मिशनची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे हे दोन्ही नेते उपस्थित होते. त्यानंतर ते ही बैठक सुरू असतानाच बैठकीतून बाहेर पडले आणि एकाच गाडीमधून रवाना झाले, त्यामुळे आता या प्रवासाची जोरदार चर्चा राज्यात सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गट हा एनडीएसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत्याचं पहायला मिळालं. दरम्यान त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदारांनी नुकतीच सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. अर्थात या भेटीपूर्वीच पत्रकार परिषद घेऊन ही भेट महाराष्ट्रातील विविध समस्यांसंदर्भात असल्याचं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं होतं.

दरम्यान त्यानंतर आता सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे यांनी एकाच वाहनातून प्रवास केल्याचं पहायला मिळत आहे. दिल्लीमध्ये असलेल्या महाराष्ट्र सदनमध्ये जलजीवन मिशनची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती.  या बैठकीला हे दोन्ही नेते उपस्थित होते, मात्र त्यानंतर बैठक सुरू असतानाच हे दोन्ही नेते बैठकीतून बाहेर पडले आणि ते एकाच गाडीमधून रवाना झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आता चर्चेला उधाण आलं आहे.

Follow Us
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...